वय वाढायला लागल्यावर शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. मधुमेह, थकवा, अशक्तपणा अशासारख्या समस्यांबरोबरच अनेकांचे गुडघे दुखायला लागतात. बसण्याची चुकीची पद्धत, सांधेदुखी, लठ्ठपणा, फॅक्चर अशा समस्या सध्या तरूणांमध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे गुडघेदुखी कमी करण्यासाठी लोक विविध उपाय करत आहेत. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार एका झाडाच्या पानांचा अर्क गुडघेदुखी कमी करण्यासाठी मदत करतो.
अभ्यास काय सांगतो?
हा अभ्यास स्विसच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. संशोधनानुसार ऑलिव्ह किंवा ऑलिव्ह झाडाच्या पानांचा अर्क वेदनाशामक म्हणून काम करतो. ऑलिव्हच्या झाडाच्या पातळ आणि सरळ पानांमध्ये चांगली संयुगे आढळतात. त्याला पॉलीफेनॉल म्हटले जाते. त्याचे दाहक विरोधी गुणधर्म असून तीव्र सांधेदुखी असतलेल्या रूग्णांना सूज आली असल्यास ती कमी करण्यास मदत करतात. ऑलिव्ह ऑइल कोरोनरी धमन्यांमध्ये साठलेली चरबी कमी करून हृदयाचे रक्षण करते, असेही अभ्यासात आढळले आहे. याशिवाय, स्तनाचा कर्करोग, अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि नैराश्याचा धोका कमी करण्यासही यामुळे मदत होते.
१२४ लोकांवर केला अभ्यास
मस्कुलोस्केलेटल डिसीज जर्नल थेरप्यूटिक अॅडव्हान्सेसमध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे. या संशोधनात ५५ वर्षांहून अधिक वयाच्या१२४ लोकावर अभ्यास करण्यात आला. या संशोधनाचे नेतृत्व स्विसचे अस्थी शास्त्रज्ञ मेरी-नोले होरकाजादा(Marie-Noëlle Horcajada) यांनी केले होते. १२४ लोकांमध्ये स्त्री पुरूषांची संख्या समान होती. त्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त लोकांचे वजन जास्त होते. त्यापैकी ६२ लोकांना १२५ मिलीग्रॅम ऑलिव्हच्या पानांचा अर्क गोळ्यांच्या स्वरूपात दोनदा देण्यात आला. तर अर्ध्या लोकांना प्लेसबो देण्यात आले.
६ महिन्यांनी गुडघ्याची दुखापत आणि आणि ऑस्टियोआर्थराइटिस आउटकम स्कोर (KOOS) च्या आधारावर त्यांच्या वेदनांचे परीक्षण करण्यात आले. ज्यांचा KOOS स्कोअर जितका जास्त असेल त्यांना वेदना, त्रास तितकाच कमी असेल असे पाहण्यात आले. निष्कर्षांनुसार, ज्या लोकांनी ऑलिव्हच्या पानांचा अर्क गोळ्या घेतल्या होत्या त्यांचा KOOS स्कोअर 65 होता तर प्लासिबो घेततेल्यांचा स्कोअर ६० असल्याचे आढळले. संशोधकांनुसार गुडघेदुघी कमी करण्यासाठी आहारातील पूरक घटक मदत करू शकतात. प्राचीन ग्रीसपासून ऑलिव्हची पाने नैसर्गिक उपचारांसाठी वापरली जात आहेत. ते लोक रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी या पानांचा उपयोग करत असत. पण त्याचा अर्क घेणे तुमच्यासाठी योग्य आहे की नाही याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.