अंडी खाण्याचे शौकीन आहात, तर या गोष्टी नक्की जाणून घ्या

Eating Eggs is good for health but know all things
Eating Eggs is good for health but know all things
Updated on

'संडे हो या मंडे रोज खाओ अंडे' हे वाक्य तुम्ही लहानपणापासून ऐकत आला असाल. अंड्यात मोठ्या प्रमाणात प्रथिने( प्रोटिन) असतात. त्यामुळे आहारात अंड्यांचा समावेश करणे फायदेशीर ठरु शकते. सकाळी नाष्टा म्हणून अनेक लोक अंड्यांना पसंती देतात. जर तुम्हालाही अंडे खाणे आवडत असेल तर काही गोष्टी तुम्हाला नक्की माहिती हव्यात.

जीवनसत्व युक्त अंडे...

अंड्यामध्ये अमिनो अॅसिड असते, जे शरिराच्या गरजांना पूर्ण करते. अंड्यात जीवनसत्व अ, बी, बी12, जीवनसत्व ड आणि जीवनसत्व ई मोठ्या प्रमाणात असते. याशिवाय अंड्यामध्ये फॉलेट, सेलेनियम आणि अनेक खनिजे असतात, जे शरिराला फायदेशीर ठरु शकतात. 

- जर तुम्ही दररोज अंडे खात असाल, तर अंडे दररोज न खाता एक दिवसाआड खाणे सुरु करा. याचे कारण उन्हाळ्यामुळे उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि लॉकडाऊनमुळे तुम्ही जीम किंवा पार्कमध्ये जाऊ शकत नाही. अशावेळी अंडे पचण्यास जड जाऊ शकतात.

- अंडे खाल्याने आपल्या शरिराला मोठ्या प्रमाणात प्रथिने मिळतात. आपल्या शरिरातील कोशीका या प्रथिनांच्याच बनलेल्या असतात. मात्र, प्रथिनांचा लाभ शरिराला होण्यासाठी अंड्यांचे व्यवस्थित पचन होणे आवश्यक आहे. 

- तुम्हाला दररोज अंडे खाण्याची सवय असेल तर दिवसातून केवळ एकच अंडा खा. तसेच अंडे खाण्यात नियमितता ठेवा. दररोज दोन  किंवा अधिक अंडे खाणे शरिरासाठी अपायकारक ठरु शकते.

- अंडे शरिराला पोषण आणि उर्जा पूरवतात. मात्र, उच्च प्रथिने आणि रीच न्यूट्रिशन असलेला आहार पचवण्यासाठी आपली रोगप्रतिकार प्रणाली चांगली असणे आवश्यक असते. 

- जर तुम्ही व्यायाम, योगा किंवा अन्य कोणते शारीरिक काम करत नसाल तर तुम्ही दररोज अंडे खाणे टाळायला हवे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.