Health Tips : कुमारवयीन मुलं व्यसन का करतात? काय आहेत कारणं? जाणून घ्या..

कुमारवयीन मुलं या वयात दारू, तंबाखू, गुटका, अमली पदार्थ व तत्सम पदार्थांचे सेवन करून आपले आरोग्य धोक्यात टाकतात.
Adolescent Children Addicted
Adolescent Children Addictedesakal
Updated on
Summary

मुलं व्यसनाकडे वळणार की नाही यामध्ये मुलाचे व्यक्तिमत्त्व, कुटुंबातील नातेसंबंध व मुलाची संगत हे महत्त्वाचे घटक असतात.

-श्रुतिका कोतकुंडे, सजग स्वास्थ्य क्लिनि

हल्लीच पुण्यात घडलेल्या दुर्घटनेमध्ये (Pune Porsche Accident) दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या कुमारवयीन गाडीचालकामुळे पौगंडावस्थेतील मुलांमधील व्यसनाधीनतेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. कुमारवयीन मुलांच्या मोठ्या मेंदूची पूर्ण वाढ झालेली नसल्यामुळे जोखीम घेणे व सतत कुठल्यातरी प्रलोभनाच्या शोधात त्यांचा मेंदू असतो तसेच पालकांपासून वेगळे स्वतंत्र असे अस्तित्व घडवण्याकडे त्यांचा कल असतो. त्यामुळे या अडनिड्या वयात मुलांची जबाबदारी पालकांसाठी तारेवरची कसरत असते.

कुमारवयीन मुलं या वयात समाजमान्य असे दारू, तंबाखू, गुटका, अमली पदार्थ व तत्सम पदार्थांचे सेवन करून आपले आरोग्य धोक्यात टाकत असतात. त्यांना मोठ्यांनी योग्य ती समज देऊन या धोक्याच्या वळणावरून सुखरूप दूर करण्याची गरज आहे कारण, भाविष्यात व्यसनाधीन होणाऱ्यांची व्यसनाची सुरवात कुमारवयातच होत असते.

Adolescent Children Addicted
पौगंडावस्था-तणावपूर्ण संक्रमणाचा काळ; कुमारवयात मुलींमध्ये आढळतात मुलांपेक्षा जास्त भावनिक समस्या!

कुमारवयीन मुलं व्यसन का करतात?

मुलं व्यसनाकडे वळणार की नाही यामध्ये मुलाचे व्यक्तिमत्त्व, कुटुंबातील नातेसंबंध व मुलाची संगत हे महत्त्वाचे घटक असतात. व्यसन जडणार अगर नाही हे खालील कारणावर ठरते.

  • परिवारातील व्यसन

  • मानसिक ताण, विकार

  • व्यक्तिमत्वातील चंचलता

  • जोखीम स्वीकारण्याची तयारी

  • मनावरचा आघात किंवा छळवणूक

  • न्यूनगंड किंवा आत्मविश्वास नसणे

कुमारवयीन मुलं सामाजिक ठिकाणी आपल्या मित्रांसोबत व्यसनाच्या संपर्कात येतात. दारू, गुटखा, तंबाखू सर्व ठिकाणी उपलब्ध असतात. प्रौढांसाठी त्याचे सेवन कायदेशीर समजले जात असल्यामुळे मुलांना ते स्वतःसाठीही सुरक्षित आहे असे वाटून ते त्याचा प्रयोग करु शकतात. मुलांमध्ये मित्रांनी सामावून घेण्याची मोठी गरज असते. त्यामुळे मित्र जर व्यसन करत असेल तर मुलं तसेच करण्याची शक्यता वाढते. तणाव घालवण्यासाठी, कुतुहलापोटी तर कधी बंड पुकारण्यासाठी मुले व्यसनाचा मार्ग निवडतात.

नकारात्मक परिणाम

कुतुहलाने सुरू झाले तरी त्याचा परिणाम व्यसन जडणे, नात्यातील व समाजात वागण्याचे अवधान नसणे, लैंगिक स्वैराचार, मानसिक व्याधी जडणे, जोखमीने गाडी चालवणे तसेच अभ्यासावरही परिणाम होतो. आरोग्यावरही विविध व्यसनांचा गंभीर परिणाम होताना दिसतात.

  • दारू – यकृतरोग, हृदयरोग, जठररोग, आतड्याचे रोग, मानसिक रोग

  • तंबाखू – फुप्फूस, जठररोग, कर्करोग

  • कोकेन - पक्षाघात, हृदयरोग, आकडी.

  • एक्सटेसी -यकृतातील बिघाड, हृदयबिघाड.

  • पेट्रोल किंवा डिझेल हुंगणे- हृदय, फुप्फूस, यकृत, किडनी रोग.

