Daily योग: धनुरासन केल्याने 'या' शारीरिक समस्या होतील दूर

धनुरासन केल्यामुळे पोट, छाती यांच्याशी निगडीत समस्या दूर होतात.
Daily योग: धनुरासन केल्याने 'या' शारीरिक समस्या होतील दूर
Updated on

योगाभ्यासातील धनुरासन करताना आपल्या शरीराचा आकार धनुष्याप्रमाणे होत असतो. त्यामुळेच या आसनाला धनुरासन असं म्हटलं जातं. या आसनामुळे पोट, छाती यांच्याशी निगडीत समस्या दूर होतात. त्यामुळेच हे आसन कसं करावं आणि त्याचे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊयात. (know-about-how-to-do-dhanurasana-bow-pose-yoga-and-health-benefits)

धनुरासन करण्याचे फायदे

१. पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते.

२. बद्धकोष्ठता, गॅस या समस्या दूर होतात.

३. भूक वाढते.

४. हातापायांना मुंग्या किंवा कंप येत असेल तो त्रास कमी होतो.

५. श्वासोच्छवासाची क्रिया सुरळीत होते.

६. पोटदुखी किंवा पोटासंबंधित तत्सम समस्या दूर होतात.

७. पचनक्रिया सुरळीत होते.

८. रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुरळीत होते.

धनुरासन कसं करावं?

१. हे आसन शक्यतो रिकाम्या पोटी करावं.

२. प्रथम पोटावर पालथं झोपा.

३. त्यानंतर पाय गुडघ्यापर्यंत फोल्ड करावेत.

४. गुडघे फोल्ड केल्यानंतर दोन्ही हातांनी पायांची बोटं किंवा पावलं पकडण्याचा प्रयत्न करावा.

५. पायाची बोटं पकडल्यानंतर श्वास घेत हळूहळू छाती जमिनीपासून वर उचलण्याचा प्रयत्न करावा.

६. छाती व मान वर उचलल्यानंतर केवळ पोटाचा स्पर्श जमिनीला होईल.

७. या स्थितीमध्ये शक्य तितका वेळ रहावं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.