कोरोना व्हायरसच्या 'ओमिक्रॉन' (Omocron) या नव्या व्हेरीयंट (varient) जगासमोरची चिंता वाढलीय. भारतातही (India) या नवीन व्हेरीयंटचे रूग्ण सापडत आहेत. ओमिक्रॉनबद्दल समजून घेण्यासाठी संशोधक प्रयत्नशील आहेत. ओमिक्रॉन संसर्गाबाबत एका नवीन संशोधनात हे समोर आले आहे की, हा संसर्ग अगदी सामान्य सर्दीसारखा असतो. त्यामुळे हा संसर्ग ओळखणे अधिक कठीण आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, विषाणूने (virus) सामान्य सर्दी विषाणूपासून अनुवांशिक सामग्री घेतली असावी आणि स्वतःचे किमान एक उत्परिवर्तन केले असावे. याआधीही, अनेक संशोधनांमध्ये असे म्हटले आहे की, ओमिक्रॉन संसर्गाची लक्षणे इतर प्रकारांपेक्षा वेगळ्या प्रकारची दिसतात. त्याची लक्षणे (symptoms) फारशी गंभीर नसतात, त्यामुळे संक्रमित लोकांचा शोध घेण्यास आणखी विलंब होऊ शकतो.
केंब्रिज विद्यापीठातील वेंकी सुंदरराजन यांच्या नेतृत्वाखाली संशोधन करण्यात आले आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, संशोधनात असे दिसून आले आहे की हे उत्परिवर्तन एखाद्या पेशीमध्ये झाले असावे, जे SARS-Cov-2 आणि कोल्ड व्हायरस दोन्ही होस्ट करू शकते.
रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, संशोधनात मिळालेल्या माहितीचा अर्थ असा होऊ शकतो की, ओमिक्रॉन विषाणू अधिक वेगाने पसरतो, परंतु त्याची लक्षणे एकतर दिसत नाहीत किंवा खूप सौम्य आहेत. अशा परिस्थितीत, प्रश्न उपस्थित केले जात आहेत की ओमिक्रॉन कोरोनाव्हायरसच्या इतर प्रकारांपेक्षा जास्त धोकादायक आहे का? आणि त्यामुळे गंभीर आजार होऊ शकतो का? जगभर हाहाकार माजवणाऱ्या डेल्टाला तो मागे टाकू शकेल का, असाही प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांवर शास्त्रज्ञांचे संशोधन सुरू आहे.
ओमिक्रॉनची नवीन लक्षणे सूचित करतात की हा विषाणूच्या पुनर्संयोजनाचा परिणाम असू शकतो. या प्रक्रियेत दोन भिन्न विषाणू एकाच सेलमध्ये भेटतात आणि त्यांच्यासारखे आणखी विषाणू तयार करतात. या नवीन विषाणूमध्ये दोन्ही मूळ विषाणूंचे अनुवांशिक गुणधर्म असतात.
केंब्रिज संशोधनातून असे समोर आले आहे की, ओमिक्रॉनचा जन्म अशा व्यक्तीमध्ये झाला असावा, जो दोन्ही विषाणूंनी संक्रमित होता.अशा परिस्थितीत, कोविडच्या विषाणूने इतर विषाणूंकडून अनुवांशिक गुणधर्म प्राप्त केले असतील आणि म्हणूनच ओमिक्रॉनचा अनुवांशिक क्रम कोरोनाव्हायरसच्या इतर प्रकारांशी जुळत नाही. या कारणास्तव त्याची लक्षणे देखील इतर कोविड प्रकारांपेक्षा वेगळी असल्याचे सांगितले जात आहे.
सुंदरराजन म्हणाले की, हा अनुवांशिक क्रम काहीवेळा एका प्रकारच्या कोरोना व्हायरसमध्ये दिसून येतो, ज्यामुळे लोकांमध्ये सामान्य सर्दी होते. हा अनुवांशिक क्रम एचआयव्ही (ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस HIV) मध्ये देखील आढळतो, ज्यामुळे एड्स होतो.
जिथे ओमिक्रॉनचे पहिले प्रकरण नोंदवले गेले त्या दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ञांनी सूचित केले की, ओमिक्रॉनचा उगम कदाचित अशा माणसामध्ये झाला आहे ज्याची रोगप्रतिकारक शक्ती एचआयव्ही किंवा इम्युनोडेफिशियन्सी रोगाने संक्रमित आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.