थंडीत कोवळ्या उन्हात बसणे सर्वांनाच आवडते. १५-२० मिनिटांचा सूर्यप्रकाश हा शरीरातील आळस दूर करतोच पण, शरीरातील(Body) व्हिटॅमिन डीची (Vitamin D) कमतरता पूर्ण करतो. आठवड्यातले (Week) दोन तीन दिवस तुम्ही १० ते १५ मिनिटे उन्हात बसलात तर अनेक गंभीर आजार टाळता येतात. युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ ऑस्ट्रेलियाने नुकत्याच केलेल्या संशोधनात सुर्यप्रकाशामुळे आपण व्हिटॅमिन डीची करमतरता सहज पूर्ण करू शकतो. पण जर तसे झाले नाही तर व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे तुमची हाडे कमकुवत तर होतातच पण, हृदयावरही परिणाम होतो.
उच्च रक्तदाब आणि हृदयावर परिणाम
व्हिटॅमिन डी ((Vitamin D)ची कमतरता ही हृदयविकार होण्यासाठी अत्यंत महत्वाचे कारण आहे. साहमरी येथील युनिसाच्या ऑस्ट्रेलियन सेंटर फॉर प्रेसिजन हेल्थच्या संशोधकांनी (Reserch) याबाबात सांगितले. संशोधनानुसार व्हिटॅमिन डीची कमतरता असलेल्या लोकांमध्ये हृदयरोग, उच्च रक्तदाब होण्याचा धोका खूप जास्त असतो.
कमतरतेमुळे होणारे इतर आजार
संशोधनानुसार, शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हृदयरोग, उच्च रक्तदाबाचा (BP) त्रास होण्याची शक्यता जास्त असते. तसेच हाडे कमकुवत होणे, केस गळणे, नैराश्य-चिंता यासरखी लक्षणेही दिसून येतात.
आहारात करा बदल (Diet Food)
व्हिटॅमिन डी मिळविण्याठी तुम्ही रोज सकाळी १० ते १५ मिनिटे उन्हात (Sun) बसणे गरजेचे आहे. जर तुम्हाला सन टॅन होण्याची भिती वाटत असेल तर सूर्याकडे पाठ करून बसा. त्याचबरोबरीने तुम्ही डाएटमध्ये व्हिटॅमिन डीचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खा. त्यासाठी आहारात मशरूम, फॅटी फिश आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा.
या देशातल्या लोकांना त्रास जास्त (Health Issue)
अभ्यासानुसार (Study), ऑस्ट्रेलियामध्ये अंदाजे २३ टक्के लोक, अमेरिकेतील २४ टक्के आणि कॅनडातील ३७ टक्के लोकांना व्हिटॅमिन डीची कमतरता भेडसावते आहे. भारतातही ही समस्या दिसून येत आहे. भारतात ७० ते ८० लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.