तुम्ही तुमचा टीव्ही बंद केला, मोबाईल पाहत बसलात आणि अचानक तुम्हाला कळाले के रात्रीचे दोन वाजले आहेत. आणि आता लॅपटॉपवर तुमचं काम सुरु करण्यासाठी काही तासच उरले आहेत. असा अनुभव तुम्हालाही अनेकदा आला असेल. कोरोना व्हायरसमुळे सध्या अनेकांना घरुनच काम करावे लागत आहे. शिवाय घराबाहेर जायलाही परवानगी नाही. त्यामुळे नुसतं स्क्रीन-स्क्रीन असं आपलं आयुष्य झालं आहे.
एका रिपोर्टनुसार, लोकांचा स्क्रीन पाहण्याचा कालावधी कोरोना महामारी पसरण्याच्या आधिच्या काळापेक्षा 30 टक्क्यांनी वाढला आहे. म्हणजे लोकांचा स्क्रीन टाईम वाढत चालला आहे. मात्र, लॅपटॉप, मोबाईलची स्क्रीन पाहण्यात तासंतास घालवणे शरीरासाठी आणि मानसिकदृष्या अपायकारक आहे.
तुमचा बराचसा वेळ स्क्रीनकडे पाहण्यात जात असेल तर तुम्ही पुढील गोष्टी करु शकता--
1. किती काळ स्क्रीनकडे पाहणे हितकारक आहे याबाबत काही ठोकताळा नाही. मात्र, तासंतास स्क्रीनसमोर बसून राहणे योग्य नाही. एका तासापेक्षा जास्त काळ तुम्ही स्क्रिनसमोर घालवणे अपायकारक आहे. दरवेळी 15 मिनिटांचा ब्रेक घेणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरु शकतं.
जास्तवेळ लॅपटॉप किंवा कॉम्युटर स्क्रीनसमोर घालवल्याने डोळ्यांवर ताण निर्माण होऊ शकतो. तसेच डोखेदुखी आणि डोळ्यात जळजळ होऊ शकते.
2. तुमच्या नकळत तुम्ही मोबाईल किंवा टॅबकडे का जाता? कारण तुम्हाला या गोष्टींची सवय झाली आहे. ही सवय मोडायची असेल तर तुम्हाला तुमचं लक्ष दुसरीकडे केंद्रीत करावे लागेल. मोकळा वेळ मिळाला म्हणून मोबाईलकडे जाण्यापेक्षा दुसऱ्यांशी संवाद साधा. सतत मोबाईल किंवा टॅबमधील इंटरनेट सुरु ठेवण्यापेक्षा काम नसताना ते तुम्ही बंद करु शकतो. जेणेकरुन मोबाईलमध्ये आलेल्या मेसेजकडे तुमचे वारंवार लक्ष जाणार नाही.
3. तुमचा स्क्रीन वेळ तुम्ही निर्धारीत करा. कोणतीही गोष्ट करताना योजना बनवणे आवश्यक असते. दिवसातील या वेळी मी मोबाईल किंवा लॅपटॉप स्क्रीन पाहणार नाही असं तुम्ही ठरवू शकता.
सकाळी उठल्यानंतर थेट मोबाईलकडे जाण्यापेक्षा तुम्ही अन्य गोष्टी करु शकता. सकाळी मोबाईलमध्ये गजर लावण्यापेक्षा तुम्ही त्यासाठी एक गजर घडी घेऊ शकता.
सकाळपेक्षा रात्री स्क्रीनपासून दूर राहणं महत्वाचं आहे. झोपायला जाण्याच्या एक तासअगोदर मोबाईल पाहू नका. स्क्रीनमधून निघालेली निळ्या रंगाची लाईट तुमच्या बुद्धीला सकाळ असल्याचा भास करुन देऊ शकते. ज्यामुळे तुम्हाला निद्रानाश होऊ शकतो.
4. लोकांशी संपर्क साधण्याचे वेगवेगळे मार्ग शोधा. झूम, स्काईप किंवा इतर व्हिडिओ कॉलिंग अॅपच्या माध्यमातून आपण मित्रांशी संपर्क साधतो. नेहमीच इतरांशी व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून बोलणे गरजेचं नसतं. केवळ ऑडिओ कॉल करुन आपण इतरांशी चांगल्या रितीने जोडले जाऊ शकतो.
5. शारीरिक हालचाली होणे आवश्यक आहे. कोरोना महामारी येण्यापूर्वी आपण ऑफीस संपल्यानंतर मित्रांसोबत जाणे किंवा बाहेर जेवायला जाणे अशा गोष्टी करायचो. मात्र, आता घरुनच काम सुरु असल्याने काम संपल्यानंतर नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, यु-ट्यूब अशांकडे आपण वळत आहोत.
काम संपल्यानंतर आपण स्क्रीनशिवाय आपला वेळ घालवू शकतो. कुटुंबीयांसोबत वेळ घालवणे, पुस्तक वाचणे किंवा स्वयंपाक बनवणे अशा गोष्टी आपण करु शकतो. एकाच जागी स्क्रीनसमोर जास्तवेळ बसून राहिल्याने पाठदुखीचाही त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या शरिराची हालचाल जितकी जास्त तितके आपण निरोगी राहू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.