Infertility Symptoms : जोडप्यांमधील सगळ्यात मोठी समस्या म्हणजे वंध्यत्व; कोणती आहेत कारणे?

जगभरात वयाच्या तिशीतील १०० पैकी २५ टक्के जोडप्यांना वंध्यत्वाला सामोरे जावे लागते. या समस्येची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
Infertility Symptoms
Infertility Symptomsesakal
Updated on
Summary

जगभरात वयाच्या तिशीतील १०० पैकी २५ टक्के जोडप्यांना वंध्यत्वाला सामोरे जावे लागते.

Infertility Symptoms : हल्लीच्या काळात जोडप्यांमधील सगळ्यात मोठी समस्या म्हणजे वंध्यत्व (Infertility). अफाट लोकसंख्या असलेल्या देशात डॉक्टरांकडे जाण्याचे प्रमुख कारण हे वंध्यत्व आहे. जगभरात वयाच्या तिशीतील १०० पैकी २५ टक्के जोडप्यांना वंध्यत्वाला सामोरे जावे लागते. या समस्येची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ५ टक्के लोकांमध्ये सदोष गुणसूत्रे, हार्मोन्समधील बदल आदी कारणांमुळे तर ९५ टक्के लोकांमध्ये विषारी मूलद्रव्यांच्या संपर्कामुळे, गुप्तरोग आदी कारणांमुळे वंध्यत्व आढळून येते. वाढत्या वयाबरोबर याचे प्रमाणही वाढत जाते, तसेच २० वर्षे वयोगटातील महिलांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण १-२ टक्के, २० वर्षांनंतरच्या महिलांमध्ये (Women) १६ टक्के, ३० वर्षे वयोगटातील महिलांमध्ये २५ टक्के, ४० वर्षे वयोगटातील महिलामध्ये ५० टक्के आढळून येते.

Infertility Symptoms
Oral Cancer Symptoms : कॅन्सर होऊ नये यासाठी काय करावे? Cancer नक्की कशामुळं होतो? जाणून घ्या..

तरुणवर्गाला भेडसावणारा प्रश्‍न म्हणजे वंध्यत्व. याची अनेक कारणे आहेत, उदा. प्रदूषण, शहरीकरण, मानसिक ताण, रासायनिक घटकांचे हवेतील वाढते प्रमाण, खाण्या-पिण्याच्या सवयी इ. गोष्टींमुळे हार्मोन्समध्ये (Hormones) बदल होतात आणि त्यामुळे आवश्यक द्रव असतात त्याच्यावर परिणाम होतात आणि त्यामुळे वंध्यत्वाची समस्या उद्भवू शकते. पुरुषांमधील वंध्यत्वाची कारणे : पुरुष हा या सर्व प्रक्रियांमधील महत्त्वाचा घटक असतो. लहानपणी गालगुंड येणे, काही लैंगिक आजार असणे, वेगवेगळ्या प्रकारची व्यसने असणे तसेच उष्ण तापमानात काम करणे इ. गोष्टींमुळे धातू बनण्याची क्रिया कमी होते किंवा संपुष्टात येते. या कारणांमुळे पुरुषांमध्ये वंध्यत्वाची लक्षणे जास्त प्रमाणात दिसून येतात.

पुरुषांबरोबर स्त्रियांमध्येदेखील वंध्यत्वाची असंख्य लक्षणे दिसून येतात. स्त्रियांमधील या समस्येचे मुख्य कारण म्हणजे Biological clock; पण हे biological clock पूर्वीच्या काळी महिलांमध्ये नव्हते का? त्यांना या तक्रारींना तोंड द्यावे लागले नाही का? असा काय बदल झाला मागील काही वर्षांमध्ये की, ही समस्या वाढतच चालली आहे? तर बदलत चालली आहे, ती माणसाची वयोमर्यादा आणि महिलांचे गर्भधारणा होण्याचे वय. वयाच्या ३३व्या वर्षानंतर स्त्रियांमध्ये अंडकोष बनण्याची क्रिया कमी कमी होत जाते आणि ती ३८व्या वर्षापर्यंत थांबते. त्यामुळे पूर्वीची लोकं सांगायची की, लवकर लग्न करा. ३० वर्षापर्यंत एकतरी मूल झालेच पाहिजे कारण, योग्य त्या वयात मूल झाले नाही तर मग अशा समस्यांना तोंड द्यावे लागते.

Infertility Symptoms
Health News : मुलांमधील स्थूलतेचा वाढता प्रकोप; कोणती आहेत कारणे, कशी घ्याल काळजी?

वंध्यत्वाची आणखी काही कारणे पुढीलप्रमाणे ः गर्भपिशवीतील दोष, पीसीओडी सारखे आजार, Fibroid, गर्भपिशवीमध्ये गाठ असणे, अंगावरून पांढरे जाणे हेही वंध्यत्वाचे एक कारण होऊ शकते. उपचारांची सुरुवात आम्ही उपचारांची सुरुवात जोडप्यांबरोबर चर्चेने करतो. या चर्चेमध्ये कोणाचे गुणदोष शोधण्याचा, जाणून घेण्याचा आमचा हेतू नसतो तर त्यांच्या अडचणी, सवयी, दिवस न जाण्याची कारणे आदी गोष्टी जाणून घेऊन मग त्यावरती उपचार चालू केले जातात. त्याचप्रमाणे बऱ्‍याच स्त्रियांचे पती बाहेरगावी असतात.

त्यामुळे त्यांची येण्याची वेळ, कालावधी या सर्व गोष्टी जाणून घेणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे नवरा-बायको दोघेही हजर असणे आवश्यक असते. त्यांच्या उपचारासाठी लागणारा वेळ, येणारा खर्च आदींबाबत सविस्तर चर्चा केली जाते. या सगळ्या प्रक्रियेमध्ये पुरुषाची तपासणी सर्वात महत्वाची असते. पुरुषांमधील शुक्राणू हा सगळ्यात महत्वाचा घटक असतो. प्रत्येक उपचार ही टप्प्याटप्प्याने केली जाते. हार्मोन्सची तपासणी, HSG, सोनोग्राफी.

Infertility Symptoms
Computer Vision Syndrome : कॉम्प्युटरचे दृष्टिदोष टाळा अन् 20-20-20 चा नियम पाळा

IUI म्हणजे काय?

यामध्ये पुरुषांच्या वीर्यावर प्रक्रिया करून त्यामधून सर्वात चांगले आणि जास्त वेगवान असलेले शुक्राणू मिळवले जातात. मग ते महिलेच्या गर्भपिशवीत एका catheter च्या साहाय्याने सोडले जातात. आता Infertility चे पेशंट मोठ्या प्रमाणात उपचार घेण्यासाठी पुढे येताना दिसतात. अशा पेशंटसाठी नवनवीन टेक्निक (तंत्र) चालू झाल्या आहेत.

(डॉ. चिरायू हॉस्पिटल येथे स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्रज्ज्ञ आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.