Mint Leaves Benefits: उन्हाळ्यासाठी पुदीना फायदेशीर

उन्हाचा Summer तडाखा वाढतोय. अशात प्रत्येकाने वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. उन्हाळ्यात तब्येतीची काळजी घेत असताना आहारात काही थंड पदार्थांचा समावेश करणं फायदेशीर ठरू शकतं
Mint Leaves Benifits
Mint Leaves BenifitsEsakal
Updated on

Mint Leaves Benifits: उन्हाचा तडाखा वाढतोय. अशात प्रत्येकाने वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. उन्हाळ्यात तब्येतीची काळजी घेत असताना आहारात काही थंड पदार्थांचा समावेश करणं फायदेशीर ठरू शकतं. उन्हाळ्याच उष्माघाताचा त्रास होवू नये वेगवेळ्या फळांचे ज्युस पिणं किंवा लिंबू सरबत पिणं फायदेशीर ठरतं.

उन्हाळ्यात पुदीनाचं सेवन करणंही फायदेशीर ठरतं. पुदीना हे पोटासाठी थंड असल्याने ते अधिक फायदेशीर ठरतं. पुदीनाचा आहारात समावेश केल्याने पोटाला थंडावा तर मिळतोच शिवाय जेवणाची Meal चवही वाढते.

पुदीना ही एक प्रकारची नैसर्गिक औषधी वनस्पती Medicinal Plant आहे. पित्त  यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी पुदीनाचं सेवन लाभदायक ठरतं. Mint leaves benifits in summer Tips in Marathi

१. पचनशक्ती सुधारते- पुदीनामध्ये फायटोन्यूट्रिएन्ट्स आणि अँटीऑक्सिडंट उपलब्ध असतात. यामुळे जेवण पचण्यास मदत होते. पुदीनामध्ये मेन्थॉल मुबलक प्रमाणात असतं. अनेकदा अपचनामुळे पोटात गॅसची समस्या निर्माण होते.

पुदीनामध्ये असलेल्या मेन्थॉलमुळे ही समस्या दूर होते. उन्हाळ्यात मळमळल्या सारखे वाटत असल्यास पुदीनाच्या पानांचा रस प्यावा. किंवा तुम्ही पुदीनाची काही पानं चावून खावू शकता. यामुळे देखील मळमळ थांबण्यास मदत होईल. 

२. त्वचा उजळण्यास मदत- उन्हाळ्याच्या दिवसात डिहाइड्रेशनमुळे तसचं घामुळे त्वचेशी संबधीत अनेक समस्या निर्माण होतात. उन्हामुळे त्वचा काळवंडते. या दिवसांमध्ये पुदीनाचं सेवन केल्याने त्वचेसंबंधीत समस्या दूर होण्यास मदत होईल.

पुदीनापासून तयार करण्यात आलेला फेस पॅक लावल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत. तसचं पुदीनाचं सेवन केल्यानं त्वचा तरुण दिसण्यास मदत होते. त्वचा चमकदार आणि फ्रेश दिसू लागते.

हे देखिल वाचा-

Mint Leaves Benifits
Summer Car Care : उन्हाळ्यात ड्रायव्हिंग करताना या कारणांनी होतात सर्वाधिक दुर्घटना, अशी घ्या काळजी

३. उष्माघातापासून आराम-  उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उष्माघाताचा त्रास कमी करण्यासाठी पुदीना उपयुक्त ठरतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घराबाहेर पडताना पुदीनाचा रस किंवा पुदीनापासून तयार करण्यात आलेलं सरबत पिणं आरामदायी ठरू शकतं. उन्हाळ्यात पोटदुखीचा त्रास होत असल्यास पुदीना जीरं, काळीमीरी आणि हिंग एकत्रित करून त्याचं सेवन करावं यामुळे पोटेदुखी कमी होईल.

४. तोंडाची दुर्गंधी दूर - ज्यांच्या तोंडातून अधिक दुर्गंधी येते त्यांनी पुदीनाची काही पानं चावून खावी.  यामुळे दुर्गंधी दूर होवून श्वासात ताजेपणा जाणवतो. तसंच पुदीन्याची काही पानं पाण्यात उकळवून.

हे पाणी गार झाल्यानंतर गुळण्या केल्यासही तोंडाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते. याचसोबत उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकदा तोंडात लाल फोड येतात. यासाठी पुदीनाचा काढा बनवून त्याने गुळण्या केल्यास फरक पडेल. mint for oral health

५. डोकेदुखीवर उपायकारक- उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डिहाइड्रेशनमुळे तसचं उन्हात जास्त वेळ फिरल्याने डोकेदुखीचा त्रास होतो. यासाठी पुदीनाच्या पानांचा लेप कपाळावर लावल्यास आराम मिळू शकतो. तसचं पुदीनाचं सरबत प्यायल्यास ही आराम मिळतो. mint for summer 

६. ताप कमी करण्यास फायदेशीर- उन्हाळ्याच्या दिवसात पुरेशी काळजी न घेतल्यास ताप येण्याची शक्यता असते. अशावेळी पुदीन्याचा काढा किंवा पुदीनाचा चहा ताप कमी करण्यासाठी मदत करू शकतो. 

७. लघवीला जळजळ होत असल्यास पुदीना फायदेशीर- उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्याचं प्रमाण कमी झाल्यास किंवा उन्हाच्या झळांमुळे अनेकदा लघवीला त्रास होतो. लघवी करताना जर जळजळ किंवा वेदना होत असतील तर त्या कमी करण्यासाठी पुदीन्याचं सेवन फायदेशीर ठरू शकतं.

यासाठी पुदीनाच्या चहाचं सेवन  करावं. एक चमचा काळीमिरी मुठभर पुदिन्याच्या पानांसोबत बारिक करा. त्यानंतर ते गाळून साखर घालून त्याचं सेवन केल्यास त्रास कमी होईल. 

हे देखिल वाचा-

Mint Leaves Benifits
Summer Skin Care Tips : उन्हामुळं चेहऱ्याचं तेज गेलंय? या सवयी देतील निखळ सौंदर्य

८. तणावमुक्तीसाठी उपयुक्त- तणाव कमी करण्यासाठी पुदीनाचा चहा उपयुक्त ठरतो.  पुदीन्यामध्ये असलेल्या मेन्थॉलमुळे मासपेशींना आराम मिळतो. त्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. Mint tea helps stress relief

त्याचसोबत सांधेदुखी, मासिक पाळीतील वेदना आणि वजन कमी करण्यासाठी देखील पुदीना फायदेशीर आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही लिंबू सरबतामध्ये पुदीन्याची काही पान कुस्करून टाकू शकता.

यामुळे सरबताची चवही वाढते शिवाय ते शरीरासाठी थंड देखील असते. त्याचसोबत पुदीनाचा चहा किंवा चटणीदेखील तुम्हा आहारात समाविष्ट करू शकता. तसचं पुलाव, बिरयाणी आणि मसालेभातामध्ये पुदीनाची पानं टाकू शकता. यामुळे जेवणाची चव वाढून आरोग्यासही फायदा मिळेल. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()