मुंबई : प्रत्येक व्यक्तीचं त्याच्या कामाप्रमाणे, सवयींप्रमाणे, वेळेप्रमाणे रोजचं जीनव आणि वेळापत्रक अवलंबून असतं. कामाच्या आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात जेवणाच्या वेळांमध्ये साहदिकच बदल होतात. निरोगी आयुष्यासाठी आपण सर्वच आहाराकडे बारीकीने लक्ष देण्याचा प्रयत्न करतो. काहीजण तर डॉक्टरांच्या सल्लानुसार 'डाएट'ही पाळतात. डाएट आणि पत्थाबरोबरच अन्नाचे व्यवस्थित पचन होणेही तितकेच गरजेचे असते. अन्न पचणं हे पूर्णपणे तुमच्या इतर सवयींवर अवलंबून असते. नकळतकपणेच काहीजण जेवणानंतर शरीरावर ताण येण्याजोगे काम करतात. त्यामुळे शरीरातील पचनसंस्थेवर ताण येतो. परिणामी अन्न पचण्यास अडचण निर्माण होते. त्याचे काही गंभीर परिणामही शरीरावर होऊ शकतात. त्यामुळे जेवणानंतर कोणत्या गोष्टी करणे टाळावे हे जाणून घ्या !
1. जेवणानंतर अंघोळ करु नका
जेवल्यावर लगेचच अंघोळ केल्याने शरीरावर ताण येतो. भरलेल्या पोटी अचानक शरीरावर पाण्यामुळे शरीरावर उलट प्रतिक्रिया होऊ शकते. अनेकदा कार्डिएक अरेस्टचा धोकाही उद्भवतो. जेवल्यावर लगेच अंघोळ केल्यास रक्तप्रवाह हात, पाय आणि शरीराच्या इतर भागात वाढतो. पोटाच्या आजूबाजूचा रक्तप्रवाह कमी होतो. त्यामुळे पचनसंस्था कमजोर होते.
2. चहाचं पिणं टाळा
आपल्या आजुबाजुला अनेक चहाप्रेमी असतीलच. चहाचे प्रेमी सर्वत्र पाहायला मिळतात आणि अनेकांच्या चहा पिण्याच्या वेळा किंवा ते पिण्याचं लिमिट याला काही मर्यादा नसते. चहाची तलफ आल्यावर कधीही चहा पिणे चुकीचे आहे. अनेकांना जेवल्यावर चहा पिण्याची इच्छा होते. काहींना तशी सवयही असते. तुम्हालाही अशीच सवय असल्यास वेळीच सावधान व्हा. कारण, ते शरीरासाठी धोकादायक आहे. त्याचं मुख्य कारण असं की, चहाच्यापूडीमध्ये भरपूर प्रमाणात अॅसिडचे प्रमाण असतं. त्यामुळे आहारातील प्रथिनांचे नुकसान होते. परिणामी, अन्न पचण्यामध्ये खूप त्रास होतो. जेवल्यानंतर चहा घ्यायचा असल्यास किमान एका तासाच्या वेळेनंतर घ्यावा.
3. ध्रूम्रपान करू नये
धकाधकीच्या जीवनात आणि बदलत्या जीववशैलीमुळे अनेकांना मद्य, धुम्रपान असे व्यसन लागते. ते कधीही शरीरासाठी धोकादायक आहेच. तर तुम्हालाही अशाप्रकारचे व्यसन असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही वेळीच कमी केले पाहिजे. ध्रम्रपान शरीरासाठी हानिकारक आहेच. त्याचं व्यसन असणाऱ्या लोकांना ते कधीही करायची इच्छा होते. मात्र जेवणानंतर लगेच त्याचे सेवन करणे वाईट आहे.कारण, जेवल्यानंतर लगेच सिगारेट प्यायल्यास गॅस्ट्रिक आणि पित्त यांची समस्या ओढावतात. तज्ज्ञांच्या मते जेवणानंतर लगेचच सिगारेट प्यायल्यास पचनासंबंधी समस्या निर्माण होतात.
4. जेवणानंतर फळे खाणं टाळा कारण...
जेवणानंतर काही गोड किंवा चविष्ट खाण्याच्या सवयी वेगवेगळ्या असतात. काही जण पान खातात, चॉकलेट खातात तर काहीजण फळं खातात. जर तुम्हीही जेवणानंतर फळं खात असाल तर ते वेळीच थांबवा ! जेवल्यावर पोटामध्ये अन्नावर पचनक्रिया चालू असते. त्यातच तुम्ही जेवल्यावर फळं खाल्याने त्याचे पोषक घटक पोटापर्यंतत पोहोचत नाहीत. म्हणजेच त्याचं व्यवस्थित पचनही होत नाही. त्यामुळे अन्न आणि फळे यांचे व्यवस्थित पचन होत नाही.
5. जेवल्यावर लगेच झोपता ? मग हे वाचा...
जेवण जेवल्यावर लगेच झोप येतेच. त्यातच चविष्ट आणि आवडीचं अन्न जेवल्यावर चांगली झोप येणे साहजिकच आहे. पण, ज्याप्रमाणे घरातील मोठे लोकं सांगतात त्याप्रमाणे जेवल्यावर अन्न पचण्यासाठी शतपावली करयाची असते. जेणेकरुन अन्न पचनास मदत व्हावी. पण, अनेकांना जेवण करुन लगेच झोपायची सवय असते. ते शरीरासाठी नक्कीच हानिकारक आहे. अन्न पोटात गेल्यावर त्यावर पचनक्रिया होण्यास वेळ लागतो. त्यामुळे लगेच झोपल्यावर अन्न पचन होत नाही. गॅसेस आणि आतड्यांमध्ये संसर्ग होण्याची समस्या निर्माण होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.