मधमाशी चावल्यानंतर वेदना होतात? एकदा ट्राय करा 'हे' घरगुती उपाय

Bee
Beee sakal
Updated on

नागपूर : एखादा किटक चावतो तेव्हा त्वचा लालसर होते. तसेच त्याठिकाणी खाज देखील सुटते. मात्र, मधमाशी चावते (bee stings) तेव्हा असह्य वेदना होतात. अस्वस्थपणा जाणवतो. अनेकजण या वेदना सहन करतात. तसेच ज्याठिकाणी मधमाशी चावते त्याठिकाणी सूज येणे आणि खाज सुटण्याची समस्या देखील जाणवते. या वेदना कमी करण्यासाठी आज आम्ही काही घरगुती उपाय (home remedies) सांगणार होतो. (home remedies to relief from bee stings)

Bee
केंद्राच्या सांगण्यावरून ट्विटरची नोटीस; कार्टूनिस्टने दिलं उत्तर

मधमाशी चावलेल्या ठिकाणी लोखंड लावा -

जर आपल्याला मधमाशी चावली असेल तर चावा घेतलेल्या ठिकाणी लोखंडाचा तुकडा लावा. थोड्यावेळानी या वेदना कमी होण्यास मदत होईल. यासाठी कुलूप, साखळी अशा लोखंडाच्या कोणत्याही वस्तू वापरू शकता. त्यानंतर त्यावर टूथपेस्ट लावा. त्यामुळे त्याजागी थंडपणा जाणवेल.

मधमाशीने चावा घेतलेल्या ठिकाणी चुना लावा

मधमाशीच्या डंकांचे दुष्परिणाम दूर करण्यासाठी चुना उपयुक्त आहे. कधीकधी काट्यामुळे वेदना सातत्याने वाढतच असते. त्यामुळे काटे सर्वात आधी काढून टाका. त्यानंतर चुन्यामध्ये थोडंस पाणी घालून पेस्ट तयार करा. त्यानंतर हा चुना चावा घेतलेल्या ठिकाणी लावा. यामुळे वेदना कमी होण्यास मदत होईल.

मध एक रामबाण औषध -

मधमाशी चावलेल्यानंतर त्यावर उपाय म्हणून मध देखील वापरले जाऊ शकते. मधामध्ये अँटी-बॅक्टेरियाचे गुणधर्म असतात. त्यामुळे चावा घेतलेल्या ठिकाणी मध लावल्यास वेदना कमी होतात. तसेच सूज येणे, खाज सुटणे यासारख्या समस्या देखील दूर होतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.