शंकराच्या आवडीचं बेलपत्र शरीरासाठीही फायदेशीर; वाचा पाच भन्नाट फायदे

बेलाचे आयुर्वेदाच्या दृष्टीनेही महत्व मोठे आहे.
BelPatra Benefits
BelPatra Benefits
Updated on

उद्या महाशिवरात्र आहे. शंकराला बेल अतिशय प्रिय असल्याने या दिवशी शंकराला आवर्जून बेलपत्र वाहिले जाते. त्याचे धार्मिक महत्व मोठे असले तरी आयुर्वेदाच्या (Ayurveda) दृष्टीनेही महत्व मोठे आहे. बेलपत्र अनेक गंभीर आजारांवर (Health Issue) उपचार करण्यास मदत करू शकते. बेलाचे फळ, मूळ, पान आणि फांद्या यांचा उपयोग औषध बनवण्यासाठी केला जातो. बेल बद्धकोष्ठता, अतिसार, मधुमेह आणि इतर रोगांसाठी वापरले जाते. बेलच्या पानांमध्ये टॅनिन, फ्लेव्होनॉइड्स आणि कौमरिन ही रसायने असून ती अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त असतात. ही रसायने जळजळ कमी करण्यास मदत करतात, दमा, अतिसार आणि उच्च रक्तातील साखरेसारख्या विकारांचा धोका कमी करतात. त्याचबरोबर बेलाचे अनेक फायदे (Benefits) आहेत.

BelPatra Benefits
कमी कॅलरीयुक्त पदार्थ खाल, तर जास्त जगाल! संशोधनात स्पष्ट
diabetes contol
diabetes contol

असे आहेत बेलाचे पाच फायदे

मधुमेह नियंत्रणासाठी मदत- बेलाची पान शरीरातील साखर नियंत्रित ठेवण्यास फायदेशीर असतात. याचे कारण म्हणजे त्यात भरपूर रेचक गुणधर्म आढळतात. जे पुरेसे इंन्सुलिन आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात.

श्वसनाच्या आजारासाठी फायदेशीर- बेलाच्या पानांपासून तेल काढले जाऊ शकते. हे तेल दमा,सर्दीसह इतर श्वसन समस्या बरे करण्यासाठी फायद्याचे मानले जाते.

बद्धकोष्ठतेसाठी फायद्याचे - बेलाच्या पानाला थोडेसे मीठ आणि मिरपूड लावून चघळल्याने बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते. तसेच आतड्यांमधून विष काढून टाकण्यासाठी बेलाची पाने फायदेशीर ठरतात.

BelPatra Benefits
कार्टून बघायचं, डोनट्स खायचे! एवढचं करून 'तो' कमावतो लाखोंचा पगार

अतिसाराचा त्रास कमी होतो- बेलमध्ये टॅनिन असते. त्यामुळे ते अतिसार, कॉलरा यासारख्या रोगांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहे. बेलाच्या कच्च्या पावडरचा उपयोग केला जातो. त्याची कच्ची पानेही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

दाहक विरोधी गुणधर्म- बेलामध्ये अँटी-फंगल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म आहेत. त्यामुळे शरीरातील अनेक प्रकारच्या संक्रमणांच्या उपचारांमध्ये त्याचा वापर केला जातो. बेलाच्या पानांमध्ये प्रतिजैविक गुणधर्म आढळतात. त्यामुळे रोग बरे होण्यास मदत होते.

BelPatra Benefits
केवढं मोठ्ठ कुटुंब! Family Tree मध्ये २ कोटी ७० लाख नातेवाईक, रिसर्चमध्ये दावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.