नागपूर : किशोरवयीन मुलांना अनेकदा तीव्र राग येतो. मात्र, ही समस्या कशी सोडवायची याच चिंतेत अनेकजण असतात. अनेक कारणांमुळे त्यांना राग येत असतो. तसेच हाच राग ते अनेक माध्यमातून व्यक्त करताना दिसतात. मात्र, याचा प्रत्येकाला त्रास होत असून रागावर नियंत्रण कसे मिळवायचे हेच अनेकांना माहिती नसते. यामुळे किशोरवयीन मुले अनेक समस्यांचा सामना करत असतात. मात्र, एकदा का तुम्ही तुमच्या पाल्यांना रागावर नियंत्रण कसे मिळवायचे हे शिकविले, तर ते उत्तमरित्या हे काम करू शकतील.
राग ही एक अशी भावना आहे जी किशोरवयीन मुलांसाठी बर्याचदा आव्हानात्मक असते आणि काही वेळा ती घातकसुद्धा ठरू शकते. रागावर नियंत्रण कसे मिळवायचे हे माहिती नसलेले किशोरवयीन मुलं-मुली रागाच्या भरात घातक कृतीही करू शकतात. त्यामुळे इतरांना धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. राग ही एक अशी भावना आहे, ज्यामध्ये किशोरवयीन दुःख, निराशा यांसारख्या भावनांकडे दुर्लक्ष करतात. मुले रागात असल्यास त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे, त्यावर आरोग्यदायी काही उपचार आहेत का? याबाबत माहिती घेतली पाहिजे.
राग खरोखरच समस्या आहे का? -
राग येणे ही अनेक किशोरवयीन मुलांसाठी समस्या नाही. राग आल्यामुळे शारीरिक किंवा मनातून दुःखी वाटू शकते. पण, या भावना व्यक्त करण्यासाठी ही योग्य वेळ असते. त्यामुळे तुमच्या पाल्यांना राग आल्यास ते स्वतःला किंवा दुसऱ्याला काही इजा पोहोचवणार नाही, याबाबत आपण काळजी घ्यायला पाहिजे
राग व्यक्त करण्यासाठी काही उपाय -
अतिक्रोधित किशोरवयीन मुलांना रागावर नियंत्रण मिळविण्यासाठी काही पर्याय आहेत. संतप्त किशोरवयीन मुलीला रागाचा सामना करण्यासाठी पालक मदत करू शकतात.
शारीरिक हालचाली -
राग आल्यानंतर काहीतरी शारीरिक हालचाली करणे गरजेचे असते. तुम्ही एखादा खेळ खेळू शकता किंवा काही व्यायाम देखील करू शकता. त्यामुळे रागावर सहज नियंत्रण मिळविता येईल.
पचिंग बॅग -
राग सुरक्षितपणे व्यक्त करायचा असल्यास पंचिंग बॅग एक उत्तम उपाय आहे. तसेच तुम्ही उशी किंवा फोमला देखील मारून आपला राग व्यक्त करू शकता.
वेळ द्या -
किशोरवयीन मुलांना जेव्हा राग येतो तेव्हा त्यांना एकटे सोडा. त्यांना त्यांचा वेळ द्या. त्यांना जे काही करायचे आहे, ते करू द्या. त्यामुळे ते त्यांच्या रागावर नियंत्रण मिळवू शकतील.
म्युझिक -
रागाची भावना व्यक्त करण्यासाठी म्युझिक महत्वाची भूमिका बजावते. या काळात तुम्ही गाणं गाऊ शकता, डान्स करू शकता. त्यामुळे लगेच रागावर नियंत्रण मिळविणे शक्य होईल.
काहीतरी लिहून किंवा चित्र काढूनही तुमचा राग सुरक्षितपणे व्यक्त करू शकता.
वरील सर्व उपाय करून देखील तुमच्या पाल्यांना आपल्या रागावर नियंत्रण मिळवता येत नसेल, तर मग डॉक्टरांचा, किंवा मनसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. त्याद्वारे त्यांना राग येण्याचे मूळ कारण काय आहे, हे तुम्हाला समजू शकेल.
संकलन व संपादन - भाग्यश्री राऊत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.