हाताला वारंवार घाम येतोय? मग 'हे' घरगुती उपाय करा अन् समस्येला दूर पळवा

sweatning on hand
sweatning on hande sakal
Updated on

नागपूर : उन्हाळ्याच्या काळात घाम येणे ही एक सामान्य पद्धत आहे. परंतु, जास्त घाम (excessive sweating) येणे आरोग्यास हानिकार ठरू शकते. घामाचे कारण सामान्यत: शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे असते. काही लोकांच्या तळहातांना जास्त घाम फुटतो आणि ते त्यांचे दैनंदिन कामकाज व्यवस्थित करू शकत नाहीत. इतकेच नाही तर घामामुळे कोणाशी हातमिळवणी करायला नको वाटते. आपल्या हातालाही वारंवार घाम येत असेल तर वेळीच सावधान होण्याची गरज आहे. तळहाताला येणाऱ्या व्यायामांना काही घरगुती उपायांनी (home remedies for excessive sweating) नियंत्रित केले जाऊ शकते. आज आपण याच उपचार पद्धतींबद्दल जाणून घेणार आहोत. (know about home remedies for excessive sweating on hands)

sweatning on hand
बावनकुळेंची धडपड कशासाठी? 'त्या' रिक्त जागेसाठी भाजप तगड्या उमेदवाराच्या शोधात

घामाला नियंत्रित करण्यासाठी घरगुती उपचार -

बेकिंग सोड्याचा वापर -

हाताचा घाम कमी करण्याचा बेकिंग सोडा हा एक चांगला मार्ग आहे. बर्‍याच लोकांकडे स्वयंपाकघरात बेकिंग सोड्याचा बॉक्स असतो. परंतु, आपणास माहित आहे की बेकिंग सोडा नैसर्गिक दुर्गंधीनाशक म्हणून देखील वापरला जाऊ शकतो. बेकिंग सोडा क्षारयुक्त असतो. त्यामुळे घामाच्या समस्येवर नियंत्रण मिळविणे शक्य आहे. एक चमच्या बेकिंग सोडामध्ये पाणी मिसळून पेस्ट बनवा. सुमारे पाच मिनिटे आपल्या हातावर पेस्ट घासून घ्या आणि नंतर आपले हात धुवा. यामुळे हातात घामावर नियंत्रण मिळविता येऊ शकते.

सफरचंद व्हिनेगर -

आपल्याकडे हायपरहाइड्रोसिस असल्यास, अ‌ॅपल सायडर व्हिनेगर आपल्या शरीरातील पीएच पातळी संतुलित करून आपले तळवे कोरडे ठेवू शकते. तळव्यावर अ‌ॅपल सायडर व्हिनेगर लावून ते रात्रभर ठेवा. दैनंदिन आहारामध्ये देखील २ चमचे या व्हीनेगरचा समावेश करू शकता. यामुळे शरीराचे पीएच संतुलित राहण्यास मदत होईल.

सेझच्या पानांचा समावेश -

आपल्या आहारात सेझच्या पानांचा समावेश करणे किंवा सेझचा चहा घेतल्यास हातातील घाम दूर होऊ शकतो. त्याच्या वापरासाठी, सेझची पाने कोरडी करा आणि तिची पावडर बनवून कपड्यात ठेवा. तो कपडा हातात पकडून ठेवा. तळव्याला घाम येत असेल तर यामुळे आराम मिळतो.

कच्च्या बटाट्यांचा वापर -

आपल्या हातात जास्त घाम येण्याची समस्या असल्यास बटाटा वापरणे देखील आपल्यासाठी एक चांगला पर्याय आहे. यासाठी आपण कच्च्या बटाट्याचे काप कापून तळव्यावर चोळा आणि थोडावेळ सोडून द्या. यामुळे घामाची समस्या चुटकीसरशी नाहीशी होईल.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.