अभ्यासात असे म्हटले आहे की कोविड-19 दरम्यान मेडिकल मास्क एखाद्याचे आकर्षण वाढवतात.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून मास्क हा आपल्या आयुष्याचा अत्यंत महत्वाचा भाग झाला आहे. सर्जिकल ते कॉउचर फेस मास्कपर्यंत (Mask) आपण मास्कचे विविध प्रकार बघतो आहे. ते आपण वापरलेही आहेत. मात्र, एका नवीन अभ्यासानुसार(New Study), फेस्क मास्कमुळे आपल्याला काय (आणि कोणाला) आकर्षक वाटते ते बदलले आहे.
२०२२ च्या सुरूवातीला कॉग्निटिव्ह रिसर्च जर्नलमध्ये हा अभ्यास प्रसिद्ध झाला.या अभ्यासाचे शिर्षक 'व्यक्ती सौदर्यांच्या पलीकडे, वैद्यकीय मास्क हे चेहऱा झाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इतर गोष्टींपेक्षा चेहऱ्याचे आकर्षण अधिक वाढवतात'.असे होते. त्यानुसार असे सूचित केले गेले की, असे सूचित करते की कोविड -19 (Covid 19) दरम्यान मेडिकल मास्क हे एखाद्याविषयी आकर्षण जास्त वाढवतात. अभ्यासानुसार, मेडिकल मास्कने झाकलेले चेहरे सर्वात आकर्षक मानले जात होते आणि कपड्याद्वारे चेहरा झाकल्यावरही ते जास्त आकर्षक होते.
असे केले संशोधन (Study)
संशोधनात 43 महिलांना पुरुषांच्या चेहऱ्यांच्या प्रतिमांचे आकर्षण १ ते १० क्रमांकानुसार देण्यास सांगितले होते. चित्रे तीन प्रकारची होती: एक सर्जिकल मास्क घातलेल्या व्यक्तीसह, मास्क न घातलेले आणि चेहर्याच्या खालच्या अर्ध्या भागासमोर एक साधे काळे पुस्तक धरून, चेहरा मुखवटा झाकलेला भाग दाखवणारी ती चित्र होती. अभ्यासात असे आढळून आले की, त्या महिलांनी कपड्याचे किंवा सर्जिकल मास्क घातलेल्यांना मास्क नसलेल्या किंवा ज्यांचे चेहरे अर्धवट पुस्तकाने झाकलेले होते त्यांच्यापेक्षा जास्त चांगले गुण दिले. डिस्पोजेबल सर्जिकल मास्क फॅशनेबल मास्कच्या तुलनेत सर्वात आकर्षक मानले जातात, असे संशोधनात स्पष्ट झाले.
संशोधन काय सांगते? Study Result)
हे संशोधन युकेमधील कार्डिफ युनिव्हर्सिटीने केले होते. संशोधनात असे म्हटले आहे की, कोविड-19 पूर्वीही जपानमध्ये मास्क घालण्याची प्रथा होती. मास्क स्त्रियांमधले आकर्षण वाढवतो कारण चेहऱ्यावरील मुरूमं त्यात दिसत नाहीत. अभ्यासात असे म्हटले आहे की, सॅनिटरी मास्क प्रभावाच्या विरुद्ध आहे पण, मेडिकल फेस मास्क हे रोगाची प्रतिमा दर्शवतात. त्यामुळे परिधान करणार्याच्या चेहऱ्याच्या आकर्षकतेचे रेटिंग कमी होते.
पण कोविड १९ मुळे आता परिस्थिती बदलली आहे. उलट मेडिकल मास्क घातलेले चेहरे हे मास्क न घातलेल्या चेहऱ्यांपेक्षा अधिक आकर्षक म्हणून गणले जातील, ते खालच्या चेहऱ्याच्या माहितीच्या आधारे म्हणजे चेहऱ्याच्या पेरीओरल एरियावरून ठरवले जातील. अभ्यासात पुढे असेही म्हटले आहे की, अनाकर्षक आणि सरासरी आकर्षक चेहऱ्यांना मास्क न घालणाऱ्यांच्या तुलनेत लक्षणिय पद्धतीने अधिक आकर्षक म्हणून गणले गेले आहे. हा बदल लोकांमध्ये नाट्यमय मनोवैज्ञानिक बदल असल्याचे दर्शवतो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.