Health: उत्तानपादासन;असे करावे आसन,यामुळे अनेक आजार नाहीसे होतात

या आसनात पोटावर उत्तम दाब येतो. त्यामुळे पोटातील इंद्रिये अधिक कार्यक्षम होऊन त्यांचे कार्य सुधारते, त्यांची ताकद वाढते.पोटाच्या बारीक-सारीक तक्रारी दूर होतात. अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठता, वात यांचा त्रास कमी होण्यास मदत होते.मांडीचे स्नायूसुद्धा अधिक सुदृढ होतात. कंबरेची ताकद देखील वाढते. सुरुवातीला पोट-पाय-कंबर दुखू शकते. परंतु नियमित सरावाने लाभ होतो. सुरुवातीला..
organs improved strength increases stronger
organs improved strength increases strongersakal
Updated on

Health- सध्याच्या धावपळीच्या दिवसांत जीवनात आपण स्वतःकडे व्यवस्थित पूर्णपणे लक्ष देऊ शकत नाही, जसे की खाण्यापिण्याच्या योग्य सवयी,

योग्य व परिपूर्ण व्यायाम, झोपेच्या वेळा, मानसिक व शारीरीक ताण इत्यादी. यांमुळे आपले वजन वाढते, मानसिक व शारीरीक त्रास सुरू होतात.

पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी व स्नायूंची ताकद वाढवण्यासाठीचे एक आसन आज आपण उत्तानपादासन हे आसन पाहणार आहोत.

असे करावे आसन

उत्तानपादासन हे शयनस्थिती, म्हणजेच पाठीवर झोपून करण्याचे आसन आहे. दिसताना सोपे असले, तरी आसनाचा सराव करताना त्याचे महत्त्व लक्षात येतेच.

प्रथम पाठीवर झोपावे. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेत असावे.

श्वास घेत हळूहळू दोन्ही पाय गुडघ्यात न वाकविता जमिनीपासून वरच्या दिशेला उचलावे. दोन्ही पाय जुळलेले असावेत.

डोक्याची मागची बाजू, पाठ व दोन्ही हात जमिनीवर टेकलेले असावेत.

सुरुवातीला दोन्ही पाय व पोट यांच्यामध्ये नव्वद अंशांचा कोन होईल अशी स्थिती असावी. म्हणजेच पाय जमिनीपासून काटकोनात राहतील अशी स्थिती घ्यावी.

या आसनस्थितीची सवय झाल्यावर दोन्ही पाय जमिनीपासून ४५-६० अंशाच्या कोनात राहतील, अशी पायांची स्थिती असावी. छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे साधारण स्थिती घेण्याचा प्रयत्न करावा.

organs improved strength increases stronger
Life Changing Habits : या सवयी बदलतील तुमचं आयुष्य

आसनस्थितीमध्ये शक्य तेवढा वेळ स्थिर राहावे.

आसन सोडताना सावकाश पाय खाली जमिनीवर आणावेत. आसनस्थितीमध्ये श्वसन संथ सुरू असावे.

आसनाचे फायदे

  • या आसनात पोटावर उत्तम दाब येतो. त्यामुळे पोटातील इंद्रिये अधिक कार्यक्षम होऊन त्यांचे कार्य सुधारते, त्यांची ताकद वाढते.

  • पोटाच्या बारीक-सारीक तक्रारी दूर होतात. अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठता, वात यांचा त्रास कमी होण्यास मदत होते.

organs improved strength increases stronger
Women Life : लैंगिक संबंध महिलांसाठी का आवश्यक आहेत ?
  • मांडीचे स्नायूसुद्धा अधिक सुदृढ होतात. कंबरेची ताकद देखील वाढते. सुरुवातीला पोट-पाय-कंबर दुखू शकते. परंतु नियमित सरावाने लाभ होतो.

  • सुरुवातीला दोन्ही पाय उचलणे जमत नसेल, त्यांनी एक-एक पायाने करावे किंवा योगाबेल्टच्या साहाय्याने करावे.

  • पायदुखी, गुडघेदुखी, टाचदुखी, व्हेरिकोज व्हेन्स हे त्रास कमी होण्याससुद्धा मदत होते.

  • मासिक पाळीच्या दिवसात किंवा गरोदरपणात, पोटाचे काही तीव्र त्रास असतील किंवा कुठली शल्यकर्मे झाली असल्यास आसन करू नये किंवा तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.