पीसीओडीमुळे पोटावरची चरबी वाढलीय?अशी करा कमी

पीसीओडीमुळे पोटावरची चरबी वाढलीय?अशी करा कमी
Updated on

बायकांना पाळी अनियमित यायला लागली की आधी आपण प्रेग्नंट असल्याचंच अनेकींना वाटतं. पण त्याचबरोबर शरीरात काही बदल दिसायला लागले की आपण डॉक्टरकडे जाऊन तपासणी केल्यावर पीसीओडी प्रोब्लेम असल्याचं कळतं. डॉक्टरांनी सुरू केलेल्या औषधांमुळे पाळी नियमित यायला लागते. त्यामुळे आपल्याला आनंद होतो. पण दुसरीकडे वजन एकदम वाढायला लागलंय असं जाणवायला लागतं. पोट पण मोठं दिसतं तेव्हा भिती वाटायला लागते. हे कशामुळे होत असावं असं म्हणून आपण पुन्हा डॉक्टरकडे जातो. पोट वाढल्यामुळे काही मोठा रोग तर नाही ना अशीही भिती वाटते. आपल्या शंकांच निरसन करण्यासाठी डॉक्टर सोनोग्राफी करायला सांगतात. ती करताना पोटात काही नाही तर फॅट वाढलेलं असल्याचं लक्षात येतं. पण पीसीओडी मात्र शाबूत असतो. पीसीओडी असून पाळी मात्र नियमित असल्यामुळे आपण मनात खूश असतो. पण या पोटाच्या वाढलेल्या फॅटचं काय करायचं हा मोठा प्रश्न असतो. अशावेळी तिथले डॉक्टर तुम्हाला विविध उपाय सुचवू शकतात.

पीसीओडीमुळे पोटावरची चरबी वाढलीय?अशी करा कमी
शमिता शेट्टीचं ग्लुटेन फ्री डाएट माहितेय का?
exercise
exercise

हे करा उपाय

नियमित व्यायाम

नियमित व्यायाम करणे हा एक उत्तम उपाय आहे.चयापचय क्रिया सुरळीत होऊ शकते. याशिवाय पोटावरील चरबी कमी करण्यासाठी तुम्ही कार्डियो आणि वेट लिफ्टींगची मदत घेऊ शकता. तसेच योगाचीही खूप मदत होऊ शकते. त्यामुळे तुमचा ताण आणि हार्मोन्स नियंत्रित राहतील.

प्रक्रिया केलेले अन्न टाळा

प्रक्रिया केलेले अन्न खाणे टाळले पाहिजे. प्रक्रिया केलेले अन्न आणि साखर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतात. त्यामुळे तुमचे वजन आणि फॅट वाढू शकते.

salad
saladesakal

कार्बोहायड्रेड पदार्थ

कार्बोहायड्रेडचे पदार्थ खाणे शरीरासाठी चांगले आहे. तसेच पीसीओडी असलेल्या महिलांनी रोजच्या आहारात ताजी भाज्या, फळे भरपूर प्रमाणात खावीत. तसेच नट्स, कडधान्ये यांचाही समावेश करा. शिळे अन्न खाणे टाळावे. पौष्टीक अन्न खाण्यावर भर द्यावा. तेलकट, अतीगोड, जंकफूड खाणे टाळावे.

प्रोटीन हवेच

फायबर असलेले पदार्थ खावेत. तसेच प्रोटीन मिळण्यासाठी अंडी, मासे खावेत. जर तुम्ही शाकाहारी असाल तर शेंगा, कडधान्ये, काजू अशासारखे पदार्थ खाऊ शकता. रेग्युलर सॅलेड खाणे अतिशय चांगले.

पीसीओडीमुळे पोटावरची चरबी वाढलीय?अशी करा कमी
उत्तम मानसिक आरोग्यासाठी डाएटमध्येे खा 'हे' हेल्दी फुड
sleep girl.jpg
sleep girl.jpg

रात्री कमी जेवा

प्रोबायोटिक्स पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे. असे पदार्थ खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते. फॅट्स वाढत नाहीत. आहारात नियमित गाजर, कोबी, फ्लॉवरचा समावेश करा. रात्री कमी जेवा. रात्री कमी जेवल्यास चालायला जा.

नियमित झोप घ्या

दररोज सात ते आठ तासांची झोप शरीरासाठी अतिशय चांगली असते. अशी झोप घेतल्यास तुमच्या वजन आणि चरबीवर चांगला फरक पडू शकतो. झोपेतून उठल्यानंतर 30 मिनिटे सूर्यप्रकाश अंगावर घेतल्याने खूप फरक पडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.