होमिऑपेथी औषध नुसते का चघळायचे? जाणून घ्या यामागचे शास्त्र

औषधांचा आणि जिभेचा मोठा संबंध असतो
homeopathy
homeopathy
Updated on

अनेक लोकांना होमिओपॅथिक औषधे घेणे आवडते. कारण ती अगदी लहान तर असतातच पण पटकन गिळता येतात. त्यामुळे असे पटापट औषध घेता येत असल्याने लहान मुलांना तर ती घेणे खूप आवडते. महत्वाचे म्हणजे होमिओपॅथिक औषधे (Homeopathic ) शारीरिक समस्या दूर करण्यास खूप महत्वाची असतात. होमिओपॅथिक औषधांमध्ये वनस्पती (Plants) आणि खनिज (Minerals) या नैसर्गिक गोष्टींचा वापर केला जातो. यापासून लहान आकाराची औषधे तयार केली जातात. ही औषधे जिभेवर ठेवून चघळायची असतात. पण असे का केले जाते याविषयी तुम्हाला माहिती आहे का? यासाठी होमिओपॅथीचे तज्ज्ञ विज्ञानाच्या तर्काचा आधार देतात. होमिओपॅथिक औषधांचा मज्जासंस्थेवर थेट परिणाम होतो. जिभेतूनच ती मज्जासंस्था सक्रिय करते, असे तज्ज्ञ सांगतात.

homeopathy
महिन्यात ५ किलो वजन कमी करायचंय? हा घ्या डाएट प्लॅन

औषधांमुळे असा होतो परिणाम

होमिओपॅथिक डॉक्टर रितू रॉय यांच्या मते, होमिओपॅथिक औषधे आपल्या मज्जासंस्थेला उत्तेजित करण्यासाठी तयार केली जाते. संपूर्ण मज्जासंस्था जिभेशी जोडलेली असते. त्यामुळे आपण औषधे पहिल्यांदा जिभेवर ठेवतो. नाहीतर त्याचा उपयोग होत नाही. जिभेवर ठेवल्याने औषधाचा संपूर्ण मज्जासंस्थेवर परिणाम होतो. औषध मज्जासंस्थेत जाईपर्यंत काही खाऊ नये असे म्हणतात. म्हणून होमिओपॅथिक औषधे घेतल्यानंतर अर्धा तास आधी आणि नंतर काहीही खाल्ले-प्यायले जात नाही.

homeopathy
Lassa fever चं संकट! जाणून घ्या लक्षणं आणि तो कसा पसरतो?
Homeopathic remedies
Homeopathic remedies

मज्जातंतूंची भूमिका

डॉ प्रांजली श्रीवास्तव यांनी यासंदर्भात युट्यूबवर व्हिडिओ शेअऱ केला आहे. त्यात त्या सांगतात की, होमिओपॅथिक औषधं घेण्याची प्रक्रिया तोंडाद्वारे सुरू होते. बहुतेक चेतापेशी जिभेला जोडलेल्या असतात. म्हणूनच होमिओपॅथीचे डॉक्टर औषधे जिभेवर ठेवून चघळायला सांगतात. कारण त्यामुळे औषधांतील रसायने जिभेवर आल्याने प्रत्येक चेतापेशीत जाऊ शकतील. शरीरात कुठेही समस्या असेल तर त्या अवयवांपर्यंत औषधे मज्जातंतूंद्वारे पोहोचतात. मात्र काही द्रव स्वरूपातील औषधे अशाप्रकारे घेता येत नाहीत.

homeopathy
किराणा ऑनलाईन मागवत असाल, तर हे वाचा!

औषधे जिभने घेण्यामागील विज्ञान

अॅलोपाथी औषध खाल्ल्यावर ते प्रथम आतड्यात जाते. पण होमिओपॅथिक औषधांचे रसायन समस्या असलेल्या अवयवांपर्यंत पोहोचवणे हा उद्देश असतो. त्यामुळे एकदा होमिओपॅथिक औषध घेतल्यावर थेट रक्ताभिसरणापर्यंत पोहोचते. या औषधांचा आपल्या शरीरावर कोणाताही दुष्परिणाम होत नाही. होमिओपॅथिक औषधात असलेले रसायन जिभेखालील म्यूकस मॅब्रेनच्या संपर्कात येते. हे रसायन संयोजी ऊतींमध्ये (connective tissue) पसरते. त्या खाली एपिथेलियम (epithelium) पेशी असून त्यात केशिका (capillaries) असतात. औषधातील ही रसायने नळ्यांद्वारे रक्ताभिसरण यंत्रणेपर्यंत पोहोचतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.