गुणकारी लिंबाची किमया लय भारी, आरोग्यासह जिभेलाही देई फायदा

Lemon is very beneficial for health
Lemon is very beneficial for health
Updated on

औरंगाबाद : लिंबू सर्वांच्या खाण्यात असतो. लिंबू हे जीवनसत्त्व (व्हिटॅमिन) ब, क आणि फाॅस्फरसचा चांगला स्त्रोत मानला जातो. तसेच पाण्यात उकडलेले लिंबू खाल्ल्यास आणखी पोषण मूल्य वाढतात. तुम्हाला ते इन्स्टंट एनर्जी देते.

उन्हाळा सुरु झाला आहे. यामुळे सतत प्यायला पाणी लागते व घामाचा त्रास सुरु झाला आहे. वाढत्या तापमानात जास्त करुन पाणी असलेले फळ खाण्याचा सल्ला दिला जातो. बाजारात लिंबू सरबत आणि शिकंजी मिळते. त्याऐवजी तुम्ही जर खास पद्धतीने बनवलेले लिंबू सरबत घेतले, तर तुम्ही अनेक आजारांपासून दूर रहाल. संशोधन असे सांगते की लिंबू आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते. वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही जर लिंबू उकडून तो खाल्ला तर आरोग्यास लाभकारक ठरते.

कसे बनवणार हे पेय?

तुम्हाला विशेष असे काही करायचे नाही. फक्त तीन ते चार कप पाण्यात 6 ते 7 लिंबूचे तुकडे टाकून उकळून घ्या. हे पाणी उकळल्यानंतर त्यात लिंबाचा रस टाका. त्यानंतर ते थंड करुन फ्रिजमध्ये ठेवा. हे दररोज एका कपमध्ये घेऊन त्यात मध टाकून गरम करुन प्या.

ही आहेत फायदे

सर्दी आणि खोकला राहिल दूर

हे पेय घेतल्याने तुम्हाला सर्दी, खोकल्यापासून दूर राहिल. या पेयातील अँटिऑक्सिडन्ट सर्दी व खोकल्यापासून दूर ठेवण्यास मदत करते. 

पचन शक्तीत सुधारणा होईल

प्यायला सुरूवात केल्यानंतर तुमची पचनक्रियेतही सुधारणा होईल. या पेयात अॅसिडची मात्रा अधिक असते. ज्याने पोट साफ होते. 

इन्स्टन्ट एनर्जी मिळेल

लिंबू जीवनसत्त्व ब, क, फाॅस्फरसचा चांगला स्त्रोत मानला जातो. तसेच पाण्यात लिंबू उकडून ते खाल्ल्यास त्यामुळे पौष्टिक सत्त्व मिळतात. ते तुम्हाला इन्स्टन्ट एनर्जी देतो.
 
वजन कमी करण्यास मदत
 
लिंबातील फायबर तुम्हाला वजन कमी करायला मदत करते. फायबरमुळे तुम्हाला वारंवार भूक लागत नाही. ज्यामुळे तुमचे वजन संतुलित राहते. 

त्वचा खुलते

या पेयातील पोटेशियम आणि जीवनसत्त्व क रक्तपेशी स्वच्छ करते. त्याच बरोबर नवीन रक्तपेशी बनवते. ज्यामुळे तुमची त्वचा आणि चेहरा उजळतो.

संपादन : सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.