नागपूर : तुम्हाला झोपेत घोरण्याची सवय असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण, हे घोरणे हार्टअटॅक, ब्लडप्रेशर आणि डायबेटीस यासारख्या आजाराला निमंत्रण देऊ शकते. हा दावा काही आमचा नाही तर डॉक्टरांचे म्हणणे आहे. पुरेशा झोपेअभावी माणसाला अनेक व्याधी जडतात. तेव्हा पुरेशी झोप महत्त्वाची आहे. तुम्हाला जर झोपेत घोरण्याची सवय असेल तर वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेणे गरजेचे आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे घोरण्याचे प्रमाण वाढत आहे.
झोपेत घोरणारी व्यक्ती बघितली की, किती शांत झोपलाय अशी सहज प्रतिक्रिया येते. मात्र, ही शांत झोप नसून ती काळ झोप असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. हे घोरणं आरोग्याला घातक आहे. झोपेत घोरत असताना घोरणाऱ्या व्यक्तीचे कंठ बंद होऊन शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे घोरणाऱ्या व्यक्तीला डायबेटीस, ब्लड प्रेशर आणि हार्टअटॅकसारखे आजार होऊ शकतात.
प्रत्येक मणुष्य आपल्या आयुष्याचा एक तृतीअंश भाग झोपेत घालवतो. अशातच बदललेल्या जीवन शैलीमुळे चार दशकांत निद्रा नाशाचे प्रमाण वाढले आहे. पुरेशा झोपेअभावी अनेकांना शारीरिक व्याधी होत आहे.
रात्री उशिरापर्यंत अभ्यास करून सकाळी लवकर शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची पुरेशी झोप होत नाही. त्याचेही दुष्परीणाम आता समोर आले आहेत. निद्रा नाश, अपुरी झोप हे अनेक रोगांना आमंत्रण देत आहे. त्यावर वेळीच उपाय करण्याची आवश्यकता आहे.
लक्षणे
हा विकार होण्यास प्रामुख्याने ही आहेत कारणे
तुम्हाला घोरण्याची समस्या असेल तर अननस, केळी आणि संत्रे खा. चांगली झोप शरीरात मेलाटोनिनचे प्रमाण वाढवते. मेलाटोनिन खरं तर एक संप्रेरक आहे. ज्यामुळे आपल्याला झोप येते. अशा परिस्थितीत आपण जास्त प्रमाणात मेलाटोनिन असलेले पदार्थ खावे. ते अननस, केळी आणि संत्रामध्ये भरपूर प्रमाणात असते. त्यांचा वापर करून घोरणे रोखता येऊ शकते.
घोरणे सहसा गंभीर नसते. ते आपण जीवनशैलीमध्ये थोडा बदल करून दूर करू शकतो. वजन कमी होणे घोरण्याच्या अनेक कारणांपैकी एक आहे. जर आपण आपल्या आयुष्यात निरोगी अन्नासह नियमित वर्कआउटचा समावेश केला तर ते वजन कमी करेल आणि स्नॉरिंग टाळण्यास मदत करेल.
अद्रक हे दाहक आणि बॅक्टेरीयाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ म्हणून कार्य करते. याचे सेवन केल्यास घोरण्यापासून आराम मिळते. हे एक सामान्य घरगुती उपाय आहे. जे अपचन आणि खोकला यासारख्या अनेक आरोग्यविषयक समस्यांवर उपचार करू शकते. जर आपल्याला घोरण्याची सवय असेल तर दिवसातून दोनदा अद्रक आणि मधाचा चहा घ्या. याने चांगले परिणाम दिसून येतील.
(टीप - वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.