  • गांजा- स्मृतीदोष, एकाग्रता ढलणे किंवा मानसिक रोग, मेथॅम्फेटॅमिन - मानसिक आजार

  • अफू- फुप्फूस रोग

  • इलेट्रिक सिगारेट किंवा वेपिंग- धूम्रपानाचा धोका कैकपटीने वाढतो. प्रसंगी या सर्व पदार्थांच्या अतिसेवनानी मृत्यूही ओढवतो!

Adolescent Children Addicted
Dizziness Symptoms : चक्कर येण्याची कोणती आहेत कारणे? यावर कसा करता येईल उपाय? जाणून घ्या..

व्यसनापासून आपल्या पाल्याला दूर ठेवायचे असल्यास आपल्याला त्यांच्याशी संवाद साधणे अत्यंत गरजेचे आहे. हा संवाद घडेल ती जागा, ती वेळ खासगीपण जपणारी, दोघेही निवांत असताना कुठलेही व्यत्यय येणार नाही ही खबरदारी घ्यावी.

कधी बोलणे टाळावे – तुम्ही किंवा मूल रागावलेले असताना तसेच तुम्ही प्रतिप्रश्नांना उत्तर द्यायला तयार नसाल तर बोलणे टाळावे. मूल नशेत असताना बोलणे टाळावे. नशा उतरल्यावरच त्याच्याशी संवाद साधावा.

तुमच्या मुलाचे विचार समजून घ्या, लेक्चर देऊ नका. त्यांची मते व प्रश्न ऐकून घ्या. दारू, तंबाखू, अंमली पदार्थांबद्दल साधकबाधक खुली चर्चा होऊ द्या. मोकळेपणाने बोलल्यामुळे त्यांना शिक्षा होणार नाही तर एकत्र मिळून यातून मार्ग काढला जाईल हा विश्वास त्यांना द्या. व्यसन न करण्याच्या कारणावर चर्चा करा. व्यसनांमुळे त्यांना प्रिय असणाऱ्या खेळ, गाडी चालवणे, आरोग्य, रूपावर परिणाम होऊ शकतो यावर चर्चा करा.

Adolescent Children Addicted
तंबाखूच्या सेवनामुळे दरवर्षी होतो 60 लाख लोकांचा मृत्‍यू; 2030 पर्यंत जगात 80 लाखापेक्षा जास्‍त लोक गमावणार जीव!

माध्यमांमधून पसरणाऱ्या संदेशाचा विचार करा. सामाजिक माध्यमे, चित्रपटातून जी व्यसनाधीनता सर्रास दाखवली जाते त्यामुळे मुलाला व्यसन करणे भारी वाटू शकते. त्यातून आपल्या मुलाला काय वाटते ते जाणावे व वस्तुस्तिथी काय आहे ते समजवावे. मित्रांचे प्रेशर कसे हाताळायचे याबद्दल चर्चा करा व नकार कसा द्यावा याबद्दल मार्गदर्शन करा. पालकांनी स्वतःच्या व्यसनाबद्दल बोलण्याची तयारी ठेवावी. तुम्ही व्यसन करत नसाल तर ते का, ते सांगण्याची तयारी ठेवा व कधी केले असल्यास आपले अनुभव शेअर करा. यामुळे मूल मोकळेपणाने बोलू लागेल.

व्यसन टाळण्यासाठी इतर उपाय- आपल्या मुलाच्या कृतींबद्दल सजग राहा. ते कुठे असतात? कुठल्या विषयात त्यांना रस आहे ते समजून घ्या. आपल्या मुलाच्या मित्रांना ओळखा. मुलाला गरज असेल तेव्हा आधार द्या. स्वतः एक चांगले उदाहरण बना.

व्यसनाची लक्षणे ओळखा- मित्रांमधील बदल, सवयींमध्ये अचानक बदल, एकटे राहणे, पैशाची मागणी वाढणे, सातत्याने नियम मोडणे इ. असे झाल्यास मानसिक तयारीने सामोरे जा. आपले मूल नशेत अडकले आहे ही भावना तीव्र असते. तुम्ही खूप रागावू शकता त्यामुळे तुमच्या कुटुंबातील इतर जबाबदार व्यक्तीला सोबत घ्या. काय बोलायचे ते ठरवा. मुलाच्या प्रतिक्रियेनुसार आपले पुढचे पाऊल ठरवा. मुलाशी बोला. टाळू नका. बोलण्याने मार्ग मिळत जाईल. कायदेशीर बाबी समजून घ्या तसेच आरोग्याचे प्रश्न समजून घ्या. मुलाच्या प्रामाणिकपणाला प्रोत्साहन द्या. शांतपणे तुमची काळजी व्यक्त होऊ द्या, काळजीची कारणे नमूद करा. व्यसन करणे धोक्याचे असले तरी मुलाचा दुस्वास करू नका. आपल्या मुलाच्या बाबतीत सदैव दक्ष राहा. गरज भासल्यास व्यावसायिक समुपदेशकाची मदत घ्या.

(लेखिका मनोविकार व मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.