कोरोनानंतर Omicron ची भीती! लक्षणं ओळखून अशी घ्या काळजी

ओमिक्रॉन प्रकाराची लक्षणे खूप वेगळी आहेत.
Omicron variant
Omicron variantsakal media
Updated on
Summary

ओमिक्रॉन प्रकाराची लक्षणे खूप वेगळी आहेत.

जिथे जगभरातील लोक कोरोनापासून पूर्णपणे बाहेर आले नव्हते, तितक्यात आता ओमिक्रॉनने देशभरात पाय पसरायला सुरुवात केली आहे. जगभरात त्याचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनाच्या शेवटच्या लाटेत डेल्टाने धुमाकूळ घातला. ताप, खोकला, सर्दी झाल्यास ती कोरोना ओळखण्याची लक्षणे होती, परंतु ओमिक्रॉनच्या बाबतीत असे अजिबात नाही. ओमिक्रॉन प्रकाराची लक्षणे खूप वेगळी आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ओमिक्रॉनची तीन लक्षणे आहेत, डोकेदुखी, खूप थकवा आणि शरीर दुखणे. ना त्या व्यक्तीला खूप ताप आहे ना अन्नाची चव किंवा वास नाही.

Omicron variant
पाच वर्षांपेक्षा लहान मुलांना टार्गेट करतोय Omicron!

या गोष्टींची विशेष काळजी घ्या...

कोरोनापासून बचाव करण्यासाठी तुम्हाला आजही पूर्वीप्रमाणेच सर्व खबरदारी घ्यावी लागेल. कोणतीही लक्षणे दिसताच ताबडतोब टेस्ट करुन घ्या. मास्क योग्य प्रकारे लावल्याची खात्री करा, सोशल डिस्टेंसिंग पाळा, खाणंपिणं बरोबर ठेवा आणि जर तुम्ही आतापर्यंत लसीचे दोन्ही डोस घेतले नसतील तर ते लवकरात लवकर घ्या. यासोबतच तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवणे देखील गरजेचे आहे.

Omicron variant
घाबरू नका! ओमिक्रॉनचा संसर्ग अतिसौम्य | Omicron

- लक्षात ठेवा सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या.

- त्यानंतर आले तुळस आणि काळी मिरी टाकून चहा घ्या.

- आहारात हिरव्या भाज्या खाव्यात जेणेकरून तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होईल.

- कोणत्याही फळाचा रस प्या किंवा घरी केळीचा शेक बनवून प्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.