आपण मागील भागात प्रथिनांचे स्रोत कोणते व शरीरासाठी का आवश्यक आहेत, याबद्दल वाचले. या भागात आपण प्रथिने किती प्रमाणात घ्यावीत आणि अधिक किंवा कमी झाल्यास त्याचे काय दुष्परिणाम होतात, याबद्दल माहिती घेणार आहोत.
तुम्हाला किती प्रथिने गरजेची आहेत...
एका प्रौढ व्यक्तीला तिच्या वजनाच्या प्रत्येक किलोग्रॅममागे ०.७५ ग्रॅम प्रथिनांची गरज असते. मात्र, शरीराचा आकार आणि तो कोणत्या प्रकारचे काम करतो, यानुसार यात बदल होऊ शकतो. दमवून टाकणारे व्यायाम आणि स्नायू बळकट करणारे व्यायाम करणाऱ्यांना प्रथिनांची अधिक गरज पडते. शारीरिक वाढ होत असताना प्रथिनांची गरज अधिक असते, जसे मुलांमधील वाढीचे वय, गरोदरपण आणि स्तन्यपान किंवा एखादी जखम भरून येत असताना किंवा शस्त्रक्रियेतून बरे होताना. दिवसभरात शरीरासाठी आवश्यक असलेल्या उष्मांकांपैकी (कॅलरीज) १० ते ३५ टक्के प्रथिनांमधून मिळतात.
खूप जास्त किंवा एकदम कमी...
विकसित देशांमध्ये प्रथिनांची कमतरता अभावानेच पाहायला मिळते. हा धोका असणाऱ्यांमध्ये डाएट करणारे व या काळात काही न खाणारे किंवा शरीरासाठी आवश्यक अन्नघटक ने घेणारे, खाण्यासंदर्भातील आजार असलेले किंवा वेळ नसल्याने, प्रवासात असल्याने, वृद्धापकाळाने किंवा अन्न शिजवण्यासाठीच्या गोष्टी उपलब्ध नसल्याने अन्न शिजवून खाऊ न शकणाऱ्यांचा समावेश होतो.
प्रथिने आणि प्रमाणबद्ध शरीर... अधिक प्रमाणात प्रथिने असलेले अन्न घेण्याचे अनेक फायदे आहेत...
व्यायामानंतर किंवा एखाद्या मोठ्या अपघातानांतर शरीराची झीज वेगाने भरून निघते.
स्नायूंची होणारी हानी कमी प्रमाणात होते.
शरीरातील कमकुवत मांसपेशींची चांगल्या प्रकारे वाढ होते.
शरीराला आवश्यक
वजन कायम राखले जाते.
भूकेवर नियंत्रण ठेवता येते.
मग, तुम्ही तुमच्या शरीरासाठी आवश्यक प्रथिने ग्रहण करीत आहात का... तुम्ही शरीरासाठी उष्मांक, साखर आणि मिठाचे प्रमाण योग्य आहे का हे तपासता, त्याचप्रमाणे आवश्यक प्रथिने घेत आहात का, हेही तपासा. प्रथिने शरीरातील प्रत्येक पेशीची निर्मिती आणि देखभालीमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. ते आपल्या पेशींना इंधन पुरवतात व शरीराची ऊर्जेची गरज भागवतात.
शेवट करताना, प्रथिने अमिनो अॅसिड्सपासून बनलेली असतात. त्यांच्या उल्लेख बिल्डिंग ब्लॉक असा करतात, कारण एकमेकांना लांब साखळीसारखे जोडलेले असतात. त्यांना मॅक्रोन्यूट्रियन्टस मानले जाते, कारण ते तुम्ही सुदृढ राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात आवश्यक असतात. सुदृढ राहा, आनंदी राहा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.