तरुण वयातच सतावतोय मूत्रपिंड; अशी घ्या काळजी

Kidney
Kidney
Updated on

नागपूर : बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि जंक फूडमुळे मधुमेह, उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढत चालले आहे. यातच धूम्रपान आणि मद्यसेवनामुळे अनेक आजार तरुण वयापासूनच कायमचेच जडत आहेत. परिणामी, पस्तिशी-चाळशीतच मूत्रपिंडाचे विकार सतावू लागले आहेत. त्यातही डायलिसीस करावे लागण्याएवढ्या मूत्रपिंडांच्या गंभीर आजारांचे प्रमाण अतिरेक म्हणावे एवढे वाढत चालले आहे.

सध्याच्या जीवनशैली विषयक आजारांमध्ये मूत्रपिंडाचा किंवा रूढ भाषेत बोलायचे झाले तर किडणीचा आजार हा सर्वाधिक भयावह आणि रुग्णाला आत्यंतिक वेदना देणारा आहे. हा आजार होण्यामागे मधुमेह आणि धूम्रपान ही सर्वांत महत्त्वाची कारणे आहेत. जगभरातली सुमारे दहा टक्के लोकसंख्या मूत्रपिंडाच्या गंभीर आजारांनी त्रस्त आहे.

Kidney
औषध घेत नाही म्हणून पत्नीला मारलेली थापड ठरली जीवघेणी

६५ वर्षांवरील लोकांचा विचार करता जगात दर पाच पुरुषांमागे एकाला आणि दर चार स्त्रियांमागे एकला मूत्रपिंडाचा तीव्र आजार असतो. या गंभीर आजारात मूत्रपिंड निकामी होण्याचा समावेश होतो. या आजारात मूत्रपिंडाचे कार्य हळूहळू मंदावत जाते. मूत्रपिंड नेहमीच रक्तातले अतिरिक्त द्रव पदार्थ आणि टाकाऊ पदार्थ गाळून मूत्रातून बाहेर फेकतात. मूत्रपिंडाचा गंभीर आजार आणखी बळावतो त्यावेळी शरीरात द्रव पदार्थ, इलेक्ट्रोलाईट्स आणि टाकाऊ पदार्थ तयार होतात.

मूत्रपिंड विकार कसा होतो?

मूत्रपिंड विकाराची कारणे व प्रकार खूप आहेत. या लघवीचे प्रमाण कमी होते. रक्तदाब वाढतो. शरीरात पाणी व क्षारांचे प्रमाण वाढल्याने सर्वत्र सूज येते. डायबेटीस, उच्चरक्तदाब, मूत्रपिंडांना संसर्ग आदी कारणांमुळे मूत्रपिंडाच्या कामावर परिणाम होऊ शकतो. यावर तातडीने उपचार केले नाही तर मूत्रपिंडाचे काम थांबू शकते. मूत्रपिंडावर झालेला परिणाम हा तात्पुरता असल्यास त्यावर तातडीने उपचार करून कार्य पूर्ववत करणे शक्य आहे. परंतु, हळूहळू मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम होत गेला आणि त्याकडे दुर्लक्ष केले तर मूत्रपिंड वाचवणे अशक्य ठरते.

Kidney
१२ हजार जणांचे सदस्यत्व केले रद्द; साई भक्तांचा संताप

मूत्रपिंडाचे आजार जीवघेणे ठरू शकतात

टाइप वन किंवा टाइप टू मधुमेह, उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या गाळण यंत्रणेचा दाह म्हणजेच ग्लोमेरुलोनेफ्रायटस, मूत्रपिंडांच्या ट्युब्युल्स आणि त्या सभोवतालच्या रचनांचा दाह म्हणजेच इंटरस्टिशियल नेफ्रायटस असे आजार मूत्रपिंडाला दुर्बल बनवतात. प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढणे, मूतखडे होणे आणि काही प्रकारचे कर्करोग यामुळे मूत्रमार्गात दीर्घ काळ अडथळे निर्माण झाल्यामुळेही मूत्रपिंडाचे गंभीर आजार होतात. मूत्रपिंडाचे आजार जीवघेणे ठरू शकतात.

मूत्रपिंडाच्या आजाराची लक्षणे

  • मळमळ

  • उलट्या

  • भूक मंदावणे

  • अशक्तपणा

  • ग्लानी येणे

  • झोपेच्या समस्या उद्भवणे

  • लघवी होण्याच्या प्रमाणात बदल होणे

  • मानसिक प्रखरता कमी होणे

  • स्नायू आखडणे

  • पायात गोळे येणे

  • तळपाय आणि घोट्यांना सूज येणे

  • सतत खाज सुटणे

Kidney
नागपूरच्या राजा गणपतीला निरोप; वातावरण झाले भावुक

मूत्रपिंड विकार टाळण्यासाठी

  • नियमित आरोग्य तपासणी करा

  • भरपूर पाणी प्या

  • स्वतःहून कुठलीही औषधे घेणे टाळा

  • मिठाचे प्रमाण कमी करा

  • फास्ट फूड टाळा

  • धूम्रपान आणि मद्यपान टाळा

  • रक्तदाब व डायबेटीस असल्यास अधिक काळजी घ्या

  • ठरावीक अंतराने लघवी व रक्त तपास

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.