अपुऱ्या झोपेमुळे होतोय स्मरणशक्ती, प्रतिकारशक्तीवर परिणाम, अभ्यासात स्पष्ट

युनिव्हर्सिटी ऑफ साउथ ऑस्ट्रेलियाचे प्रोफेसरनी याविषयी पंधरा वर्ष संशोधन केले.
incomplete sleep
incomplete sleep esakal
Updated on

अनेक लोकं कामाला खूप महत्व देतात. पैसै कमविण्यासाठी, यश मिळविण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात. प्रसंगी कमी झोपतात(Sleep). पण झोप अपुरी घेतल्याने त्याचा आरोग्यावर (Health) वाईट परिणाम होतो. ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या एका अभ्यासात ही बाब उघड झाली आहे. कमी वेळ झोपल्याने स्मरणशक्तीवर परिणाम तर होतोच, त्याचबरोबर चयापचय आणि रोग प्रतिकारशक्तीवरही (Immunity) परिणाम होतो.

incomplete sleep
रात्रीच्या 5 सवयी बदला, मस्त, फीट राहाल

युनिव्हर्सिटी ऑफ साउथ ऑस्ट्रेलियाचे प्रोफेसर सिओभान बँक्स यांनी गेल्या पंधरा वर्षांत केलेल्या अभ्यासात (Study) हे दिसून आले आहे. ते म्हणतात, दीर्घकाळ झोप (Sleep) न घेतल्याने लठ्ठपणा, टाइप-2 मधुमेह आणि कॅन्सरसारख्या आजारांचा धोका वाढतो. त्यामुळेच, आठ तासांपेक्षा कमी झोप आरोग्यासाठी अजिबात चांगली नाही. अन्न नीट पचवण्याची क्षमता, संसर्गाशी लढण्याची क्षमता आणि अनेक शारीरिक प्रक्रियांवर त्याचा परिणाम होतो. कमी झोपल्याने स्मरणशक्तीवर परिणाम, प्रतिक्रिया देण्यासाठी वेळ लागणे आणि थकवा असे परिणाम दिसायला लागतात. रात्रीच्या झोपेनंतर बहुतेक लोकांना या सर्व समस्या दिसायला लागतात.

incomplete sleep
दुपारी ऑफिसमध्ये येणारी झोप कशी टाळाल? जाणून घ्या सोप्या टिप्स
Sleep
SleepSakal

ब्रेक घेत झोप पूर्ण करा

फ्रोफेसर ओभान बँक्स म्हणतात की जर वेळापत्रकामुळे सलग 8 तासांची झोप घेणे शक्य नसेल तर तुम्ही ती वेगवेगळ्या टप्प्यांत पूर्ण करू शकता. काही लोकं 4-5 तासांची मुख्य झोप घेतात. नंतर ते दुपारी काही तास झोपतात. किंवा दिवसभरात एक दोन तास डुलकी घेऊन झोप पूर्ण करता येईल.

incomplete sleep
नेटफ्लिक्सवरील पाच हॉरर चित्रपट! पाहाल तर उडेल झोप
अपुरी झोप
अपुरी झोप esakal

झोपेचे तीन टप्पे

मेंदूला आरामासाठी रात्री दिर्घ झोपेची आवश्यकता असतेआपल्या रात्रीच्या झोपेची मूलभूत 'शरीर रचना' असते, ज्यामध्ये दोन मुख्य घटक असतात- जलद डोळ्यांची हालचाल, किंवा REM झोप आणि नॉन-REM झोप. नॉन-आरईएम झोप तीन टप्प्यांत येते. पहिल्या टप्प्यात तुम्ही झोपेचा अनुभव घेत असता. हा टप्पा काही मिनिटांचा असतो. दुसरा टप्पा म्हणजे हलकी झोप, ज्यामध्ये तुमच्या शरीराचे तापमान कमी होते आणि डोळ्यांच्या हालचाली थांबतात. हा टप्पा 10 ते 25 मिनिटांचा असतो, पण, तुम्ही जितके जास्त झोपता तितका जास्त वेळ जातो. तिसरा टप्पा स्लो-वेव्ह स्लीप आहे, जो मुख्यतः रात्रीच्या पहिल्या भागात पूर्ण होतो.

incomplete sleep
वजन कमी करण्यासाठी इंटरव्हल वॉकिंग फायद्याचा! जाणून घ्या नवा प्रकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.