पालकांचा मुलांच्या मित्रांसोबत व्यवहार कसा असावा? वाढत्या वयातील 'मैत्री' कशी जपली पाहिजे? जाणून घ्या..

वयात येणारी मुलं विविध माध्यमातून बाहेरच्या समाजाशी जास्तीत जास्त संपर्कात येत असतात.
Friendship
Friendshipesakal
Updated on
Summary

मित्रांमुळे मुलांना सोबत व साथ मिळते, आधार मिळतो व आत्मविश्वास जागृत होतो. आपल्या मुलाची जर मैत्रीण असेल किंवा मुलीचा जर मित्र असेल तर पालकांना काळजी वाटू शकते.

-श्रुतिका कोतकुंडे, सजग स्वास्थ्य क्लिनिक, चिपळूण

sajagclinic@gmail.com

वयात येणारी मुलं विविध माध्यमातून बाहेरच्या समाजाशी जास्तीत जास्त संपर्कात येत असतात. मित्रांशी, (Friendship) शिक्षकांशी समाजातील इतर घटकांशी नातं जुळवू पाहत असतात, कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत असतात. मित्रांमुळे मुलांना नवीन कल्पना कळतात, इतरांची मते कळतात, स्वतःच्या मतांना ते तपासत असतात, त्यातील उणिवा दूर करू पाहत असतात. या आदानप्रदानमधून मुलांचे विचार घडत असतात व समाजाशी कसे वागायचे हे ते ठरवत असतात.

पालकांना बऱ्याचदा वाटतं की, मुलांचे मित्र ठरवण्याचा अधिकार त्यांना असावा. त्याच्या विपरित मुलांना असे वाटते की, मित्र बनवणे ही त्यांची व्यक्तिगत बाब आहे व पालकांनी त्यात लुडबूड करू नये. या वयात मुलं पालकांपेक्षा मित्र-मैत्रिणींना जवळचे समजू लागतात व ही मैत्री मुलांच्या स्वतंत्र होण्याच्या प्रवासासाठी, त्यांच्या भावनिक वाढीसाठी अत्यंत आवश्यक असते हे जाणावे.

Friendship
Health News : पौगांडावस्थेतील तीव्र मानसिक त्रास काय आहे? कुमारवयात उद्‌भवू शकतात 'हे' आजार

मित्रांमुळे मुलांना सोबत व साथ मिळते, आधार मिळतो व आत्मविश्वास जागृत होतो. आपल्या मुलाची जर मैत्रीण असेल किंवा मुलीचा जर मित्र असेल तर पालकांना काळजी वाटू शकते व आपले मूल वाईट संगतीत पडून बिघडू नये याबद्दलही काळजी वाटू शकते.

मित्रांमुळे मुलांना सोबत व साथ मिळते, आधार मिळतो व आत्मविश्वास जागृत होतो. आपल्या मुलाची जर मैत्रीण असेल किंवा मुलीचा जर मित्र असेल तर पालकांना काळजी वाटू शकते व आपले मूल वाईट संगतीत पडून बिघडू नये याबद्दलही काळजी वाटू शकते.

पालकांचा मुलांच्या मित्रांसोबत व्यवहार कसा असावा?

मुलांच्या मित्र-मैत्रिणींचे मोल ओळखावे. आपल्या मुलांना मित्र करण्यास प्रोत्साहन जरूर द्यावे त्याचबरोबर मित्र किंवा मैत्रिणीसोबत आपलं मूल काय करते किंवा काय करत आहे, याचे निरीक्षण व त्याचबरोबर नियंत्रण असावे. काही जोखमीच्या गोष्टींबाबत निर्बंध असण्यास काहीच हरकत नाही जसे की, धोकादायक रितीने मोटारसायकल चालवणे, व्यसन करणे, रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणे, अभ्यासाकडे दुर्लक्ष करणे, शाळेचे नियम मोडणे, शिक्षकांची भंकस करणे आदी. आपल्या मुलाला व्यवस्थित समजावून चर्चा करून काही निर्बंध लावणे मुलांनाही सुरक्षित वाटण्यासाठी महत्वाचे असते. पालकांनी आपल्या मुलाचे मित्र कोण हे जाणावेत.

Friendship
वाढत्या वयात करिअरची निवड करणं हा प्रत्येक मुलासाठी असतो महत्त्‍वाचा निर्णय; मुलांमधील 'अशी' ओळखा क्षमता, स्वभाव गुण

काही वावगे वाटल्यास लगेच मैत्री तोडून टाकण्यास सांगू नये. मित्राच्या चुकीच्या वागण्याबद्दल स्पष्टपणे निषेध नोंदवण्यास हरकत नाही; परंतु असे करताना आपले मूल व आपण स्वतः शांत आणि योग्य मनःस्थितीत आहोत का, ते तपासावे. मुलांशी शांतपणे चर्चा करून त्यांना पटवून दिल्यास मूल आपले ऐकण्याची शक्यता वाढेल. मुलांना मैत्री केल्यास त्याला दोष देऊ नये; पण अशा मैत्रीबद्दल आपल्याला वाटणारी काळजी व्यक्त करावी व या समस्यांचा उकल कसा होऊ शकेल, यावर चर्चा करावी. आपले मूल जर मित्राच्या दडपणाखाली येत असेल तर त्याला ठाम कसे राहावे ते शिकवावे तसेच आपले मूल इतरांवर दडपण आणत नाहीना याबद्दल सजग राहावे.

मुलांशी साधकबाधक चर्चा करून इतरांच्या मताचा विचार व सन्मान करण्यास प्रोत्साहन द्यावे व इतरांच्या हक्कांचा सन्मान करण्याची शिकवण द्यावी. शक्यतो चूक-बरोबर, चांगले-वाईट, नैतिक-अनैतिक, हवेसे-नकोसे अशी कडक भूमिका टाळावी. टोकाच्या कुठल्याही मुद्द्यांवर सारासार मुद्देसूदपणे चर्चा करावी, फायदे व तोटे समजवून सांगितल्यास मुले विवेकाने योग्य निवड करतील.

Friendship
Piles Symptoms : मूळव्याध, फिशर, फिस्टुला कोणता आहे आजार? याची कशी होते सुरुवात आणि काय आहेत लक्षणे?

संवाद वाढण्यासाठी हे करा :

मुलाचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घ्या. तुमचे मत सूचना म्हणून मांडा, जबरदस्तीने लादू नका. मुलांना ज्या गोष्टींमध्ये आस्था असते अशा कामात रस घ्या. आस्था ठेवा. गुप्तता राखा व सावध राहत दूरदृष्टीने पावले उचलण्यास प्राधान्य द्या. आपले मूल वाढीस लागते तेव्हा आपली भूमिका बदलावी व मित्रत्व जोपासावे. आपल्या मुलाशी मैत्रीपूर्ण विश्वासाचं नातं जोडण्यावर भर द्यावा. मुलाबरोबर नियमित वेळ घालवावा व त्याच्या आवडीने त्या वेळेचे नियोजन करावे. परस्परांचा आदर ठेवण्याचा सदैव प्रयत्न करावा. मुलाचे म्हणणे लक्षपूर्वक ऐका. भावना व्यक्त करण्यास निर्बंध नको; पण संयम व मर्यादा ठेवून व्यक्त होण्यास मदत करा. वयात आलेला मुलगा मित्रांसोबत जास्त राहील, हे स्वीकारा.

(लेखिका मनोविकारतज्ज्ञ व मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com