व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास १४ पट वाढतो कोरोनाचा धोका, अभ्यासात स्पष्ट

संशोधनाचा अहवाल PLOS One या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे
Vitamin D Effect
Vitamin D Effect
Updated on

कोरोनाबाधित व्यक्तीच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास त्याचा धोका अधिक वाढतो. यामुळे त्याचा मृत्यूहूी (Death) होऊ शकतो. इस्रायलमधील बार-अलन विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून (Study) हे समोर आले आहे. संशोधनाचा अहवाल PLOS One या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. शरीरात व्हिटॅमिन डीचा (Vitamin D) स्तर योग्य प्रमाणात राखण्याची गरज असल्याचे यावेळी दिसल्याचे या संशोधनाचे नेतृत्व करणारे युनिव्हर्सिटी ऑफ गॅलीली मेडिकल सेंटर आणि इस्रायल फॅकल्टी ऑफ मेडिसिनचे एमिल डॉर यांनी सांगितले.

Vitamin D Effect
भविष्यात कृत्रिम गर्भात विकसित होणार भ्रूण, चिनी शास्त्रज्ञांचा दावा

अभ्यासादरम्यान, गॅलीली मेडिकल सेंटरमध्ये एप्रिल 2020 ते फेब्रुवारी 2021 या दरम्यान उपचारासाठी दाखल झालेल्या 1,176 रुग्णांच्या नोंदींचे विश्लेषण करण्यात आले. या सर्व रुग्णांचा आरटीपीसीआर अहवाल पॉझिटिव्ह आला होता. संसर्ग होण्याच्या दोन आठवड्यांपूर्वी आणि दोन आठवड्यांनंतर रूग्णांच्या शरीरात (Body) असलेल्या व्हिटॅमिन डीच्या पातळीचा अभ्यास यादरम्यान करण्यात आला. तसेच त्यांचे वय, लिंग, ऋतू, जुने काही आजार अशा घटकांचाही विचार करण्यात आला. कोरोना संसर्गापूर्वी शरीरात व्हिटॅमिन डीची पातळी कशी होती, हे तथ्य संसर्गाच्या तीव्रतेवर परिणाम करते, असे संशोधनात म्हटले आहे.

Vitamin D Effect
धुम्रपान तुम्ही करताय! परिणाम नातवंड भोगतील, रिसर्चमधून नवी माहिती उघड
corona
coronasakal

मृत्यूचा संबंध

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा कोरोना संक्रमण झालेल्या व्यक्तीच्या मृत्यूशीही संबंध आहे. व्हिटॅमिन डी हाडांच्या आरोग्याशी संबंधित आहे. तसेच त्याच्या कमी पातळीमुळे स्वयंप्रतिकार, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आणि संसर्गजन्य रोग होऊ शकतात. विशेष म्हणजे, कोरोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात, डॉक्टरांनी लोकांना व्हिटॅमिन डी घेण्यास सांगितले होते. व्हिटॅमिन डी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते.

Vitamin D Effect
मेडिकल मास्क वाढवतो चेहऱ्याचे आकर्षण, अभ्यासात स्पष्ट
D-Vitamin
D-VitaminD-Vitamin

14 पट शक्यता वाढते

अहवालानुसार, ज्या लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता दिसली, त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता 14 पटीने वाढते असे म्हटले आहे. तसेच ज्या लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन डीचे प्रमाण पुरेसे होते, अशा लोकांचा मृत्यू दर 2.3 टक्के होता. तर ज्यांच्यात व्हिटॅमिन डीचे प्रमाण कमी होते, त्यांचा मृत्यू दर २५.६ टक्के होता, असे दिसून आले. याबाबात प्रोफेसर मायकेल एडलस्टीन म्हणाले की, काही लोकांना कोरोनाचा गंभीर परिणाम का होतो आणि काहींना का होत नाही हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. यासाठी अजूनही प्रयत्न सुरू आहेत.

Vitamin D Effect
वेगाने चालणाऱ्या महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका 34 टक्क्यांनी कमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.