सध्या लॉकडाउनचा lockdown काळ सुरु असल्यामुळे अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची work from home सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे अनेक जण गेल्या दीड वर्षांपासून घरुनच काम करत आहेत. त्यामुळे या काळात प्रवासाचा ताण जरी कमी झाला असला तरीदेखील अनेक शारीरिक तक्रारींनी डोकं वर काढलं आहे. १२-१२ तास एकाच जागी, एकाच स्थितीत बसून काम केल्यामुळे अनेक जण सध्या पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी pain किंवा अन्य समस्यांनी त्रस्त आहेत. मात्र, या समस्यांवर मात करायची असेल तर नियमित मार्जरासन करणं अत्यंत गरजेचं आहे. (health-yoga-do-marjaryasana-to-get-rid-of-shoulder-pain-bgys)
मार्जरासन करण्याचे फायदे -
१. पाठीच्या कणाची लवचिकता वाढते.
२. मान व पाठीच्या स्नायूंची लवचिकता वाढते.
3. बरगड्यांच्या पिंजऱ्याची उघडझाप व्यवस्थित होते.
४. गर्भाशयाशी निगडीत समस्या दूर होतात.
५. पचनसंस्थेचं कार्य सुधारतं.
६. रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुरळीत होते.
७. कामातील एकाग्रता वाढते, मन शांत करते.
८. हात, खांदे आणि मनगट मजबूत करण्यात मदत मिळते.
९. पाठ आणि ओटीपोटातील स्नायूंवर ताण येऊन त्या भागातील समस्या दूर होतात.
१०. पाठदुखीची समस्या दूर होते.
कसे करावे मार्जरासन -
१. मार्जरासन करताना प्रथम दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवावे. त्यानंतर पुढे वाकून हातदेखील जमिनीवर टेकवावेत.
२. गुडघे व हात जमिनीला टेकवल्यावर तुमचे खांदे व मांड्या ताठ राहतील याची काळजी घ्यावी
३. त्यानंतर दिर्घ श्वास घ्या आणि आकाशाकडे मान उंच करा. मान उंच करताना पाठ जमिनीच्या दिशेने खाली वाकवा.
४. साधारणपणे ३ सेकंद या स्थितीत रहा आणि त्यानंतर हळूहळू श्वास सोडा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.