प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते नसीरूद्दीन शाह सध्या आजारी आहेत. त्यांना ओनोमॅटोमॅनिया' या आजाराने ग्रासले आहे. चलचित्र टॉक्स या यु ट्यूब चॅनलला दिलेल्या विशेष मुलाखतातीत त्यांनी या आजाराविषयी (Health Problem) सांगितले. त्यामुळे हा आजार काय असतो याविषयी चर्चा सुरू झाली आहे.
नासिर काय म्हणाले...
नासिर मुलाखतीत म्हणाले की, मला ओनोमॅटोमॅनिया या आजाराने ग्रासले आहे. ही एक वैद्यकीय स्थिती असते. तुम्ही डिक्शनरीमध्ये तपासून पाहू शकता. या आजारातील लक्षणांची माहिती नासिर यांनी दिली आहे. ओनोमॅटोमॅनिया आजाराने ग्रस्त झालेली व्यक्ती कोणतेही कारण नसताना एखादा शब्द, वाक्प्रचार, एखादे वाक्य किंवा भाषण, श्लोक पुन्हा पुन्हा सांगत राहते. तुम्हाला असे ऐकायला आवडते. तुम्ही कधी आरामात बसू शकत नाही. शांतपणे विश्रांतीही घेऊ शकत नाही. जेव्हा मी झोपलेलो असताना अचानक उठतो आणि माझ्या आवडत्या कोपऱ्यात जाऊन बसतो. कोणी मला तिथून उठवलं तरी हीच कृती मी पुन्हा पुन्हा करतो. रात्री किती वाजले आहेत, याचे भानही मला राहत नाही, असं त्यांनी मुलाखतीत सांगितलं.
Onomatomania म्हणजे काय?
ओनोमॅटोमॅनिया हे काही शब्द आणि त्यांचे कथित महत्त्व मनात पक्के करते. असे लोक विशिष्ट शब्द वारंवार वापरतात. क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डॉ पारुल अदलाखा यांच्या मते, ओनोमॅटोमॅनिया ही एक अशी अवस्था आहे की ज्यात व्यक्ती विशिष्ट शब्द, वाक्य, ओळ आणि इतर गोष्टींमध्ये रममाण झालेली असते. त्यामुळे त्यांच्या संभाषणात तेच शब्द वारंवार वापरले जातात.
ही मानसिक स्थिती आहे का?
फोर्टिस हेल्थकेअरचे मानसिक आरोग्य आणि वर्तणूक विज्ञान संचालक डॉ समीर पारीख यांच्या मते, ओनोमॅटोमॅनिया ही एक स्थिती नाही, तर ती एक विस्कळीत संज्ञा आहे. त्यामुळे त्याला आजार किंवा स्थिती म्हणू नका. काही लोकांना त्यांच्या एकूण कार्यक्षमतेवर परिणाम झाला तरच त्रास होऊ शकतो. जर एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होत असेल तर हा आजार असावा असे आम्ही वैद्यकीय भाषेत म्हणतो, असेही ते म्हणाले.
संगीत आवडणाऱ्या लोकांच्या मनात त्यांना आवडत असलेल्या या गोष्टींबद्दल गोष्टींबद्दल सतत विचार येऊ शकतात. याव्यतिरिक्त, जर तुम्ही सक्षम नसाल तर एखादे गाणे आठवण्यासाठी तुम्ही त्याबद्दल वारंवार विचार करता. किंवा काही शब्द पुन्हा पुन्हा आठवता. असं काही वेळा होऊ शकतं. त्यामुळे, या स्थितीला क्लिनिकल स्थिती किंवा मानसिक विकृती म्हणणे अजिबात योग्य होणार नाही, असे पारीख यांनी सांगितले. ते म्हणतात की, ऑनोमॅटोमॅनिया एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करू शकतो का नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही. पण, हे मात्र खरे की, भिन्न व्यक्तिमत्त्व असलेल्या वेगवेगळ्या लोकांच्या विचार प्रक्रिया तशाच भिन्न असू शकतात. जर एखाद्याचा कल साहित्याकडे असेल तर त्यांना अचूक शब्द वापरण्याची आवश्यकता असते. कारण ते त्यांच्या जीवनाचा भाग असतो. त्यामुळे, जर ते चिंतेचे कारण असेल तर ते असे का आहे हे शोधून काढणे गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.