गणित चरबी आणि स्नायूंचे

चरबी आणि स्नायू वेगळे कसे?
चरबी
चरबी salal
Updated on

विकास सिंह, संस्थापक, ‘फिटपेज’ ॲप

फिटनेसमध्ये स्वारस्य असलेल्या लोकांना हा सर्वांत मोठा प्रश्न असतो. जर आपण आपल्या चरबीचे स्नायूंमध्ये रूपांतर करू शकलो तर ते किती चांगले होईल! कल्पना करा, की तुम्ही जिममध्ये जाऊन ट्रेनरला विचारले, ‘हाय, मला माझ्या पोटाची चरबी स्नायूंमध्ये बदलून छातीपर्यंत ढकलायची आहे,’ हे ऐकायला देखील योग्य वाटत नाही, बरोबर?

चरबीचे स्नायूंमध्ये रूपांतर करता येते का, या प्रश्नाचे सर्वांत लहान उत्तर ‘नाही’ आहे! ज्याप्रमाणे तुमची किडनी यकृतात बदलता येत नाही, त्याचप्रमाणे तुमची चरबी स्नायूमध्ये बदलता येत नाही. चला ह्या मागच कारण समजून घेऊया.

चरबी आणि स्नायू वेगळे कसे?

आपले शरीर अतिरिक्त कॅलरी ट्रायग्लिसराइड्समध्ये रूपांतरित करते, जे चरबी पेशींमध्ये साठवले जाते. याचा अर्थ अतिरिक्त कॅलरीज आपल्या शरीरात चरबीच्या रूपात जमा होतात. अतिरिक्त चरबी भविष्यात शरीराला लागणाऱ्या ऊर्जेचा राखीव स्रोत म्हणून कार्य करते. आपल्या शरीराला पर्यावरणीय समस्यांपासून वाचवण्यासाठी चरबी अनेक आवश्यक कार्ये देखील करते. स्नायू मात्र वेगळ्या पद्धतीने तयार होतात आणि वेगळ्या पद्धतीने काम करतात. आपल्याला हालचाल करण्यासाठी, श्‍वास घेण्यासाठी, अन्न पचवण्यासाठी आणि एखादे बोट हलवण्यासाठीही स्नायूंची आवश्यकता असते. शरीरावर भार असताना स्नायू तयार होतात ज्यामुळे फायबरमध्ये मायक्रोटेअर्स येतात. मग स्नायू योग्य पोषण आणि रिकव्हरीद्वारे स्वतःची दुरुस्ती करतात आणि त्यांच्या आकारात वाढ होते. स्नायूंचे अन्न चरबीवाटे येत नसून, एटीपीद्वारे मिळते.

वजनदार शरीर आणि चरबी

स्नायू आणि चरबी वेगळ्या केवळ पद्धतीने कार्य करत नाहीत तर ते वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले देखील असतात. दिसणारी चरबी त्वचेखालील चरबी असते जी आपल्या त्वचेच्या अगदी खाली असते. स्नायू त्वचेखालील चरबीच्या खाली असतात. म्हणून, कृपया हे जाणून घ्या की हे दोन्ही वेगवेगळे आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि एकाचे दुसऱ्यामध्ये रूपांतर करता येत नाही. तुम्ही व्यायाम करता, तेव्हा तुमचा असा भ्रम होऊ शकतो की शरीर चरबीचे स्नायूमध्ये रूपांतर करत आहे. कारण, तुमचे शरीर मोठे आणि मस्क्युलर दिसते. तुम्ही व्यायाम करता, चांगले खाता आणि योग्य प्रमाणात विश्रांती घेता तेव्हा स्नायूंची वाढ होते. आणि ही वाढ चरबीच्या खाली असलेल्या स्नायूंची होत असल्याने, तुमचे शरीर अधिक मोठे दिसते. याचा अर्थ असा नाही, की चरबीचे स्नायूमध्ये रूपांतर होते.

चरबीपासून मुक्तीसाठी...

