वैद्यकीय उपचार आणि खर्चासाठी निधी कसा उभारायचा? वाचा ही बातमी

medical
medicale sakal
Updated on

भारतात अनेक लोकांना आरोग्य विमा असतो ही बाब एेकिवात नाही. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या 75 व्या राऊंड नुसार (2017-18) भारतातील 80% पेक्षा जास्त लोकसंख्येकडे कोणतेही आरोग्य विमा संरक्षण नाही. रुग्णाला मिळू शकणार्‍या विम्याच्या दाव्याच्या रकमेची मर्यादा असते. त्याचा लाभ घेता येऊ शकतो. रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना शेवटचा पर्याय म्हणून सरकारकडून मिळणाऱ्या विविध मदत निधींसाठी किंवा एनजीओकडे अर्ज करावा लागतो. पण सध्या कोरोनामुळे या दोन्ही पर्यायांवर परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमुळे स्वयंसेवी संस्थांनी त्यांची कार्यालये बंद केली. तर काही लाभार्थी साथीच्या-नियंत्रण उपायांमध्ये आघाडीवर असलेल्या सरकारी योजनांपर्यंत पोहोचूच शकले नाहीत.

ऑनलाइन वैद्यकीय क्राउड फंडिंग प्लॅटफॉर्म सुरू झाल्यापासून लोकांना त्यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी निधी देण्यासाठी अनेक वैद्यकीय मोहिमा सुरू झाल्या आहेत. रुग्णालये, दवाखाने, स्वयंसेवी संस्था आणि विद्यापीठांनी रुग्णांना उपचार खर्चासाठी निधी देण्यासाठी मोहिम सुरू केली. मूलभूत स्तरावर सार्वजनिक आणि खाजगी आरोग्य व्यवस्था ज्यांना सुविधा देण्यास अयशस्वी ठरते त्यांना क्राउडफंडिंगमुळे सुरक्षितता मिळते. भारतातील वैद्यकीय क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्म ही एक जलद आणि प्रभावी फंडिंग यंत्रणा आहे. ती गरजूंना एका क्लिकवर आर्थिक सहाय्य देण्याची संधी देते. Social For Action या साईटवर तुम्हाला अधिक माहिती मिळेल.

medical
मानसिक आरोग्यासाठी का गरजेचं आहे समुपदेशन? जाणून घ्या कारणं

मेडिकल क्राउडफंडिंग म्हणजे काय?
वैद्यकीय खर्चासाठी अलिकडच्या वर्षांत, क्राउडफंडिंगला लोकप्रियता मिळाली आहे. सार्वत्रिक आरोग्य कव्हरेज नसलेल्या देशांमध्ये त्याचे प्रमाण अधिक आहे. तरी सार्वत्रिक कव्हरेज आणि आरोग्य विमा हा प्रत्येकाचा सर्व वैद्यकीय खर्च सामाविष्ट करू शकत नाही. सार्वत्रिक कव्हरेज असलेल्या देशांमध्ये आर्थिक कारणांमुळे आरोग्य सेवेच्या गरजा पूर्ण होत नाहीत. रुग्णाची खर्च करण्याची असमर्थता, तसेच अतिरिक्त उपचारांना आरोग्य विमा निधीद्वारे आर्थिक पुरवठा केला जात नाही.

वैद्यकीय क्राउडफंडिंग कशी मदत करते?

भारतात कर्करोगावरील उपचार आणि प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचा खर्च 15 लाखांपेक्षा जास्त होऊ शकतो. मोदीकेअर खर्चाचा काही भाग कव्हर करते. उपचाराचा खर्च परवडत नसल्याने अनेकजण घर, दागिने विकतात, गहाण ठेवतात. उपचारासाठी त्यांना बचतही मोडावी लागते. किंवा सावकाराकडून त्यांना अधिक व्याजदराने पैसे घ्यावे लागतात. तसेच मोदीकेअरमध्ये इतर अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्याची गरज आहे. मोदीकेअर अंतर्गत विविध वैद्यकीय प्रक्रियांसाठी निश्चित केलेले दर उपचारांच्या खर्चापेक्षा कमी आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनने वारंवार चिंता व्यक्त केली आहे की मोदीकेअर अंतर्गत रूग्णांवर उपचार करण्यासाठी रूग्णालयांना दिले जाणारे पैसे खूप कमी आहेत. तसेच त्यातून दिलेल्या उपचारांची गुणवत्ता कमी कमी असू शकते. म्हणून रुग्णालये रुग्णांना सेवा देणे सुरू ठेवू शकत नाहीत. असे मॉडेल लहान रुग्णालयांसाठी टिकाऊ नाही. Social For Action या साईटवर तुम्हाला अधिक माहिती मिळेल.

medical
विवाह समुपदेशन का करायचं? जाणून घ्या कारणं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.