ओला खजूर, पोषणमूल्य भरपूर; थकवा दूर करण्यास होते मदत

विशेषत: आजारी लोकांना हा खजूर दिला जातो
ओला खजूर, पोषणमूल्य भरपूर; थकवा दूर करण्यास होते मदत
Updated on

कोल्हापूर : पाऊस सुरू झाला की, ओला खजूर बाजारात येऊ लागतो. अनेकजण हा ओला खजूर घेण्यासाठी येतात. पोषणमूल्य सर्वाधिक असलेला हा खजूर सर्व थरातील लोक खातात. विशेषत: आजारी लोकांना हा खजूर दिला जातो. अंगात ताकद येण्यासाठी, थकवा दूर करण्यासाठी ओला, सुका खजूर, पिकलेला खजूर खाल्ला जातो. ताज्या खजुरापासून कोशिंबीर, चटणी, लोणची बनविली जातात.

प्रकार (पोटजाती)

  • मध्यम कोरडा : दायरी, दिग्लेट नूर, झाहीदी-मऊ ओला : बारही, हळवी, खद्रावी, मेदजूल

  • कोरडा प्रकार : थुरी -बारही, हळवी ही सोनेरी रंगाची, कधी हिरवट झाक असणारी तर मेदजूलची तपकिरी ते लाल रंगाची फळे

  • झाहिदी हा लालभडक, दिग्लेट नूर हा गर्द काळपट लाल किंवा चॉकलेटी रंगाची

  • भारतात बारही, मेदजूल, इदलशाही, असोली, थेट्टीयार, लोहार, भरी, शरण अशा पोटजाती

ओला खजूर, पोषणमूल्य भरपूर; थकवा दूर करण्यास होते मदत
ऑनलाईन सातबारा अन् हेलपाटे

उत्पादन कुठे?

खजुराचे मूळ स्थान मेसापोटेमिया अगर पार्शियाचे आखात असावे, असे मानले जाते. जगातील प्रमुख पिकांत खजुराची गणना होते. सौदी अरेबिया, इजिप्त, इराण, स्पेन, इटली, चीन, अमेरिकेत ७० टक्के उत्पादन होते. भारतात कच्छचे रण, राजस्थान, पंजाब, गुजरात, महाराष्ट्राचा सीमावर्ती प्रदेश, सोलापूर आदी भागात खजुराचे उत्पादन घेतले जाते.

असाही खजूर

  • गरातील साखर- ६० ते ७० टक्के

  • सुकवताना वजन किती- ३५ टक्के

  • एका गुच्छात (घोसात)-१०० खजूर

  • एका झाडावर लागणारी फळे- १०००

  • एक झाड एका वर्षात सरासरी खजूर देते- २५० किलो

  • झाडाचे आयुष्य १०० वर्षे

यासाठी उपयुक्त...

  • हृदयविकार

  • आतड्याच्या तक्रारीवर

  • भूक वाढविण्यासाठी

  • सर्दी बरी होण्यासाठी

  • रक्ताची कमतरता दूर होते

  • दुबळ्या हृदयासाठी

ओला खजूर, पोषणमूल्य भरपूर; थकवा दूर करण्यास होते मदत
आव्हाडांच्या प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांचा ब्रेक

"ओला खजूर हा गुजरातमधून येतो. लाल अन्‌ पिवळा असे प्रकार असून, पिवळा हिरवा खजूर अधिक गोड असतो; तर लाल खजूर तुरट, गोड असतो. नवी मुंबई (वाशी) मार्केटमध्ये गुजरातमधून ओल्या खजुराचे घोस येतात. तेथून हा खजूर राज्यातील अन्य भागात पाठविला जातो. जून ते ऑगस्ट दरम्यान हा ओला खजूर मिळतो. काही व्यापारी ऑर्डर देऊन हा खजूर मागवतात. साधारणपणे १०० रुपये किलोला तो विकला जातो."

- यासीन बागवान, फळ विक्रेते

"दिवसभरात चार ते पाच खजूर खावेत. खजुरात कॅलशियम, पोटॅशियम हे घटक भरपूर असतात. जे शरीराला उपयुक्त असतात. शिवाय मधुमेही लोकांनाही तो घ्यावा. पचनशक्ती सुधारते. काही प्रमाणात कॅन्सरला अटकाव होतो. गरोदर स्त्रीयांनीही खजूराचे सेवन करावे."

-प्रज्वला लाड, डायेटिशियन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()