न्युमोनियामुळे लतादीदींचे निधन! वृद्धांना का होतो न्युमोनिया! जाणून घ्या

अनेक ज्येष्ठ नागरिकांना न्यूमोनिया झाल्याने त्यांचा मृत्यू होत आहेत.
न्युमोनियामुळे लतादीदींचे निधन! वृद्धांना का होतो न्युमोनिया! जाणून घ्या
Updated on

गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे वार्धक्यानं निधन झाले आहे. लता मंगेशकर यांना कोरोनाबरोबरच न्यूमोनियाची (Pneumonia) लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर मुंबईमधील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach candy Hospital) उपचार सुरु होते. गेल्या काही काळात अनेक ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizens) न्यूमोनिया झाल्याने त्यांचा मृत्यू होत आहे. लहान मुलं, वृद्ध माणसे न्यूमोनियाला सहज बळी पडतात. वृद्धत्व तसेच प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यामुळे न्यूमोनिया होतो. अशावेळी फुफ्फुसावर परिणाम होऊन त्यांची मारक क्षमता वाढते.

न्युमोनियामुळे लतादीदींचे निधन! वृद्धांना का होतो न्युमोनिया! जाणून घ्या
शब्दांपलिकडच्या वेदना! PM मोदींनी वाहिली लतादिदींना श्रद्धांजली
senior citizens health problem
senior citizens health problem esakal

न्यूमोनिया का होतो?

कोरोनाचा संसर्ग होण्याआधी किंवा नंतर न्यूमोनिया होण्याचा धोका मोठा असतो. कोरोनानंतर न्यूमोनिया झाल्यास धोका अधिक वाढतो. कारण तुमच्या फुफ्फुसात संसर्ग होण्याचे प्रमाण दुपटीने वाढते, असे इंडियन इंडियन चेस्ट सोसायटीचे सदस्य आणि पल्मोनोलॉजिस्ट आणि अ‌ॅलर्जिस्ट डॉ. ए. के. सिंग यांनी सांगितले. न्यूमोनिया झाल्यावर फुफ्फुसात संसर्ग (Infection in Lungs) वाढतो. तो एक्स-रेमध्ये स्पष्ट दिसतो. न्यूमोनियासह सेप्सिस (Sepsis) हाही एक रोग होण्याची शक्यता काही जणांमध्ये बळावते. जर एखाद्याला सेप्सिस असेल तर शरीरातील न्यूमोनिया हा आणखी धोकादायक होतो. यामध्ये न्यूमोनिया हा फुफ्फुसांतून रक्तापर्यंत पोहोचल्याने साहजिकच रुग्णावर त्याचे अत्यंत गंभीर परिणाम दिसायला लागतात. अशावेशळी 5 ते 10 टक्के लोकांचा मृत्यू होऊ शकतो. काही रूग्णांना आयसीयुमध्ये ठेवावे लागते. पण त्यांची वाचण्याची शक्यता कमी असते. त्यांच्या मृत्यूचे प्रमाण 30 टक्के असते. रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने असे घडते, असे डॉक्टर सांगतात.

न्युमोनियामुळे लतादीदींचे निधन! वृद्धांना का होतो न्युमोनिया! जाणून घ्या
Lata Mangeshkar: गानकोकीळा लता दीदींचं प्रत्येक गाणं सुपर हिट होतं अन् राहिल...
pneumonia
pneumonia esakal

वृद्धांमधली प्रतिकारशक्ती होते कमी

वृद्धांच्या शरीराची प्रतिकारशक्ती फारशी चांगली नसते. त्यामुळे औषधे दिली तरी फारसा परिणाम होत नाही. शरीर रोगाशी लढण्यास तितकंसं सक्षम राहत नाही, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती उपचारांना योग्य प्रतिसाद देऊ शकत नसल्याने तब्येत आणखी बिघडते आणि रोगही वाढतो.

न्युमोनियामुळे लतादीदींचे निधन! वृद्धांना का होतो न्युमोनिया! जाणून घ्या
कोरोनामुळे होणारा न्यूमोनिया टाळणे शक्य; फुप्फुसरोगतज्ज्ञांचे मत
senior citizens health problem
senior citizens health problem esakal

काय काळजी घ्याल?

जर तुम्हाला खोकल्याबरोबर पिवळ्या रंगाचा कफ बाहेर येत असेल, तसेच खूप ताप असेल आणि दीर्घ श्वास घेताना माणसाला खूप वेदना असतील, तर तो न्यूमोनिया असतो. छातीच्या एका बाजूला किंवा दोन्ही बाजूला दुखणे हेही लक्षण असते. अशावेळी लगेच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेणे गरजेचे असते. या आजारात फुफ्फुसांना सर्वाधिक नुकसान होत असल्यानं धोका गंभीर होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()