म्युकरमायकोसिसबाबत तुम्हाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर; जाणून घ्या

म्युकरमायकोसिसबाबत तुम्हाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर; जाणून घ्या
Updated on

नागपूर : देशात कोरोनासह अजून एका आजाराचा प्रचंड धोका निर्माण झाला आहे. तो आजार हणजे म्युकरमायकोसिस (Mucormycosis). हा आजार नक्की कसा होतो? हा आजारही कोरोनासारखा (Coronavirus) संसर्गजन्य आहे का? असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहेत. अशाच काही प्रश्नांची उत्तर देणार आहोत आणि काही समस्यांचं समाधान आम्ही करणार आहोत. जाणून घ्या काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं. (here are solutions of all your problems regarding Mucormycosis)

म्युकरमायकोसिसबाबत तुम्हाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर; जाणून घ्या
बापरे! गाईच्या पोटातून निघाले तब्बल ८० किलो प्लास्टिक

बुरशी नेमकी कुठे येते? कशी असते?

ओलसर आणि दमट वातावरण असलेल्या ठिकाणी बुरशीची अत्यंत वेगाने वाढ होते. ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही आणि हवेचा वावर मुक्तपणे होण्यास अडथळा असतो अशा ठिकाणीच बुरशी झटपट वाढते. याचा अर्थ असा आहे का की ज्या ठिकाणी मुबलक सूर्यप्रकाश आणि खेळती हवा असते त्याठिकाणी बुरशीला वाढण्यास फार कमी वाव असतो. बुरशीचे अनेक प्रकार आहेत. काळी, पांढरी, राखाडी, हिरवा रंग.

प्रादुर्भावामागील कारण

खेळती हवा आणि सूर्यप्रकाशामुळे बुरशीची वाढ होण्यास अटकाव होतो. कोरोना आजारातून बऱ्या झालेल्या काही लोकांना म्युकरोमायसिस हा आजार आपल्या कवेत घेतो आणि खूप मोठ्या काळजीत टाकतो. बुरशीचा आजार ओलसर आणि दमट ठिकाणी बंद ठिकाणी चटकन निर्माण होतो, पसरतो, वाढतो.

इम्युनिटी घटली की आजार बळावतात

लोकांना बुरशीचा संसर्ग नाकातील पोकळीमध्ये, घशात झालेला असतो ज्यामुळे अनेकांचे डोळे खराब होतात, टाळूला छिद्र पडते. कारण काय? तर तुमची इम्युनिटी खूप कमी झालेली आहे. अशा इम्युनिटी कमी झालेल्या व्यक्ती या आजाराला सहज बळी पडतात.

बुरशीला कशामुळे मिळते आमंत्रण?

  • कोरोनावरच्या औषध उपचारामुळे

  • मास्क नियमितपणे न बदलणे

  • दिवसातील चोवीस तास मास्क तोंडावर बांधून ठेवल्यामुळे

  • सूर्यप्रकाशात न बसल्यामुळे

  • नाकाच्या मार्गाची, घशाची नियमितपणे स्वच्छता न केल्यामुळे

  • बुरशीला वाढ होण्यासाठी अत्यंत पोषक वातावरण मिळते

काय करायला हवं?

  • कोरोनावर औषध उपचार तर करणं गरजेच आहे

  • कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करा

  • आपण वापरत असलेले मास्क वेळच्या वेळी स्वच्छ करा

  • जर तुम्ही एकांतात असाल तर मास्क घालून न बसता मोकळी हवा येईल, खूप सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी बसा

  • सर्दीने नाक चोंदलेले असते ते वेळच्या वेळेस स्वच्छ करा

  • गरम पाण्याच्या गुळण्या करून घसा आणि तोंड निर्जंतुक करत राहा..

  • नासिका मार्गाची अत्यंत कुशलता पूर्वक सफाई करा

जबाबदारी उचला

सगळ्याच गोष्टींना डॉक्टरांना जबाबदार धरणे सोडून द्या. औषधोपचारमुळे तुमची इम्युनिटी कमी झाली आहे म्हणून औषधोपचारावरतीही घसरू नका. लक्षात ठेवा आपली जबाबदारी आपणच उचलायला हवी. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला व मार्गदर्शन गंभीरपणे घेतले तर काळी बुरशी नावाचा आजार तुमच्या जवळ पासही भटकणार नाही.

स्वतःला तंदुरुस्त कसे ठेवावे

  • स्वतःच्या शरीराची, घराची, परिसराची नियमित स्वच्छता

  • मोकळी हवा येऊ द्या, सूर्यप्रकाश आवश्यक आहे

  • योगासने करा, नियमित व्यायाम करणे गरजेचे

मास्कमधून प्रादुर्भावाची भीती?

कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हानिकारक असतो. जर तुम्ही गर्दीमध्ये नसाल, ग्रुपमध्ये इतरांच्या सोबत नाही आहात, मोकळ्या वातावरणात किंवा आपल्याच घरी एकांतात असाल तर मास्कला शंभर टक्के बाजूला ठेवा आणि मोकळा श्वास घ्या. यामुळे ऑक्सिजन लेव्हल झटपट वाढण्यास मदत होते.

भाजीपाल्यामधून बुरशीचा संसर्ग होतो?

ताजा भाजीपाला हा आरोग्यासाठी उत्तम आहे. मात्र त्यावर वापरली जाणारी कीटकनाशके, विक्री करताना धूळ, माती आणि वारंवार पाण्याच्या शिडकाव्याने काही काळानंतर भाजीपाला खराब होतो. त्यावर बुरशी येते. ती फेकून देणे योग्य. भाजीपाला घरी आणताना हिरवागार, टवटवीत, ताजा आणावा. मीठ, गरम पाण्यात धुवून तो निर्जंतुक केला पाहिजे.

स्टीम मशीनमधूनही फंगसचा धोका?

कोरोनाकाळात वाफ घ्यावी असा समज नागरिकांमध्ये पसरल्याने ऑटोमॅटिक स्टीम मशिनची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात वाढली. पोस्ट कोविड काळात मात्र या मशीनमधुनही बुरशीचा प्रादुर्भाव होत असल्याचे अनेकांचे मत आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार पाणी खूप काळ साठवलेले असले तर बुरशीचा प्रादुर्भाव शक्य आहे. मात्र नियमितपणे पाणी बदलले व मशिन, यंत्राला स्वच्छ ठेवले तर बुरशीचा धोका टाळता येणे शक्य आहे.

म्युकरमायकोसिसबाबत तुम्हाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर; जाणून घ्या
नागपूरकरांनो सावधान! जिल्ह्यात वाढतोय म्युकरमायकोसिस; आतापर्यंत ४६ मृत्यू

पावसाळ्यात वाढणार बुरशीची भीती?

पावसाळ्यात सूर्यप्रकाश कमी असतो. वातावरणात दमटपणा, ओलसरपणा जास्त असतो. अशा वातावरणात बुरशीची वाढ जोमाने होते. मात्र, योग्य स्वच्छतेसह योग्य काळजी घेतल्यास व तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उपाययोजना केली तर बुरशीला नियंत्रणात ठेवणे शक्य आहे.

(here are solutions of all your problems regarding Mucormycosis)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.