इनर इंजिनिअरिंग : भव्य भारताचे निर्माण

एखादे राष्ट्र म्हणजे तिथली भूमी किंवा त्यामधील इमारती नव्हे; राष्ट्र म्हणजे त्यामधील माणसं. एक राष्ट्र म्हणून आपल्याला सक्षम बनायचं असेल, तर सर्वप्रथम आपण आपल्या लोकांना सक्षम बनवणं आवश्यक आहे.
 इनर इंजिनिअरिंग : भव्य भारताचे निर्माण
इनर इंजिनिअरिंग : भव्य भारताचे निर्माणsakal
Updated on

एखादे राष्ट्र म्हणजे तिथली भूमी किंवा त्यामधील इमारती नव्हे; राष्ट्र म्हणजे त्यामधील माणसं. एक राष्ट्र म्हणून आपल्याला सक्षम बनायचं असेल, तर सर्वप्रथम आपण आपल्या लोकांना सक्षम बनवणं आवश्यक आहे.

सक्षमीकरण म्हणजे भौतिक सुख-समृद्धी किंवा तंत्रज्ञान निर्माण करणे नव्हे. ही एक संपूर्णतः आंतरिक प्रक्रिया आहे, एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये आवश्यक ती संवेदनशीलता, आंतरिक समतोल आणि सद्सद्विवेकबुद्धी यांचा अभाव असेल, तर प्रचंड प्रमाणात नकारात्मकता आणि विकृती निर्माण होते आणि यामुळे मनुष्य किंवा संपूर्ण मानवी संस्कृतीची अधोगती होते. आपण भोगलेल्या सर्व प्रकारच्या अधोगगतींपैकी, सर्वांत हानिकारक बाब म्हणजे या देशाला तिच्या सर्वांत महान सामर्थ्यापासून वंचित ठेवले गेले – म्हणजेच जीवनाच्या विविध आयामांमध्ये प्रस्थापित सिद्ध पुरुष; ज्यांची अवघी उपस्थिती म्हणजे या जगासाठी एक मोठे वरदान आहे, असे युगपुरुष घडवण्यापासून आपल्याला वंचित ठेवण्यात आले.

असे एक उदाहरण, जे जगाला माहिती आहे आणि ज्याची फळे आपण आजसुद्धा चाखत आहोत, ते म्हणजे भगवान गौतम बुद्ध. एक राजपुत्र म्हणून तो अनेक विवाह करून, संतती निर्माण करून त्याच्या लहानशा साम्राज्यावर राज्य करू शकला असता. पण, एक आत्मज्ञानी पुरुष म्हणून त्यांनी अनेक मार्गांनी या पृथ्वीवरील मानवी जीवनाचा मार्गच बदलून टाकला. आपला जन्म या संस्कृतीत झाला म्हणून आपण या संस्कृतीचा आदर ठेवतो असे नाही, तर या संस्कृतीमध्ये जगाला वरदान ठरणाऱ्या‍ व्यक्ती निर्माण करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले म्हणून आपल्यासाठी ही संस्कृती अनमोल आहे.

समाजात एक काळ असा होता, जेव्हा खूप कमी व्यक्ती आध्यात्मिक होत्या आणि इतर सर्वजण त्यांच्याकडे केवळ आशीर्वाद घेण्यासाठी गेले आणि ते त्यांचे आयुष्य जगले. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साधनांनी आपण आपल्यालाच एका धोकादायक परिस्थितीत आणून ठेवले आहे, म्हणून समाजातील प्रत्येक व्यक्तीला आध्यात्मिक होणे अतिशय गरजेचे झाले आहे. नाहीतर जगाचे अस्तित्वच उरणार नाही. जोपर्यंत लोकांना, विशेषतः या जागतिक स्तरावरील नेत्यांना ऐक्याची भावना स्पर्श करत नाही, तोपर्यंत पृथ्वीवर आपला विनाश होणे अटळ आहे.

शंकेखोर व्यक्ती ताबडतोब विचारतात, ‘‘असे काही परिवर्तन घडून येणे शक्य आहे का?’’ मला त्यांना हे सांगायचे आहे, की वर्तमान परिस्थितीच्या आधारे जगाच्या भविष्याचा विचार करू नका. या ग्रहावरील वर्तमान स्थिती एका क्षणात बदलली जाऊ शकते, कारण आजची वास्तविकता लोकांच्या इच्छा आणि आकांक्षा, त्यांची वचनबद्धता लक्षात घेत नाही, मानवाच्या अंतःकरणात काय धडधडत आहे, हे ते विचारात घेत नाहीत. व्यक्तिगत माणसांच्या हृदयात काय घडत आहे, याचा अंदाज आपण घेतला, तर चमत्कार घडणे सहज शक्य आहे.

हे घडून येणे आता फार दूर नाही, आपण फक्त त्या दिशेने काम करणे गरजेचे आहे. या भारत भूमीत असलेला आध्यात्मिक वारसा, तसेच त्यासह सध्या आपल्याकडे उपलब्ध असलेल्या आध्यात्मिक प्रक्रियांच्या साहाय्याने, ही शक्यता नक्कीच फलद्रूप होऊ शकते. हे घडून येण्यासाठी जर आपण स्वतःला समर्पित केले, तर आपल्या आयुष्यात या पृथ्वीवर काहीतरी प्रचंड आणि अद्‌भुत असे काही घडताना आपण अनुभवू शकू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.