मलेरियाचे औषध घशाच्या Cancerवर ठरेल उपयुक्त! संशोधकांचा दावा

हे संशोधन पिट्सबर्ग विद्यापीठ आणि पिट्सबर्ग मेडिकल सेंटर येथील शास्त्रज्ञांनी केले आहे.
cancer study
cancer studyकर्करोग
Updated on

मलेरियाचे औषध कर्करोगावरील उपचारात महत्वाची भूमिका निभावू शकते. एका नव्या अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे. मलेरियासाठी 'हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन' नावाचे औषध वापरले जाते. हे औषध डोके आणि घशाच्या कर्करोगावरील केमोथेरेपीमध्ये वापरल्या जाणाऱ्या सिस्प्लेटिन या औषधात अडथळे निर्माण करणारे घटक बंद करते. तसेच हे प्राण्यांच्या मॉडेल्समधील सिस्प्लेटिनचे ट्यूमरमुळे मृत्यू होण्याचे प्रभाव रोखण्याचे काम करते.

cancer study
गोऱ्या लोकांना कर्करोग होण्याचा धोका जास्त, अभ्यासात स्पष्ट

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे मलेरीयाविरोधी औषध असून ते लाइसोसोमल चे कार्य रोखण्याचे काम करते. हे संशोधन पिट्सबर्ग विद्यापीठ आणि पिट्सबर्ग मेडिकल सेंटर (UPMC) येथील शास्त्रज्ञांनी केले आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. यासाठी संशोधकांनी कोंबड्यांची अंडी आणि उंदरांवर अभ्यास करून औषधांचे निष्कर्ष काढले आहेत.

cancer study
लय भारी! इवलुशी मुंगी शोधणार कॅन्सरच्या पेशी

केमोथेरपी ठरली अयशस्वी - UPMC हिलमन कॅन्सर सेंटरचे डोके -घसा तज्ज्ञ आणि संशोधनाचे सह-वरिष्ठ लेखक उममहेश्वर दुवूरी यांनी सांगितले की, डोके आणि घशाचा कर्करोग असलेल्या रुग्णांची काळजी घेत असताना केमोथेरपी अयशस्वी झाल्याचे अनेकदा पाहतो.सिस्प्लॅटिन हे केमोथेरपीसाठी अत्यंत महत्वाचे औषध आहे. पण, सिस्प्लॅटिनला ट्यूमरचा प्रतिकार करणे ही एक मोठी समस्या आहे. माझ्या प्रयोगशाळेला रोगप्रतिकारक शक्तीची यंत्रणा समजून घेण्यास स्वारस्य आहे. त्यामुळे आम्ही या रूग्णांवर उपचार करण्याचे चांगले मार्ग शोधू, असे दुवूरी यांनी सांगितले.

cancer study
शाकाहार कराल तर कॅन्सरपासून वाचाल! अभ्यास सांगतो...

TMEM16A प्रथिने जगण्याचा दर कमी करते- मागील एका संशोधनात असे दिसून आले आहे की, TMEM16A नावाचे प्रथिन रुग्णाच्या ट्यूमरमधील सिस्प्लेटिनच्या प्रतिकाराशी संबंधित आहे. हे प्रथिन 30 टक्के डोके आणि घशाच्या कर्करोगात आढळते. जगण्याची शक्यता कमी होण्याशी याचा संबंध आहे.

अशी आहेत लक्षणे- तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला दिर्घकाळ खोकला आहे. त्यावर उपाय करूनही खोकला कमी होत नाहिये असे झाले आहे का? असे होत असेल तर तुम्हाला सावध राहणे गरजेचे आहे. कारण ते घशाच्या कर्करोगाच्या सुरवातीच्या लक्षणांपैकी एक आहे.

cancer study
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी व्यक्ती काय विचार करते? वैज्ञानिकांचा दावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.