Corona : टेस्टोस्टेरॉनमुळे पुरुषांना संसर्गाचा धोका अधिक असतो का?

टेस्टोस्टेरॉन जास्त असलेल्या पुरुषांमध्ये प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते आणि लसीकरणानंतरही कमी प्रमाणात अँटिबॉडी तयार होऊ शकते.
Coronavirus and testosterone
Coronavirus and testosteroneSakal Media
Updated on

कोरोनाचा धोका महिलांच्या तुलनेत पुरुषांना अधिक असल्याचं एका संशोधनातून समोर आलं होतं. यामागे पुरुषांमधील लैंगिक हार्मोन आणि टेस्टोस्टेरॉन असल्याचा दावा संशोधकांनी केला. टेस्टोस्टेरॉनचा इम्युनिटी सिस्टिमवर परिणाम होतो आणि पुरुष कोरोनाच्या विळख्यात सापडण्याची शक्यता निर्माण होते असं म्हटलं आहे. पण संशोधकांनी जे म्हटलं त्यात कितपत तथ्य आहे आणि याला काय आधार आहे ते जाणून घेऊ.

संशोधकांनी काही पुराव्यांचा अभ्यास केल्यानंतर असं म्हटलं की, एस्ट्राजेन (महिलांचे लैंगिक हार्मोन) इम्युनिटीमध्ये वाढवण्यासाठी मदत करतात आणि त्यांच्यात अँटिबॉडीज वाढवतात. याऊलट टेस्टोस्टोरॉन व्हायरसशी लढण्यासाठी आवश्यक इम्युनिटीवर परिणाम करतात. यामुळेच महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत संसर्गाचा धोका कमी आणि लसीकरणाचा जास्त फायदा होतो. टेस्टोस्टेरॉन जास्त असलेल्या पुरुषांमध्ये प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते आणि लसीकरणानंतरही कमी प्रमाणात अँटिबॉडी तयार होऊ शकते. म्हणजेच टेस्टोस्टेरॉनमुळे व्हायरस आणि बॅक्टेरियाच्या संसर्गाचा पुरुषांना अधिक धोका संभवतो का? याचं उत्तर संशोधकांनी मांडलेले पुरावे पाहिले तर ते स्पष्ट होत नाही.

Coronavirus and testosterone
लैंगिक संबंधांना नकार देण्याचे स्वातंत्र्य नाही

टेस्टोस्टोरॉनचे रोग प्रतिकारक्षमतेवर होणाऱ्या परिणामांवर अनेक अभ्यास झाले आहेत. यामध्ये सिंग्ल इम्युन फंक्शन आणि पेशींच्या प्रकारांवर जास्त भर देण्यात आला आहे. मात्र रोग प्रतिकारक शक्तीमध्ये अनेक पेशी, अवयव यांचा समावेश असतो जे संसर्गाला प्रतिकार करतात. याचे दोन गट करता येतात. यामध्ये जन्मत: असलेली प्रतिकारशक्ती आणि Adaptive इम्युनिटी जी परिस्थितीनुसार तयार होते. जन्मत: असलेली प्रतिकारशक्ती ही वेगवान असते आणि ती विशिष्ट प्रकारची नसते. परिस्थितीनुसार तयार होणारी रोगप्रतिकार शक्ती काम करण्यास सुरु होईपर्यंत कमी प्रमाणात संसर्ग होतो. अडॅप्टिव्ह इम्युनिटी ही थोडी गुंतागुंतीची आहे. व्हायरसला ओळखण्यास आणि त्याला रोखण्यास या इम्युनिटीला वेळ लागतो. व्हायरसचा धोका संपल्यानंतर ही इम्युनिटी त्यावर काम करत राहते. भविष्यात असा धोका निर्माण झाला तर त्यावर वेगानं प्रतिकार करते.

Coronavirus and testosterone
बापरे! सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांनी ओलांडला २ लाखाचा आकडा

जास्त प्रमाणात टेस्टोस्टेरॉन असलेले पुरुष जे स्नायुंची वाढती ताकद, लैंगिक इच्छाशक्ती आणि धोका पत्करणारी कृती करते तेव्हा Adaptive Immunity ला प्राधान्य मिळत नाही. पुरुषांना एखादा संसर्गजन्य आजार होतो तेव्हा त्यांच्या टेस्टोस्टेरॉनची पातली कमी होते. त्यांच्यातील उर्जा इतर महत्त्वाच्या कार्ये करण्यापासून थांबवण्याऐवजी बहुतांश उर्जा ही इम्युनिटी वाढवण्यासाठी वापरते.

आजार आणि वय

एखाद्या व्यक्तीला ससंर्ग किती वेगानं होऊ शकतो हे त्याला आजार आहे की नाही हे महत्त्वाचं ठरतं. आजारपणामुळे टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी झाल्यानं पुरुषांमध्ये संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता असते. नुकतंच असं समोर आलं आहे की, कोरोनामुळे टेस्टोस्टेरॉन लेव्हल कमी होऊन पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टवरही परिणाम होतो. त्यामुळे पुरुषांमध्ये आजाराचा वाढता धोका टेस्टोस्टेरॉन कमी झाल्याने होते का? असा प्रश्न आहे.

Coronavirus and testosterone
जगातील 50 टक्के महिलांना स्वत:च्या शरीरावर अधिकार नाही!

वयामुळे अनेक गोष्टींवर प्रभाव पडतो. आजारपणाच्या समस्या वयानुसार वाढत जातात. स्त्री आणि पुरुषांमध्यो कोरोनाच्या बाबतीत वय हा एक धोक्याची पातळी ठरवणाऱ्या घटकांपैकी महत्त्वाचा घटक आहे. पुरुषांमध्ये वयानुसार टेस्टोस्टेरॉनची पातळीही कमी होत जाते. यामुळे वयोवृद्ध पुरुषांमध्ये ससंर्गाचं प्रमाण वाढतं. फक्त टेस्टोस्टेरॉन असणं हे नाही तर त्याची पातळी कमी असणं हे कारण असू शकतं. उदाहरण सांगायचं तर, टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी असलेल्या ज्या लोकांना क्रोनिक किनीचा त्रास होता त्यांना टेस्टोस्टेरॉनच्या तुलनेच संसर्गामुळे रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण कमी आहे.

प्रतिकारक शक्तीवर याचा परिणाम कसा होतो हे शोधण्यासाठी आरोग्य कसं आहे? वेगवेगळ्या वयोगटात दोन्ही प्रकारच्या प्रतिकारशक्ती आणि त्यांचे वेगवेगळ्या कार्यांत टेस्टोस्टोरॉनचा प्रभाव कसा पडतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या तरी अशा प्रकारची कोणती तपासणी यासाठी नाही. त्यामुळे एवढंच म्हणता येईल की टेस्टोस्टेरॉन हे इम्युन सिस्टिममध्ये थोडाफार बदल करु शकतं. मात्र त्यामुळे होणारे परिणाम हे वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतील. यामध्ये कोरोना संसर्ग झालेल्या पुरुषांना याचे प्रतिकूल किंवा अनुकूल असेही परिणाम दिसून येऊ शकतात.

टेस्टोस्टेरॉन म्हणजे काय?

टेस्टोस्टेरॉन हे शरीरातील सर्वात महत्वाचं असं हार्मोन असतं. यामुळे मसल्स मास, बोन डेन्सिटी आणि सेक्स ड्राइव्ह तयार ठेवण्यात याची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण योग्य असंण गरजेचं असतं. यामध्ये कमी अधिक प्रमाण झालं तर नपुंसकता किंवा कमजोरी येण्याची शक्यता असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.