Immunity Booster: रोज सकाळी फॉलो करा 'हा' रुटीन, सगळे रोग जातील दूर

यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती सहज वाढवू शकता
Health Tips
Health Tipsesakal
Updated on

गेल्या दोन वर्षांपासून आता लोक रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याविषयी प्रयत्न करत आहेत. अनेक कंपन्या त्यांच्या उत्पादनांद्वारे प्रतिकारशक्ती वाढवण्याचा दावा करत असताना, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा डेकोक्शन पिण्याचा सल्ला घेणे देखील सामान्य झाले आहे. या उपायांचा अवलंब करण्यात काहीही नुकसान नाही, परंतु असे काही नैसर्गिक मार्ग आहेत, ज्याद्वारे तुम्ही तुमची रोगप्रतिकारक शक्ती सहज वाढवू शकता.

1. रोज सकाळी चाला

आपण सर्वजण लहानपणापासून हे ऐकत आलो आहोत की, सकाळी मोकळ्या हवेत फिरणे ही एक चांगली सवय आहे. सकाळी लवकर शुद्ध हवेत चालल्याने हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या समस्यांपासून वाचू शकतो, असेही डॉक्टर सांगतात. याव्यतिरिक्त, ते आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती देखील सुधारते.

Health Tips
cholesterol असणार कंट्रोलमध्ये, Heart Attack चाही धोका होणार कमी, फक्त 'हे' सहा पदार्थ खा

2. किमान एक तास व्यायाम करा

दररोज सकाळी किमान एक तास व्यायाम किंवा योगासने करा कारण डॉक्टर म्हणतात की, सकाळी लवकर घाम आल्याने शरीरातील सर्व विषारी घटक बाहेर पडतात आणि शरीर निरोगी होते. योग आणि व्यायामामुळे आपले शरीर केवळ मजबूत होत नाही तर ते मानसिक आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. दररोज व्यायाम केल्याने आपले स्नायू, हाडे आणि फुफ्फुसे मजबूत होतात.

Health Tips
Spices : 'या' मसाले पदार्थांमुळे आरोग्याला होतात फायदे, पाहा कोणते?

3. मध लिंबू आणि गरम पाणी

लिंबू नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन सीने समृद्ध आहे आणि मध नैसर्गिक साखर, अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा चांगला स्रोत आहे. त्यांचे मिश्रण तयार करून सकाळी प्यायल्याने शरीरातील घाण निघून जाते. त्यामुळे लठ्ठपणा कमी होतो आणि किडनीही स्वच्छ होते. याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करते. लिंबू-मधामुळे तुम्हाला फ्रेश वाटते. आपल्या दैनंदिन दिनचर्येत याचा समावेश करणे आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

4. सकाळी वेळेत नाश्ता करा

जर तुम्ही अशा लोकांपैकी असाल ज्यांच्यासाठी सकाळी फक्त एक कप चहा पुरेसा आहे, तर निरोगी राहण्यासाठी ही सवय बदला. न्याहारी हे दिवसभरातील सर्वात महत्वाचे जेवण आहे, हे लक्षात ठेवा की, ते शरीराला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा देते. त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्तीही चांगली राहते. त्यामुळे नाश्त्यामध्ये पोहे, दलिया, फळे, उपमा असे पर्याय निवडा. तुमचा नाश्ता जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरने भरलेला असावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.