प्रोटीनचे मुबलक प्रमाण असलेले 8 ड्राय फ्रूट; जाणून घ्या किती मिळते कॅलरी

dry_fruits
dry_fruits
Updated on

Most Protein Dried Fruits: ड्राय फ्रुटचं नाव घेताच अनेकांच्या नजरेसमोर काजू, बदाम, किशमिश असे पदार्थ येतात. आपण हे पदार्थ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी खातो, पण हे पदार्थ आपल्या शरीराला आवश्यk विटॅमिन आणि मिनरल पूरवत असतात. त्यामुळे आपल्या मांसपेशी आणि हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. सकाळी उठल्यानंतर किंवा जीम केल्यानंतर आपण ड्राय फ्रुटचे सेवन करु शकतो. 

बाजारात अनेक प्रकारचे ड्राय फ्रूट आहेत, ज्यात वेगवेगळ्या प्रकारचे पौष्टिक गुण आढळून येतात. आम्ही तुम्हाला या लेखात 8 प्रकारच्या ड्राय फ्रूटची माहिती देणार आहोत, ज्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळतात. सोबतच तुम्हाला किती प्रमाणात कॅलरी मिळेल हेही आम्ही सांगू...

गोल आकाराचा छोटासा ड्राय फ्रूट तुमच्या शरीरासाठी कोणत्याही खजिन्यापेक्षा कमी नाही. अकरोड पुरुष आणि महिला दोघांसाठी फायद्याचे आहे. 100 ग्रॅम अकरोडमधून 654 कॅलरी मिळतात, यात प्रोटीन 15.23 ग्रॅम असते. 

बदाम

तल्लख बुद्धीसाठी आवश्यक आणि बॉडी बिल्डिंग करणाऱ्यांची पहिली पसंद बदाम असते. 100 ग्रॅम बदामात 576 कॅलरी असतात आणि 21.15 ग्रॅम प्रोटिन मिळतात. बदामला भिजवून खाल्ल्याने याचे पौष्टिक तत्व दुपटीने वाढतात. 

शेंगदाणे

शेंगदाणे शरीरासाठी खूप फायद्याचे असतात. 100 ग्रॅम शेंगदाण्यामधून 567 कॅलरी मिळतात आणि 25.8 ग्रॅम प्रोटीन मिळते. 

पिस्ता

हिरव्या रंगाचा हा ड्राय फ्रूट तुम्हाला अनेक पोषक तत्वे देऊ शकतो. 100 ग्रॅम पिस्तामध्ये 562 कॅलरी आणि 20.16 ग्रॅम प्रोटीन असतात. 

अनेक डिशमध्ये वापरले जाणारे काजू शरीरारासाठी खूप फायद्याचे आहे. 100 ग्रॅम काजूमध्ये 553 कॅलरी आणि 22.55 ग्रॅम प्रोटीन असतात.  

सूर्यफूलाचे बी

हाय बीपी आणि वेट लॉसच्या समस्या असणाऱ्यांनी सूर्यफूलाचे बी खायला हवेत. 100 ग्रॅम सूर्यफूलाच्या बीजामध्ये 584 कॅलरी असतात. याशिवाय यात 20.78 ग्रॅम प्रोटीन असतात. 

जवस

100 ग्रॅम जवसाच्या बीयांमध्ये 534 कॅलरी आणि 18 ग्रॅम प्रोटीन असते. जवस हृदयाच्या आरोग्यासाठी फायद्याचे आहेत. 

आलूबुखारा

आलूबुखाराला तुम्ही ड्राय फ्रूट मानत नसला तरी यात 240 कॅलरी आणि 2.18 प्रोटिन असते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.