Health Benefits: तुळशीची पाने खाण्याचे आरोग्यदायी फायदे...

 tulsi
tulsi esakal
Updated on
Summary

दररोज तुळशीच्या पानांचे सेवन करण्याचा एक योग्य मार्ग आहे. चला जाणून घेऊया तुळशीच्या चमत्कारिक फायद्यांबाबत...

 tulsi
मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करताय? अशावेळी करु नका ही चूक...

हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये तुळशीला महत्त्वाचे स्थान मानले गेले आहे. त्याचप्रमाणे आयुर्वेदातही तुळशीच्या वनस्पतीचे वैशिष्ट्य सांगितले जाते. आयुर्वेदानुसार तुळशीच्या वनस्पतीमध्ये अनेक औषधी गुण लपलेले आहेत. जे शरीराचे अनेक रोग नष्ट करतात. दररोज तुळशीच्या पानांचे सेवन करण्याचा एक योग्य मार्ग आहे. चला जाणून घेऊया तुळशीच्या चमत्कारिक फायद्यांबाबत...

 tulsi
अन्न शिजवताना ही घ्या काळजी; नाही तर पोषणमूल्ये होईल नष्ट
Tulsi
Tulsi esakal

तुळशीच्या पानांची खासियत आणि ते खाण्याचा योग्य मार्ग?

तुळशीमध्ये लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, मॅंगनीज, अँटिऑक्सिडंट्स, अॅंटी-इंफ्लामेटरीआणि अॅंटी-माइक्रोबियल गुणधर्म असतात. त्याचबरोबर तुळशीची पाने सकाळी रिकाम्या पोटी खावीत. तुळशीची 4-5 ताजी पाने तोडून आणि सकाळी धुवून खाऊ शकता. त्याच वेळी, ते चहा आणि अन्नामध्ये मिसळून देखील सेवन केले जाऊ शकते.

 tulsi
घरी फ्रीज नाही, अन्न खराब होतंय? 'या' बेस्ट टिप्स जरुर वापरा
Tulsi
Tulsi esakal

तुळशीच्या पानांचे फायदे...

- तुळशीच्या पानांचे नियमित सेवन केल्याने ब्लड शुगर ची पातळी नियंत्रणात राहते.

- तुळशीच्या पानांचे सेवन पचन सुधारते असे मानले जाते. ज्यामुळे वजन संतुलित राहते आणि लठ्ठपणा दूर राहतो.

- तुळशीमध्ये असलेले गुणधर्म देखील तोंडातील दुर्गंधी दूर करण्यास मदत करतात.

- तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी तुळशीची पानं खूप मदत करतात.

- स्कीनला हेल्दी आणि पिंपल्सपासून दूर ठेवण्यासाठी तुळस हा चांगला पर्याय आहे.

- पोटाच्या विकारांमुळे पीडित लोकांसाठी तुळस हे एक वरदान आहे.

- पोटात जळजळ, पोटदुखी, गॅस, ब्लोटींग इत्यादी समस्या दूर करण्यासाठी तुळशीचा वापर केला जातो.

- तुळस ही किडनीचं प्रक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.