कोरोना बरा करणारा नेझल स्प्रे लाँच ! कसा करेल काम जाणून घ्या

कॅनेडियन कंपनी सॅनोटीझच्या भागीदारीत हा स्प्रे लाँच करण्यात आला आहे
Glenmark launches Nasal Spary
Glenmark launches Nasal Spary
Updated on

मुंबईस्थित ग्लोबल फार्मा कंपनी ग्लेनमार्कने कोविड-19 मुळे ग्रस्त प्रौढ रूग्णांवर उपचार करण्यासाठी भारतातील (India) पहिला नायट्रिक ऑक्साइड नेझल स्प्रे (NONS) FabiSpray लाँच केला आहे. यामुळे कोरोना (Corona) विरोधाच्या लढाईस अधिक बळ मिळण्यास मदत होणार आहे. कॅनेडियन कंपनी सॅनोटीझच्या भागीदारीत हा स्प्रे लाँच करण्यात आला आहे. संसर्ग झाल्यावर ज्या प्रौढांचा गंभीर लक्षणांमुळे आजार जास्त बळावतो अशांसाठी हा स्प्रे आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडून या स्प्रे ला मान्यता मिळाली आहे.

Fabispray या नावाचा स्प्रे नाकाच्या आतील कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी तयार केला गेला आहे, स्प्रे मारल्यास कोरोना फुफ्फुसापर्यंत पोहोचू शकत नाही. ग्लेनमार्कला देशाच्या औषध नियामक, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडून उत्पादन आणि विपणनासाठीही मान्यता प्राप्त झाली आहे.

Glenmark launches Nasal Spary
हरणांना ओमिक्रॉनची लागण!अमेरिकेतील प्राण्यापर्यंत पोहोचला कोरोना

नाकातच व्हायरस मरणार

हा नेझल स्प्रे नायट्रिक ऑक्साईडवर आधारित आहे. तो नाकाच्या वरच्या पृष्ठभागावरील कोरोना विषाणू प्रभावीपणे नष्ट करण्यासाठी कार्य करतो. नाकात जेव्हा स्प्रे मारला जातो तेव्हा, नायट्रिक ऑक्साईड कोरोना विषाणूला फुफ्फुसात पोहोचण्यापासून रोखतो, असा कंपनीचा विश्वास आहे. कोविड १९ साठी प्रभावी आणि सुरक्षित उपचार म्हणून नेझल स्प्रे चे वर्णन करताना, ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे ​​मुख्य व्यावसायिक अधिकारी रॉबर्ट क्रॉकार्ट म्हणाले, 'हा स्प्रे रुग्णांना अत्यंत आवश्यक आणि वेळेवर वैद्यकीय सेवा प्रदान करेल, असा आम्हाला विश्वास आहे.

Glenmark launches Nasal Spary
Blood Sugar Level वयानुसार किती असावी? जाणून घ्या

कोरोनाविरुद्धचा लढ्यात प्रभावी

या स्प्रेच्या चाचणीदरम्यान स्प्रेचे सूक्ष्मजीव गुणधर्म ओळखले गेले. त्यामुळे जेव्हा हा स्प्रे नाकात मारला जातो, तेव्हा तो शरीरातील विषाणू वाढण्यापासून रोखला जातो. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे ​​सीईओ रॉबर्ट क्रॉकरट म्हणाले की, कोरोना विरुद्धच्या लढाईत कंपनी म्हणून आम्ही भारतासोबत आहोत. SaNOtize सॅनोटीझसह हा पर्याय लॉन्च करताना आम्हाला खूप आनंद होत आहे

Glenmark launches Nasal Spary
कॉफी उत्पादनाला हवामान बदलामुळे बसणार मोठा फटका, संशोधकांचा दावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()