Lassa fever चं संकट! जाणून घ्या लक्षणं आणि तो कसा पसरतो?

ब्रिटनमध्ये लासा विषाणूने धुमाकूळ घातला आहे
Lassa fever
Lassa feverSakal Digital
Updated on

Lassa fever : कोरोनाचा प्रभाव जगभरात अजून संपलेला नाही. हे कमी होतं की काय म्हणून आता नव्या विषाणूने (Virus) चिंता वाढवली आहे. ब्रिटनमध्ये लासा विषाणूने धुमाकूळ घातला आहे. त्यात तीन रूग्ण आढळून आले असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. हा विषाणू आफ्रिकन देशांव्यतिरिक्त कोठेही पोहोचला नसला तरी ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या केसनंतर शास्त्रज्ञांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या प्रकारात मृत्यूचे (Death) प्रमाण जास्त नसले तरी 80 टक्के प्रकरणांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. युरोपियन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या मते, या आजारावर आतापर्यंत कोणताही इलाज मिळालेला नाही. काही रूग्णांमध्ये गुंतागुंत निर्माण होऊन त्यांना रूग्णालयात दाखल करावे लागते. त्यात 15 टक्के रूग्णांचा मृत्यू होतो. गर्भवतींना या आजाराचा धोका जास्त आहे. (Lassa Virus)

Lassa fever
Diabetes असलेल्यांनी 'या' 6 पांढऱ्या पदार्थापासून राहा दूर

लासा फिव्हर म्हणजे काय ? तो कसा पसरतो (Lassa fever transmission)

हा आजार पहिल्यांदा १९६९ साली पश्चिम आफ्रिकेत नायजेरियेतील लासामध्ये आढळला. तेव्हा दोन नर्सचा मृत्यू झाल्यानंतर याविषयी नोंद घेतली गेली. हा आजार उंदरांमुळे पसरतो. तो पहिल्यांदा नायजेरिया, गिनिया, सियरा, लियोन, लायबेरिया येथे महामारी म्हणून घोषित केला गेला.

उंदरांमुळे हा आजार पसरतो. उदरांची लघवी- विष्ठेमुळे किंवा त्यांनी दुषित केलेल्या खाद्यपदार्थांच्या संपर्कात लासाची लागण होण्याची शक्यता वाढते. जर संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात दुसरी व्यक्ती आली तर त्यालाही हा आजार होऊ शकतो. तसेच, जोपर्यंत त्या व्यक्तीमध्ये लक्षणे दिसत नाहीत, तोपर्यंत दुसऱ्या व्यक्तीला त्याचा संसर्ग होऊ शकत नाही. याशिवाय जर तुम्ही लासाची बाधा झालेल्या रूग्णाला मिठी मारल्याने, हात मिळवल्याने, किंवा त्याच्या जवळ बसल्याने हा आजार पसरू शकत नाही.

Lassa fever
महिन्यात ५ किलो वजन कमी करायचंय? हा घ्या डाएट प्लॅन

लक्षणं कशी ओळखावीत? (What are the early signs and symptoms of Lassa fever?)

लासा विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर 1 ते 3 आठवड्यांनी रुग्णाला सौम्य लक्षणं दिसायला सुरूवात होते. सुरूवातीला साधा ताप येतो. त्यानंतर थकवा, अशक्तपणा, डोकेदुखी अशीही लक्षणे दिसतात. यानंतर, रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. याशिवाय चेहऱ्यावर सूज येणे, कंबर, छाती, पोटात दुखायला लागते. काही वेळी रक्तस्त्राव सुरू होतो. जर लक्षण तीव्र असतील आणि योग्य उपचार मिळाले नाहीत तर रूग्णाचा मृत्यू होऊ शकतो. अनेक अवयव निकामी होऊ शकतात. तसेच जवळपास एक तृतीयांश लोकांना बहिरेपणा आलेला आहे. तसेच कायमस्वरूपी बहिरेपण येऊ शकतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()