पुरूषांनो, 'एनर्जी' वाढवायची असेल तर 'हे' पाच पदार्थ खा!

स्त्रियांप्रमाणेच पुरूषांचे आरोग्यही महत्वाचे आहे.
Foods to Increase Energy For Men's Health
Foods to Increase Energy For Men's Health
Updated on

Foods For Men's Energy : ज्याप्रमाणे स्त्रियांचे आरोग्य महत्वाचे आहे, त्याप्रमाणे पुरूषांचे आरोग्य (Mens Health) देखील महत्वाचे आहे. शरीर (Body) निरोगी ठेवण्यासाठी पुरुषांनी त्यांच्या पौष्टिक गरजा सहज पूर्ण होतील, अशा प्रकारचे अन्न (Food) खाल्ले पाहिजे. त्यांनी फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, लीन मीट आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केले पाहिजे. तसेच आहारात फळे आणि भाज्यांचे प्रमाण अधिक असावे. हे पदार्थ पुरुषांच्या शरीरातील पौष्टिक गरजा नक्कीच पूर्ण करू शकतात. तसेच काही भाज्या व फळे खाल्ल्यामुळे तुमची प्रजनन क्षमता तर सुधारेलच पण एनर्जी वाढविण्यासाठीही हे पदार्थ उपयोगी पडतील. (Foods to Increase Energy For Men's Health)

Foods to Increase Energy For Men's Health
पुरूषांमध्ये ब्रेकअप्स, एकटेपणामुळे वाढतोय कॅन्सरचा धोका, अभ्यासात स्पष्ट

१) ब्रोकोली- पुरुषांना त्यांच्या आहारात हिरव्या पालेभाज्या अधिक प्रमाणात घेण्याचा सल्ला दिला जातो. ब्रोकोलीत जास्त पोषकतत्वे असतात. तसेच ब्रोकोली कर्करोग आणि हृदयविकारांसारख्या आजारांपासून बचाव करू शकते. त्यात व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटीन, पोटॅशियम अशी पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात.तसेच ब्रोकोली ही होमोसिस्टीनची पातळी कमी करण्यास, अमिनो अॅसिड नियंत्रणात ठेवण्यासही मदत करते,

Apple
Apple

२) सफरचंद - सफरचंदांमध्ये भरपूर पोषकतत्वे असतात. निरोगी राहण्यासाठी सफरचंदांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला नेहमीच डॉक्टरांकडून दिला जातो. सफरचंद रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास आणि शरीरातील कमकुवतपणा दूर करण्यास मदत करते. लैगिंग जीवन चांगले होण्यासाठी सफरचंद खाणे चांगले असे मानले जाते.

Foods to Increase Energy For Men's Health
पुरूषांनो, चाळीशीत फिट राहायचंय, अशी घ्या काळजी|Men's Health

३) किवी- गेल्या काही वर्षांत किवी खूपच लोकप्रिय होत आहे. किवीत व्हिटॅमिन सीचे प्रमाण चांगले असते त्यामुळे ती आरोग्यासाठी चांगली आहे. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते आणि इरेक्टाइल डिसफंक्शनवर उपचार करण्यासाठी फायदेशीर आहे. किवी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

Foods to Increase Energy For Men's Health
Male Infertility : पुरुष वंध्यत्व म्हणजे काय? काय आहेत लक्षणे, उपाय
banana
banana esakal

४) केळं- केळी हा ऊर्जेचा उत्तम स्त्रोत आहेत. पुरुषांनी दररोज केळीचे सेवन केले पाहिजे कारण ते ब्रोमेलेन एंझाइमचा एक उत्तम स्रोत आहे. त्यामुळे लैंगिक शक्ती वाढते. पुरुषांमधील नपुंसकतेवर मात करण्यासाठी केळं मदत करते. केळं खाल्ल्याने उर्जा मिळते.

Foods to Increase Energy For Men's Health
रात्रीच्या 5 सवयी बदला, मस्त, फीट राहाल
egg
egg

५) अंड- अंडी ही प्रत्येकासाठी खूप फायदेशीर असतात. अंडी हे सर्वोत्तम सुपरफूडपैकी एक मानले जाते. अंड्यांमध्ये प्रथिने, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन डी आणि ल्युटीन भरपूर प्रमाणात असते. पुरुषांना त्यांच्या रोजच्या आहारात अंड्यांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()