सध्या कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेक लोकं घरीच (Home Isolation) उपचार घेत आहेत. या काळात घराच्या एका खोलीत एकटेच राहिल्यामुळे एकटेपणा, भीती, त्रासदायक अनुभव तुम्हाला येऊ शकतात. आधीच मानसिक आजाराने (Mental Health) ग्रस्त असलेल्या लोकांसाठी हा अनुभव खूप कठीण असू शकतो. जर तुम्हाला कोरोना झाला असेल आणि तुम्ही घरी एकटे असाल तर तुमच्या मानसिक आरोग्याची (Health) काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा. (How To Handle Mental Stress)
मुलभूत गोष्टी लक्षात ठेवा (Remember the basics)-
कोरोना झाल्यावर अनेकांना अनिश्चिततेचा त्रास होतो. अशावेळी काही गोष्टींची माहित असणे गरजेचे आहे. कोरोनामुळे घरीच जर विलग झाला असाल तर ताप आणि इतर लक्षणांची काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्हाला अंगदुखी असेल, घसा खवखवत असेल तर पॅरासिटामॉल किंवा आयबुप्रोफेन आदी औषधे घ्या. (How To Handle Mental Stress)
-निरोगी आहार ठेवा. प्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ खाण्यावर भर द्या.
- ताप असताना द्रवपदार्थांचे सेवन आवर्जून करा.
- कमीत कमी 10 दिवस व्यायाम थांबवा, आणि तुमच्या लक्षणांच्या तीव्रतेनुसार, हळूहळू व्यायाम पुन्हा सुरू करा. जर तुम्हाला व्यायाम सूरू करण्याबद्दल काही प्रश्न असतील तर, तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
-दिर्घ श्वास घेत राहा. असे केल्याने तुमच्या फुफ्फुसांच्या कार्यास मदत होऊ शकते. वेगळे राहण्याच्या काळात बरे होताना तुम्हाला शांत राहण्यास यामुळे मदत मिळू शकेल. पण असे करताना तुमच्या डॉक्टरांचा सल्ला मात्र नक्की घ्या.
- चित्रपट पाहणे, किएटिव्ह काम करण्याचे मार्ग शोधल्याने तुम्ही चिंता करण्यापासून दूर राहू शकता. मुलांसाठी हे अत्यंत गरजेचे आहे. तसेच फोनद्वारे मित्र-मैत्रीणी, नातेवाईक यांच्याशी फोनवर सतत संपर्कात राहणेही फायद्याचे ठरेल.(How To Handle Mental Stress)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.