रक्तदाबाची समस्या आहे? मग आहारात करा मुळ्याचा समावेश

Radish
Radish
Updated on

निरोगी आरोग्यासाठी सकस आणि पौष्टिक आहार घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे अनेकदा डॉक्टरदेखील आहारात फळे,पालेभाज्या यांचा समावेश करण्याचा सल्ला देतात. मात्र, अनेक जणांची पालेभाज्या खातांना तक्रार असते. त्यामुळे पालक, मेथी, मुळा अशा पौष्टिक भाज्या नकळतपणे टाळल्या जातात. परंतु, या सगळ्या भाज्या शरीरासाठी अत्यंत गरजेच्या असून त्याचे अनेक शारीरिक फायदे आहेत. यातलीच एक भाजी म्हणजे मुळा. रंगाने पांढरा शुभ्र पण चवीने थोडासा कडवट असलेला मुळा हा एक कंदमुळ प्रकारात मोडतो. आयुर्वेदात मुळ्याला औषधी वनस्पती म्हणून ओळखलं जातं. इतकंच नाही तर मुळ्यामुळे हृदयाशी निगडीत आजार आणि कोलेस्ट्रॉलची पातळीदेखील नियंत्रणात राहते. त्यामुळे मुळा खाण्याचे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

१. पचनासंबंधित जर काही तक्रारी असतील तर मुळ्याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. मुळ्यामुळे पचनक्रियेचं कार्य सुधारतं आणि अन्नपचन सुरळीत होतं.

२. अनेक जणांना रक्तदाबाची समस्या असते. अशा व्यक्तींनी नियमित मुळ्याचं सेवन केलं पाहिजे. मुळ्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.

३. सध्याच्या काळात अनेक जण मूळव्याधीच्या समस्येने त्रस्त आहेत. अशा व्यक्तींसाठी मुळ्याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.

४. मुळ्यामध्ये असलेल्या क जीवनसत्त्व, फॉस्फरस, जस्त (झिंक) व बी-कॉम्प्लेक्स असतात. ज्यामुळे त्वचाविकार दूर होतात.

५. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी मुळ्याचं सेवन आवर्जुन केलं पाहिजे.

६.  मुळ्यामुळे रक्तशुद्धी होते. तसंच रक्तात ऑक्सिजनचा पुरवठाही सुरळीत होतो.

दरम्यान, मुळ्यापासून केवळच भाजीच करता येतं असं नाही. तर, मुळ्यापासून अनेक पदार्थ तयार करता येतात. यात मुळ्याचे पराठे, मुळ्याची कोशिंबीर, मुळ्याची चटणी किंवा कच्चा मुळादेखील खाता येऊ शकतो.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.