दिसणाऱ्या चरबीपासून मुक्त होण्याचे आणि स्नायू मिळवण्याचे बरेच प्रभावी मार्ग आहेत, मात्र चरबीचे स्नायूंमध्ये रूपांतर करण्याचे कोणतेही मार्ग नाहीत. शरीरातील अतिरिक्त चरबीपासून मुक्त कसे होऊ शकतो, यावर प्रथम आपण चर्चा करूया.

कमी खाणे : आता आपल्याला माहीत आहे, की आपल्या शरीराला विशिष्ट प्रमाणात ऊर्जेची आवश्यकता असते आणि आपण गरजेपेक्षा जास्त खाल्ल्याने आपल्या शरीरात चरबी जमा होऊ लागते. त्यामुळे आपण जे खातो ते कमी खाणे, हा एक मार्ग आहे. पोट, मांडी, कंबर, हात इत्यादी शरीराच्या विविध भागांमध्ये चरबी जमा होत असल्याचे तुम्ही बघितले असेलच. त्यावरून तुम्ही अन्नाचे सेवन योग्य प्रमाणात कमी करण्याचा विचार करू शकता. टीप : तुमच्या शरीराला अन्नातून मिळणाऱ्या पोषक तत्त्वांची गरज असते, त्यामुळे गरजेपेक्षा जास्त कॅलरीज कमी करणे आरोग्यास हानिकारक ठरु शकते. हळूहळू सुरवात करा. प्रक्रिया केलेले आणि तळलेले पदार्थ जसे की बिस्किटे, भजी, केक, सोडा, फास्ट फूड इत्यादी पदार्थ टाळून चांगल्या आहाराची सुरवात करा.

अधिक हालचाल करा : कमी खाणे आणि अधिक हालचाल ह्या दोन्ही गोष्टी एकत्र करणे आवश्यक आहे. तुम्ही कमी खाणे सुरू कराल आणि नियमित व्यायाम सुरू कराल, तसे तुमचे शरीर ऊर्जा स्रोत म्हणून चरबीचा वापर करण्यास सुरवात करेल. हे किती छान आहे! पण थांबा, हे इतक्या सहजासहजी घडत नाही.

तुम्ही व्यायाम करायला सुरवात कराल, तुमचे शरीर प्रथम ग्लुकोजचा ऊर्जा स्रोत म्हणून वापर करेल, कारण ग्लुकोज तुमच्या शरीरात सहज उपलब्ध असते आणि हे ग्लुकोज तुम्ही नुकत्याच खाल्लेल्या अन्नामधून येते. याचा अर्थ असा, की चरबीचा ऊर्जेसाठी वापर व्हायला अजून वेळ लागेल आणि त्यासाठी आपण दीर्घकाळ व्यायाम करणे अपेक्षित आहे. हे साध्य करण्यासाठी दिवसातले किमान ३० मिनिटे चालणे सुरू करा आणि चांगल्या परिणामांसाठी हे नियमितपणे करा, आठवड्यातले किमान ५ ते ६ दिवस.

तुम्हाला स्नायू मजबूत करायचे असल्यास तुम्हाला ताकद किंवा प्रतिकार प्रशिक्षण घ्यावे लागेल. पुश अप्स, पुल अप्स, स्क्वॅट्स इत्यादींचा विचार करा. हे व्यायाम गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध काहीतरी पुश करणे किंवा खेचणे समाविष्ट असते व त्यासाठी शक्ती आवश्यक असल्याने त्यांना ताकदीचे व्यायाम म्हणतात.

उदाहरणार्थ, पायऱ्या उतरण्यापेक्षा चढणे कठीण आहे. या व्यायामामुळे स्नायूंमध्ये मायक्रोटीअर्स निर्माण होतील, जर ते तुम्हाला आव्हान देत असतील आणि ह्या बरोबर तुमचे योग्य पोषण आणि प्रथिने युक्त अन्न तुम्ही घेत असल्यास तुम्ही स्नायू अधिक मजबूत करू शकता. त्यामुळे चरबीचे स्नायूंमध्ये रूपांतर होण्याच्या आशेवर राहण्यापेक्षा दिवसाला ५ सूर्यनमस्कार करणे केव्हाही चांगले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.