शरीरातील ऑक्सिजन वाढीसाठी 'ही' फळे आहेत उपयुक्त

हिमोग्लोबिनच शरीरातील ऑक्सिजनची पातळी नीट ठेवण्याचे कार्य करते
शरीरातील ऑक्सिजन वाढीसाठी 'ही' फळे आहेत उपयुक्त
Updated on

कोल्हापूर : ‘हिमोग्लोबिन’ (hemoglobin) हा शब्द प्रत्येकानेच अनेक वेळा ऐकला असेल. काय आहे हे हिमोग्लोबिन? ज्याबद्दल एवढा विचार केला जातो? आणि काय संबंध या हिमोग्लोबिनचा कोरोनाशी? असे अनेक प्रश्‍न आता प्रत्येकालाच सतावत असतील. मात्र, हे हिमोग्लोबिनच आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी (oxgyn level) नीट ठेवण्याचे कार्य करते. त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी नीट ठेवणारे हिमोग्लोबिनचे प्रमाण व्यवस्थित ठेवण्यासाठी फळे सर्वोत्कृष्ट आहेत.

हिमोग्लोबिनचे महत्त्व

रक्तातील हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशींमधील प्रथिने (protine)आहेत जे आपल्या शरीराच्या अवयवांमध्ये आणि उतींमध्ये (टिश्यू) ऑक्सिजन पोचवते आणि आपल्या अवयवांमधून आणि उतींमधून फुफ्फुसांपर्यंत पुन्हा कार्बन डाय ऑक्साईडची वाहतूक करते. जर हिमोग्लोबिन सामान्य पातळीपेक्षा कमी असेल तर आपल्याकडे कमी रक्तपेशींची संख्या आहे. या रक्तपेशी वाढवण्यासाठी आपल्या आहारात लोह, तांबे, जीवनसत्त्वे, फॉलिक अॅसिडचा समावेश करणे गरजेचे आहे.

आहारातील पोषक घटक रक्तात ऑक्सिजन वाढविण्यास मदत करतात. कोरोना संसर्गाच्या (covid-19) सुरवातीपासूनच विषाणूच्या प्रादुर्भावाने सर्वाधिक परिणाम शरीरातील ऑक्सिजन पातळीवर होतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ऑक्सिजन रक्ताद्वारे शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचला जातो. आपल्या आहारातील संतुलित आहाराचा समावेश असणे आवश्यक आहे. हिमोग्लोबिन योग्य राखण्यास मदत होते. असे संतुलित घटक देणारी काही फळे आहेत, जी मानवी शरीराची संतुलित आहाराची गरज काही प्रमाणात पूर्ण करून ऑक्सिजनची पातळी व्यवस्थित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. काही फळे अशी -

शरीरातील ऑक्सिजन वाढीसाठी 'ही' फळे आहेत उपयुक्त
कोरोनामुळे असा झाला बालकांच्या मानसिकतेत बदल ; जाणून घ्या तज्ञांचे मत

केळी

केळी हे सर्वसमावेशक अशा आवश्यक स्रोतांचा खजिना आहे. यात भरपूर प्रमाणात अल्काईन असते. तसेच यात फायबरदेखील मुबलक प्रमाणात असते. यामुळे केळी खाल्ल्यास शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते. केळीत पोटॅशियम, फॉलेट, ट्रायटोफन आणि एनर्जाइजिंग कार्ब्सही असतात. केळी पोटॅशियमने समृद्ध आहेत. यात १०० कॅलरीइतकी ऊर्जा असते (मधुमेह असणाऱ्यांनी वैद्यकीय सल्ल्यानेच केळींचे सेवन करावे.

पपई

पपई हे फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ए, बी व सी यांसारख्या जीवनसत्त्वांमध्ये ऑक्सिजनची पातळी वाढण्यात मदत होते. पपई हे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही अधिक फायदेशीर ठरते. कच्ची पपई, पपईची कोवळी पाने, पपईच्या बिया यांचे खूप औषधी फायदे आहेत.

अननस

अननसात व्हिटॅमिन बी, फॉलेट, थायमिन यांसारखे अत्यंत पोषक घटक असतात. त्यामुळे ऑक्सिजनची पातळी वाढण्यास मदत होते. अननसात ब्रोमिलेन एन्झाइमही असते, जे पचन संस्था सुधारण्यास मदत करते. यात फायबरचे प्रमाण जास्त असून, हे बद्धकोष्ठसारख्या आजारावर नियंत्रण ठेवते. अननस खाल्ल्याने आतडे निरोगी राहते. अननसात लोह असते, जे शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवते. तसेच, लोहामुळे शरीरात नवीन रक्ताची निर्मितीही होते.

शरीरातील ऑक्सिजन वाढीसाठी 'ही' फळे आहेत उपयुक्त
108 वर्षांच्या आजींची जिद्दच भारी; जयंत पाटीलांकडून साडी चोळीचा सत्कार

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरीत राइबोफ्लेविन, व्हिटॅमिन यांसह अनेक पौष्टिक घटक असतात. जे रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढविण्यास मदत करतात. तसेच, उत्साह टिकवून ठेवतात.

ब्लू-बेरी

रक्तात ऑक्सिजनची पातळी वाढविण्यास ब्लू-बेरी अधिक प्रभावी आहे. यात प्रोटिन्स, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, व्हिटॅमिन ई, सी असते. हे सर्व घटक शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासही मदत करतात.

किवी

किवी हे अनेक प्रकारचे पौष्टिक घटक असलेले फळ आहे. त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढण्यास मदत होते. किवीचा रस शरीरातील पचनक्रिया सुधारण्याचेही काम करतो. हे फळ पोट विकारात उपयुक्त ठरते.

शरीरातील ऑक्सिजन वाढीसाठी 'ही' फळे आहेत उपयुक्त
महात्मा गांधींच्या पणतीला घोटाळ्याप्रकरणी 7 वर्षांचा तुरुंगवास

"फळे खाणे हे फळांचा रस पिण्यापेक्षा अधिक फायदेशीर ठरते. फळांमधील सर्व घटकद्रव्ये जर शरीराला मिळायची असतील तर फळे ही चावून खाणे चांगले असते. पचायला हलकी तसेच पोषक द्रव्येही शरीराला अधिक जलद मिळतात."

- प्रज्वला लाड, आहारतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.