पोटाच्‍या विकारांकडे दुर्लक्ष ठरेल गंभीर आजारांना आमंत्रण

stomach pain
stomach painesakal
Updated on

नाशिक : प्रत्‍येक व्‍यक्‍तीच्‍या प्रकृतीनुसार त्‍याला आवश्‍यक घटकांचे प्रमाण बदल असते. परंतु चुकीच्‍या जीवनशैलीमुळे, सकस आहार नसल्‍याने पोटाशी निगडित विकार जडतात. कालांतराने बद्धकोष्ठता, मूळव्याध, फिशर आदी व्‍याधी होण्याची शक्‍यता असते. वेळीच पोटाच्‍या विकारांकडे केलेले दुर्लक्ष कर्करोगापासून अन्‍य गंभीर आजारांना आमंत्रण ठरू शकते, असे मत पोटविकार आणि मूळव्‍याध तज्‍ज्ञ डॉ. अजित खालकर यांनी शुक्रवारी (ता.४) व्‍यक्‍त केले.

(Ignoring stomach ailments invites serious illness : Dr Khalkar)

आहारातून आपण संभाव्‍य धोके कमी करू शकतो

‘सकाळ’ सातपूर कार्यालयात झालेल्या सकाळ संवाद कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे फेसबुक लाइव्‍हद्वारे थेट प्रसारण करण्यात आले. दरम्‍यान, प्रारंभी डॉ. खालकर यांचे स्‍वागत सकाळ उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी केले. डॉ. खालकर म्‍हणाले, की पोटाचे विकार वाढण्यामागे बदललेला दिनक्रम हे एक प्रमुख कारण आहे. आहार विहारातून आपण संभाव्‍य धोके कमी करू शकतो. बहुतांश वेळी त्रास होत नसेल, दुखत नसेल तर रुग्‍ण या आजाराकडे दुर्लक्ष करतात. परंतु अनेक रुग्‍णांना मूळव्याध असून, दीर्घ कालावधीपर्यंत रक्तस्राव होत नाही. जर एखाद्यास पोट साफ होत नसेल, किंवा अन्‍य काही तक्रारी असतील तर त्‍यांच्‍यावर स्‍वतःच्‍या पातळीवर उपचार न करता तज्‍ज्ञ डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्यावा. चाचण्यांतून सखोल माहिती समोर येऊन उपचाराची पुढील दिशा निश्‍चित करता येते. मूळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता आदी आजार हे काही गुप्त रोग नाहीत. त्यामुळे आपल्‍याला असलेल्‍या समस्‍येविषयी कुटुंबातील सदस्‍य, डॉक्‍टरांशी मनमोकळेपणाने बोलणे आवश्‍यक ठरते, असेही त्‍यांनी नमूद केले.

stomach pain
जागतिक पर्यावरण दिन : नाशिकमध्ये मुरमाड जागेवर बहरली वनराई!

शस्‍त्रक्रीयेविषयी भीती नको…

पोटाचे विकार, मूळव्‍याधीशी निगडित आजारांचे प्राथमिक स्‍तरावर निदान होणे आवश्‍यक ठरते. यातून केवळ आजारातील बदलातून उपचार करणे शक्‍य होते. आवश्‍यकता भासल्‍यास औषधोपचार घेता येऊ शकतो. शस्‍त्रक्रीयेविषयीदेखील भीती बाळगण्याचे कारण नसल्‍याचे डॉ.खालकर यांनी नमूद केले. तसेच बंगाली बाबाच्‍या भूलथापांना बळी न पडता, तज्‍ज्ञ डॉक्‍टरांकडून उपचार घेण्याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.

कोरोनात रुग्णांमध्ये पन्नास टक्‍यांपर्यंत वाढ

कोरोना पहिल्‍या लाटेत काढ्यांच्‍या माऱ्याने, तर दुसऱ्या लाटेत मांसाहार, अंडी अति सेवनामुळे मूळव्याध व निगडित आजाराच्‍या रुग्‍णांमध्ये वाढ झाली. सुमारे पन्नास टक्‍यांपर्यंत रुग्‍ण संख्या वाढली असल्‍याचे निरीक्षण डॉ. खालकर यांनी नोंदविले. कोरोनाची लागण झालेल्‍या रुग्‍णांमध्ये काही औषधे, प्रति जैविकांमुळे उष्णता वाढून त्‍यांच्‍याही या व्‍याधी आढळल्‍याचे सांगितले.

stomach pain
गोदा प्रदूषणमुक्तीच्या नावाने होऊ द्या खर्च..!

डॉ. खालकर यांनी दिलेल्‍या टिप्स...

* सकाळी लवकर उठावे, साधारणतः दोन ग्‍लास कोमट पाणी घ्यावे.

* चौफेर आहार असावा. शरीरीरास आवश्‍यक घटकांची व्‍हावी पूर्तता.

* आहारात भरपूर प्रमाणात फळ, पालेभाज्‍या, सलाडचा समावेश असावा.

* दिवसभरात तीन ते चार वेळा आहाराची विभागणी करावी.

* किमान तीन लिटर पाणी घ्यावे, वजनानुसार प्रमाण कमी अधिक शक्‍य

* बेकरीचे पदार्थ शक्‍यतो टाळावेत, सायंकाळी सरबत-ज्‍यूस घ्यावेत.

* नियमित व्‍यायाम करणे गरजेचे, सूर्यनमस्‍काराचा फायदा.

* बैठे काम असलेल्‍यांनी तासातासाने चालण्याचा व्‍यायाम करावा.

Ignoring stomach ailments invites serious illness : Dr Khalkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.