नागपूर : मधुमेह शरीरातील अनेक भागांवर परिणाम करतो. यामध्ये त्वचेचा देखील समावेश आहे. रक्तातील साखर वाढल्यास तुम्ही अनियंत्रित मधुमेहाने ग्रस्त आहात, असा त्याचा अर्थ होतो. यामध्ये तुम्हाला रक्त्तातील साखर नियंत्रित करणे गरजेचे आहे. नाहीतर त्वचेवर काळे डाग तुमच्या गोऱ्या रंगाला प्रभावित करू शकतात. तसेच त्वचेवर खाज देखील सुटू शकते. मधुमेह होण्यापूर्वी आपले शरीर आपल्याला काही संकेत देत असते. आज आपण तेच बघुयात.
त्वचेवर पिवळे, लाल आणि पांढरे डाग -
चमकदार त्वचा जवळपास चिनीमातीच्या भांड्यासारखी दिसते. पण, मधुमेह होण्यापूर्वी त्वचेला खाज सुटते आणि दुखते. त्यानंतर काही वेळानी हा त्वचारोग निष्क्रिय होतो. त्यानंतर परत सक्रिय होतो.
हार्ड स्किन -
मधुमेह होणार असेल तर तुमची त्वचा टणक होते. तसेच बोटे देखील टणक होऊन हालवणे मुश्लिकल होऊ शकते. तुम्हाला अनेक दिवसांपासून मधुमेह असेल तर तुमच्या बोट अडकल्यासारखे वाटतात.
फोडे -
हे लक्षण फारसे दिसत नाही. मात्र, मधुमेह असलेल्या काही लोकांच्या त्वचेवर फोडे येतात. एक फोड आल्यानंतर लगेच दुसरा फोड तयार होतो. तसेच ही जखम लवकर भरत नाही.
त्वचेचा संसर्ग -
मधुमेहाचा भास असेल त्यांना त्वचेचे संक्रमण देखील होते. अनेकवेळा त्वचेला खाज सुटते. तसेच पुरळ देखील उठते.
जखमी लवकर न भरणे -
मधुमेह असलेल्या लोकांना काहीही झाले तरी जखमी लवकर भरत नाही. ब्लड सर्क्युलेशन चांगले होत नसल्याने शरीरातील जखमा भरण्यास अडचण निर्माण होते.
मधुमेहाचे इतर लक्षणे -
रक्तातील साखर कमी करण्यासाठी उपाय -
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.