आलेपाक खा, निरोगी राहा! जाणून घ्या १० फायदे

आयुष मंत्रालयाने आलेपाक खाण्यामुळे काय फायदे होतात ते सांगितले आहे.
ginger vadi
ginger vadi
Updated on
Summary

आलेपाक हा पौष्टीक वडी आहे. ती खाल्ल्याने भूक आणि पचन सुधारण्यास मदत होते. तसेच, घसा खवखवणे, सर्दी आणि खोकला कमी करण्यासाठी त्याचा फायदा होतो.

सध्या सर्वांनाच सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसत आहेत. तसेच अनेकजण कोरोनाबाधित (CORONA) होत आहेत, वातावरणातही कमालीचा गारवा आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. यासाठी सरकारच्या आयुष मंत्रालयाने (Ministry Of Ayush) आले पाक (Ginger Barfi) खाण्याचे सुचविले आहे. त्यांनी ट्विटरवर याविषयी माहिती दिली आहे. ते म्हणतात, आलेपाक हा पौष्टीक वडी आहे. ती खाल्ल्याने भूक आणि पचन सुधारण्यास मदत होते. तसेच,घसा खवखवणे, सर्दी आणि खोकला कमी करण्यासाठी त्याचा फायदा होतो. आयुष मंत्रालय अनेकदा आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या पाककृती शेअर करते,

ginger vadi
तिळगुळ आइस्क्रीम खाल्लत का? कुठे मिळेल? जाणून घ्या

आलेपाक वडी अनेक घरांमध्ये केली जाते. तीचे पौष्टीकमूल्य उत्तम आहे. तिखट गोड चविची ही वडी अनेकांची आवडती आहे. पण ही वडी खाऊन तुमचे आरोग्य उत्तम राहते. या वडीत आलं. गुळ, तूप, सुंठ, जिरे, काळी मिरी, नागकेसर, वेलची, दालचिनी, तमालपत्र, लवंग, धने पावडर, वावडिंग घालून करण्याचा सल्ला आयुष मंत्रालयाने दिला आहे. त्यामुळे सर्व घटक पोटात जाऊन वडीची चव तर वाढतेच.शिवाय रोगांपासूनही रक्षण होते.

ginger vadi
विकी कौशलला आवडतो रताळ्याचा परोठा!त्याच्या आईने केलेली गंमत वाचा

आल्याच्या वडीचे फायदे (Benefits of Ginger| Benefits of Aalepak)

१) पचनक्रिया सुरळीत होते. इससे पाचन क्रिया बेहतर होती है.

२) घश्यातली खवखव, खोकला, सर्दी झाल्यास आराम मिळतो.

३) यात जिंजरोल असतो. त्यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो. हे खाल्ल्याने शरीरात अँटिऑक्सिडंट प्रभाव पडतो.

४) त्यामुळे चक्कर येणे, सकाळी थकवा येण्यापासून आराम मिळतो.

५)एका अभ्यानुसार, आल्यात वजन कमी करण्याची क्षमता असते. त्यामुळे वजन कमी करायचे असेल तर नक्की आल्याच्या वड्या खाव्यात.

ginger vadi
हेयर ट्रांसप्लांट करण्याकडे युवावर्गाचा कल अधिक डॉक्टर म्हणतात...

६) सांधेदुखी कमी होते.

७) त्यात मधुमेहविरोधी गुणधर्म आहेत. त्यामुळे आलेपाक खाल्याने शरीरातील साखरेची पातळी कमी होते.

८) आले खाल्ल्याने पोट लवकर साफ होते.

९) आले खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

१०) मेंदूच्या आरोग्याशीही आल्याचा संबंध आहे. मेंदूचे आजार दीर्घकाळ जळजळीमुळे होतात आणि आल्यातील दाहक-विरोधी गुणधर्म मेंदूचे रोगांपासून संरक्षण करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.