कोरोना आपल्या फुफ्फुसांवर कसा करतो हल्ला? काय म्हणतात संशोधक...

कोरोना आपल्या फुफ्फुसांवर कसा करतो हल्ला? काय म्हणतात संशोधक...
Updated on

मुंबई - कोरोनाबाबत नवनवीन रिपोर्ट्स जगासमोर येत्यात. याच पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा रिपोर्ट आता समोर आलाय. हा रिपोर्ट अत्यंत महत्त्वाचा अशासाठी मानला जातोय कारण यामध्ये आपल्या लंग्स म्हणजेच फुफ्फुसांमधील रक्तवाहिन्यांमध्ये तयार होणाऱ्या बारीक गुठळ्यांमुळे आपल्या श्वासावर कसा परिणाम होतो यावर अभ्यास केला गेलाय. 

जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे आपल्या फुफ्फुसांवर सर्वाधिक परिणाम होतो. मात्र नक्की असं का होतं, यामुळे फुफ्फुसांवर परिणाम होऊन फुफ्फुसं कसं बंद पडतं, काही केसमध्ये माणसाचा मृत्यू देखील होतो, हे कसं होतं याबाबत अद्याप फार अभ्यास झालेला नाही म्हणूनही हा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे.     

मुंबईतील एका हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या माहितीप्रमाणे, डॉक्टरांकडून कोरोनामुळे बाधित फुफ्फुसाला  'ग्राउंड ग्लास अपिअरन्स' असं संबोधलं जातं. फुफ्फुसांमधील इन्फेक्शन किंवा संसर्ग शोधण्यासाठी एक्स रे हा पर्याय सर्वाधिक वापरला जातो. ज्यामध्ये फुफ्फुसांमधील पांढरे ठिपके दिसून येतात. मात्र एक्स रे मधून दिसून येणारं फुफ्फुस हे बऱ्याच अंशी सर्वसाधारणपणे दिसणाऱ्या फुफ्फुसांसारखंच दिसतं. मात्र सीटी स्कॅनमधून करण्यात येणारी तपासणी ही H1N1 विषाणूपेक्षा कोविडचा विषाणू कसा वेगळा आहे याची काही अंशी स्पष्टता देते.

याचसोबत मुंबईतील मुलुंड भागातील फोर्टिस हॉस्पिटलच्या ICU विभागाचे प्रमुख डॉक्टर राहुल पंडित यांनी याबाबत अधिक माहिती दिली. त्यांच्या सांगण्याप्रमाणे कोरोनाचा विषाणू हा आपल्या फुफ्फुसांच्या परिघावर परिणाम करतो, दरम्यान इतर संसर्ग उदाहरणार्थ न्यूमोनियासारखा संसर्ग हा थेट फुफुसांच्या मध्यावर हल्ला करतो असं त्यांचं म्हणणं आहे. 

माणसाचं कोरणामुळे निधन झाल्यानंतर त्यातून संसर्ग पसरू नये म्हूणन पोस्टमोर्टम बहुदा होत नाही. अशात गेल्या आठवड्यात अमेरीकेतील 'न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन'मध्ये कोविड आणि त्याचा फुफ्फुसांवरील परिणाम यावर प्रकाश टाकण्यात आला. याचसोबत हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये देखील यावर अभ्यास सुरु आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये ७ कोरोनाबाधित रुग्णाचं शवविच्छेदन करण्यात आलं. या शवविच्छेदनात इन्फ्लूएन्झा आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यमध्ये काय फरक आहे यावर अभ्यास झाला. 

निष्कर्षांची तुलना केल्यानंतर, कोरोनामुळे मृत रुग्णाच्या फुफुसांमधील छोट्या लहान हवेच्या पिशव्यान्मध्ये (alveoli/अल्वेओली) मध्ये रक्ताच्या गुठळ्या आढळल्या. या अभ्यासावर एक थेअरी देखील मांडली गेली, यामध्ये कोरोना अल्वेओली मधील एंडोथेलियल पेशींवर परिणाम करतो. यामुळे रक्तात गुठळ्या होऊ शकतात असं म्हटलंय. 

मुंबईतील डॉक्टर पंडित यांच्या माहितीप्रमाणे फुफ्फुसांमधील कोरोना संसर्गाच्या दोन प्रक्रिया आहेत. यामध्ये न्यूमोनियामध्ये ज्याप्रकारे फुफ्फुसांचा संसर्ग होतो आणि फुफ्फुसं बंद पडतात ही त्यातील एक. तर,  फुफ्फुसातील बारीक हवेच्या पिशव्यांमधील रक्तात होणाऱ्या गुठळ्या आणि त्याचा फुफ्फुसांवरील परिणाम ही दुसरी प्रोसेस असल्याचं त्यांनी म्हटलंय.

डॉक्टर पंडित यांच्या माहितीप्रमाणे एक्सरे आणि CT स्कॅनमध्ये फुफ्फुसांमध्ये न्यूमोनियाने होणारे पांढरे ठिबके स्पष्ट दिसू शकतात मात्र. CT स्कॅनमध्ये देखील काहीवेळेस फुफ्फुसांमधील रक्ताच्या गुठया दिसत नाहीत. म्हणूनच शरीरातील रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण तपासण्यासाठी ऑक्सिमीटरचा वापर करण्यात येतो.     

फुफ्फुसातील रक्तात गुठळ्या झाल्याने दम लागणे त्यांसोबत रुग्ण कोसळणे यासारखे प्रकार पाहायला मिळतात. डॉक्टरांच्या माहितीप्रमाणे कोरोनामुळे होणाऱ्या संसर्गात फुफ्फुसांमधील विविध भागांचा समावेश असल्याचं सांगितलं जातं 

BIG NEWS - अरे वाह! कोरोनाच्या लढतीत मुंबईकरांच्या हाती आणखी एक यश...
हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधील आभ्यासात काय निष्कर्ष समोर आलेत ? 

  • यामध्ये फुफ्फुसांमध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग आढळून आला.
  • मुख्यत्त्वे फुफ्फुसांमधील लहान हवेच्या पिशव्या यांच्यामध्ये मोठया प्रमाणात संसर्ग झाल्याचं समोर आलं 
  • यामध्ये अल्वेओलीमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्याचं समोर आलं. 
  • फुफ्फुसांमध्ये होणाऱ्या संसर्गामुळे तो रोखण्यासाठी फुफ्फुसांमध्ये काही नवीन 'व्हेसल्स' तयार होतात 
  • कोरोनामुळे होणाऱ्या बळींमध्ये आणि इन्फ्लूएन्झामुळे होणाऱ्या बळींमध्ये कोरोना रुग्णाच्या फुफुफ्सांमध्ये कमालीचा संसर्ग झाल्याचं देखील समोर आलंय. 

how covid 19 attacks our lungs read inside story

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.