Health Tips: पावसाळ्यात शरीर निरोगी ठेण्यासाठी फॉलो करा 'या' खास टिप्स

पावसाळ्यामध्ये बदलणाऱ्या वातावरणामुळे रोगराई पसरण्याच्या धोका जास्त असतो.
 health tips
health tipsSakal
Updated on

पावसाळ्यामध्ये बदलणाऱ्या वातावरणामुळे रोगराई पसरण्याच्या धोका जास्त असतो. खासकरून ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, अशा लोकांसाठी पावसाळा चिंता वाढवणारा असतो. अशा लोकांना सर्दी, खोकला, ताप अशा सामान्य आजारांसोबतच इतर आजारांनाही तोंड द्यावा लागते. त्यामुळे अशा आजारांपासून आपल्या कुंटूंबाचं रक्षण करायचं असेल तर काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. पावसाळ्यात स्वतःचं आणि कुटूंबाचं आरोग्य राखण्यासाठी खालील टिप्स फॉलो करा.

1) सकस आहार घ्यावा पावसाळ्यात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते तेव्हा सकस, शुद्ध, पोषक घरचे अन्नच खावे.

2) भाज्या, फळे रोगप्रतिकारक शक्ती वाढायला, पचन चांगले व्हायला मदत होते. त्यामुळे ह्या गोष्टींचा आपल्या रोजच्या आहारात भरपूर समावेश करावा. पावसाळ्यात खूप तिखट पदार्थ खाणे टाळावे.

3) शरीराची रोग प्रतिकार शक्ती उत्तम राहिल याची विशेष काळजी घ्यावी.लसूण शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो. म्हणुन स्वयंपाकात लसणाचा वापर करावा.त्यामुळे सर्दी खोकला, ताप अशा पावसाळी आजारांपासून सहज संरक्षण मिळते.

4) पावसाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी. विशेष करुन महिलांनी पायाच्या बोटांला चिखल्या होऊ नये म्हणुन खबरदारी घ्यावी .पावसाळ्यात त्वचेचे इन्फेक्शन टाळण्यासाठी जेवणात कडू भाज्यांचा समावेश करा. जसे की मेथी, कार्ले, कडुलिंब इ. ह्या भाज्यांमधील रसायने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

 health tips
Health Tips: दिवसा जेवणानंतर झोपल्याने बिघडतं आरोग्य; वाचा आयुर्वेदाचे नियम

5) काकडी ,बीट हे नियमितपणे खा. यामुळे चेहऱ्यावरचा तवटवीतपणा टिकून राहण्यासाठी मदत होते.

6)शरीरातील मिठाचे प्रमाण - पावसाळ्यात मिठाचे प्रमाण शक्य तेवढे कमी ठेवावे. तसेच चिंच, लोणच, चटणी अशा आंबट गोष्टी टाळाव्यात.

7) तळलेले, मांसाहारी पदार्थ खाणे टाळावेत.तसेच पचायला जड असणारे पडणारे पदार्थ कमी खावेत. कारण पावसाळ्यात पचनसंस्था थोडी अशक्त झालेली असते त्यात जर खूप क्लिष्ट आणि पचायला जाड पदार्थ खाल्ले तर आजारी पडण्याची शक्यता असते.

8) पावसाळ्यात बाजारातील शीतपेय पेय घेणे टाळावे. दिवसभरात मधल्या वेळेत जेव्हा भूक लागेली तेव्हा गरम सूप, हर्बल टी, ग्रीन टी अशी पेय घेणे अधिक उत्तम राहील.

9) पावसाळ्यात पाणी उकळून प्या आणि भरपूर प्रमाण पाणी प्या .पावसाळ्यात सगळ्यांनाच कमी तहान लागते त्यामुळे आपोआप कमी पाणी आपल्या शरीरातील जात. पण स्वास्थ्य राखण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती साठी, शरीराला साधारण 3 लिटर पाण्याची गरज असते. त्यामुळे आठवतीने पोटभर पाणी प्या.

 health tips
Health Tips: जेवल्यानंतर तुम्हालाही झोप येते का? हा 'फूड कोमा' असू शकतो

10) पावसाळ्यात रस्त्यावरचे किंवा उघड्यावर ठेवलेले अन्न खाणे टाळावे कारण पावसाळ्यामध्ये आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होते. बॅक्टेरिया, वायरसेसचे वाढलेले प्रमाण पावसाळ्यात अधिक असते. उघड्यावर ठेवलेल्या खाण्यावर माश्या बसून ते अन्न दुषित करतात. त्यामुळे बाहेरचे अन्न खाने टाळावे.

11) डासांपासून सुरक्षित रहा .पावसाळ्याच्या दिवसात डासांचे प्रमाण वाढते. त्यामुळे घरात ऑफिसमध्ये डासांपासून सुरक्षेची काळजी घ्या. घरात किंवा घराच्या आसपास पाणी फार काळ साठून राहणार नाही ह्याची काळजी घ्या. कारण साठलेल्या पाण्यात डासांची पैदास जास्त होते. डासांमुळे डेंगू मलेरिया सारखे आजार होऊ शकतात.

12) शेवटी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुमचं घर कामाचे ठिकाण इथे स्वच्छता राखा. आणि बाहेर ऊन पडल की शरीराला जरा ऊन लागु दया.आणि कोणती आजार अंगावर काढु नका.काही दुखायला लागलं की लगेच दवाखान्यात जा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.